युजर एक्सपिरीयन्स डिझाइनर
हे बदलत्या जगाची ओळख सांगणारं काम! नवं जग म्हणतं कुठलंही काम करतानाचा अनुभव महत्त्वाचा. त्यातही ‘युजर एक्सपिरीयन्स’ तर फारच महत्त्वाचा! त्यासाठी एक साधं उदाहरण. आपण रात्री घडय़ाळात अलार्म लावून झोपतो. पहाटे कर्कश्य आवाज करत तो अलार्म होतो.
आता अनेक कंपन्या छान मंजूळ बासरी, पाखरांचा चिवचिवाट, झुळझुळ पाणी असं काहीतरी अलार्म टोन म्हणून देतात. आपल्याला जाग येते ती पाखरांच्या किलबिलाटानं!
याला म्हणतात युजर एक्सपिरीयन्स. जो आपला स्मार्ट फोननं पण बदलवला.
हेच काम जे करतात आणि प्रत्येक तंत्रज्ञानातून आपला अनुभव जे बदलवतात त्याला म्हणतात युजर एक्सपिरीयन्स डिझाइनर.
काम काय?
तंत्रज्ञानाच्या वापरातून अधिक नॅचरल, रिअॅलिस्टिक आणि तरीही भन्नाट फील देण्याचं काम जे करतात तशी प्रॉडक्ट किंवा त्यातली इक्विपमेण्ट्स डिझाइन करणं हे त्यांचं काम. आपण वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभवच ते बदलून टाकतात.
संधी कुणाला?
ज्यांना फोटोशॉप, प्रोग्रॅमिंग लॅँग्वेजेस येतात आणि डोकंही अफलातून चालतं त्यांना या कामात मस्त संधी आहे.
पर्सनल फायनान्स अॅडव्हायजर
काळ असा की वडिलांना रिटायर्ड होताना जितके पैसे मिळतात तितका पगार अनेक तरुण मुलं पहिला पगार म्हणून कमावतात. म्हणजे पैसे चांगले मिळतात पण त्याचं करायचं काय, कुठं गुंतवायचे, कसे खर्च करायचे हे कळत नाही. त्यात खासगी नोक:या. यापुढे पेन्शन कुणाला मिळणारच नाही. म्हणून मग पर्सनल फायनान्स अॅडव्हायजर या करिअरचा जन्म झाला. जसा फॅमिली डॉक्टर भरवशाचा, आधी त्याचा सल्ला घ्यायचा, तसंच हे! आपला पैसा भरवशानं कुठं गुंतवायचा हे सांगणारा एक जाणता मित्रच!
काम काय?
हे काम खरं तर स्वतंत्र. फ्री लान्सिंगच. आपल्याकडे येणारा ग्राहक, त्याचं वय, त्याचे खर्च, त्याचं कर्ज, त्याची गुंतवणुकीची क्षमता, त्याच्या खर्च करण्याच्या सवयी आणि लाइफस्टाईल पाहून त्याला त्याच्या पैशाचं नियोजन करायला मदत करायची.
संधी कुणाला?
एमबीए, सीए, डीटीएल अशा डिग्य्रा बाळगणा:या बोलक्या माणसांना या नव्या क्षेत्रत चिक्कार स्कोप आहे.
नॉस्टॅलजिस्ट
आठवणींच्या जगात घेऊन जाणारा खरंतर कलाकारच हा. व्यवसायानं इंटिरिअर डिझाइनर. पण त्याचं काम भन्नाट आहे. अनेक लोक म्हातारपणी घर बांधतात. पैसा भरपूर पण त्यांना आठवणीत रमायचं असतं. काही माणसांना आपल्या अवतीभोवती एक विशिष्ट काळ पकडून ठेवायचा असतो. त्यातून ही थीम जन्माला आली. ही माणसं घराच्या भिंती, फर्निचर, वस्तू अशा काही बनवतात एक काळच उभा रहावा. म्हणजे कुणाला वाटेल आपलं घर ऐंशीच्या दशकातलं हवं तर त्याचा दिवाणखाना तसा, किचन 197क्च्या काळातलं तर ते तसं! सगळ्या त्या काळाच्या खुणा, वस्तू आणि इतिहास घरात जिवंत. असं अनोखं काम करणा:या माणसांना म्हणतात नॉस्टॅलजिस्ट.
काम काय?
काम इंटिरिअर डिझायनरचंच. पण माणसं वाचून, काळ लक्षात घेऊन, इतिहासाच्या पोटात शिरून केलेलं! आपल्या राहत्या घरात, एखाद्या कंपनीत, धार्मिक-ऐतिहासिक स्थळी तो ‘काळ’च जिवंत करण्याचं काम हे नॉस्टॅलजिस्ट करतात.
संधी कुणाला?
इंटिरिअर डिझायनर, इतिहासाचे अभ्यासक हे काम करू शकतात.
सिम्पलिसिटी एक्सपर्ट
हे काम फार भन्नाट. फक्त सल्ला द्यायचं, पण असा सल्ला जो कामाचा असेल. व्यक्तिगत जगण्यापासून बडय़ा कंपन्या, संस्थांना यापुढे या सिम्पलिसिटी एक्सपर्टची गरज भासेल!
तेच साधी राहणी, सोपी प्रक्रिया हे सारं परत येऊ घातलंय, पण अत्यंत प्रोफेशनली!
काम काय?
्रहे साधेपणातले एक्सपर्ट एखाद्या कंपनीला सल्ले देतात की, तुमचं दिवसभराचं काम अत्यंत स्मुथली व्हायचं असेल तर या चार गोष्टी करा. तुम्ही जे काम तीन दिवस करता, ते फक्त अध्र्या दिवसात करून बाकीचा वेळ कसा वाचवता येऊ शकतो. अध्र्या दिवसाचं काम फक्त 15 मिनिटांत कसं होऊ शकतं! हे सारं ते सप्रमाण दाखवू शकतात. तेच व्यक्तिगत आयुष्यातलं, आपला वेळ कुठं जातो, मोकळा वेळ कसा काढायचा, साध्या साध्या गोष्टी करून मोकळा श्वास कसा कमवायचा हे सारं हे एक्सपर्ट सांगतात.
संधी कुणाला?
वाटतं तितकं हे काम फुकट सल्लेदेऊ नाही. जे सांगायचं ते प्रत्यक्षात करून दाखवावं लागतं. म्हणूनच गणितातले तज्ज्ञ, डिझाईनिंगची चांगली माहिती असलेले डिझाइनर, मानवी वर्तणुकीचा अभ्यास असलेले सायकॉलॉजिस्ट यांनाच हे काम उत्तम जमू शकतं.
नेलपॉलिश नेमर
नेलपॉलिशला नाव ठेवायचं, विचार करा किती भन्नाट आहे विचार!
एखाद्या सुंदर रंगाचं नेलपॉलिश तुमच्यासमोर येतं आणि त्याला साजेसं नाव ठेवायचं असेल तर ते कसं ठेवायचं? हेच काम करतात हे नेलपॉलिश नेमर!
काम काय?
्रनेलपॉलिशचं हे नाव ठेवणं काही सोपं काम नाही. किती ब्रॅण्ड, किती रंग आणि तरी प्रत्येक नेलपॉलिशचं नाव वेगळं. स्टायलिश, चटकन लक्षात राहणारं आणि ज्या क्लासला आपल्याला हे नेलपॉलिश विकायचं आहे त्याला अपील होणारं असावं लागतं. रंग, केमिकल, समाज आणि क्रिएटिव्हिटी हे सारंच त्यासाठी लागतं!
संधी कुणाला?
जाहिरात, मार्केटिंग विभागात काम करणारे पण हायली प्रोफेशनल माणसं यासाठी नेमली जातात.
हेल्थ केअर नेविगेटर
भलीमोठी हॉस्पिटल्स. अनेक विभाग, शेकडो माणसं. त्यात आपलं माणूस आजारी. तिथं गेल्यावर काही म्हणता काही उमजत नाही. अशावेळी पेशण्ट्सशी नीट बोलून त्यांना योग्य माहिती देणा:या या नव्या कामाचं नाव आहे हेल्थ केअर नेविगेटर
काम काय?
हॉस्पिटलमधे येणा:या पेशंटच्या नातेवाइकांना योग्य माहिती देणं. सगळ्या प्रोसिजर, पेपरवर्क, आजारासाठी आवश्यक आर्थिक मदत कुठं मिळेल याची माहिती हे सारं देण्याचं काम हे नेविगेटर करतात.
संधी कुणाला?
अत्यंत पेशन्स लागणारं हे काम. सोशल वर्कची डिग्री घेतलेले, हेल्थकेअर स्पेशालिस्ट हे काम करू शकतात.