शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
3
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
4
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
5
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
6
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
7
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
8
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
9
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
10
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
11
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
12
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
13
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
14
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
15
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
16
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
17
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
18
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
19
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
20
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल

लेक्चरबाजी

By admin | Published: February 01, 2017 3:58 PM

कंटाळलेले प्राध्यापक, त्यांचं रटाळ शिकवणं, पिवळ्या पडलेल्या जुनाट नोट्स, पुस्तकी भाषणं आणि प्रॅक्टिकलचा अभाव.. असल्या वातावरणात कॉलेजात जाऊन ‘शिकावं’ असं कुणाला वाटेल?

कॉलेजातले प्राध्यापक आम्हाला ‘खिळवून’ ठेवू शकत नाहीत, असं मुलं का म्हणतात?लेक्चर्स होतात, पण शिक्षक इतके रटाळ शिकवतात की वर्गात बसावंसं वाटत नाही. शिक्षक पिवळे पडलेले वर्षानुवर्षाचे कागद घेऊन येतात आणि ते वाचून विचारतात, ‘समजलं का?’काहीजण तर हायटेक, ते आता वर्गात डायरेक्ट पीपीटीच आणतात, आणि बेसूर रटाळ भाषेत काहीतरी सांगत राहतात.काही ठिकाणी तर वर्गात फिरकतच नाहीत शिक्षक.कुठं दोन-तीन वर्षे सिनिअर असलेले तरुण मुलं-मुलीच येतात डायरेक्ट शिक्षक म्हणून शिकवायला. त्यांनाच मुळात काही विषय समजलेला नसतो, ते काय शिकवणार?कुठं प्रयोगशाळा नावाची गोष्टच नाही, कुठं प्रॅक्टिकल ट्रेनिंगच नाही.. तर कुणीकुणी शिक्षकांच्या पार्सलिटीचा आणि धाक-दडपशाहीचा बळी..अशा किती कहाण्या, किती तक्रारी राज्यातील कॉलेजात जाणाऱ्या तरुण मुलामुलींनी आॅक्सिजनला लिहून कळवल्या. मेल केल्या.आॅक्सिजनने दि. १६ डिसेंबर २०१६ रोजी एक लेख प्रसिद्ध केला होता. आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या एका माजी विद्यार्थ्यानं एक मिलियन पाउण्डचा दावा ठोकत विद्यापीठाला चक्क न्यायालयात खेचलं अशा आशयाचा तो लेख. आणि मुख्य म्हणजे तो विद्यार्थी भारतीय वंशाचा आहे.फैज सिद्दीकी त्याचं नाव. आॅक्सफर्ड विद्यापीठांतर्गत ब्रासनोज कॉलेजमध्ये तो मॉडर्न हिस्ट्री विषय शिकत होता, तेही १६ वर्षांपूर्वी. त्याचं असं म्हणणं आहे की, तो ज्या काळात कॉलेजात शिकत होता, त्या काळात त्याला चांगलं शिक्षण मिळालं नाही. जे मिळालं ते अत्यंत वाईट आणि ‘बोअरिंग’ होतं. आणि त्यामुळे त्याला जी रॅँक मिळायला पाहिजे होती त्या तुलनेत कमी मार्क, कमी रॅँक मिळाली. त्यामुळे इंटरनॅशनल कमर्शिअल लॉयर म्हणून त्याला काम करता आलं नाही. आणि त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. आता या संदर्भात वाद सुरू आहेत. कोर्टात केस उभी राहते आहे. मात्र सिद्दीकी ही केस जिंकलाच तर अशी शेकडो मुलं पुढे येऊन कोर्टात अर्ज करतील, अशी ब्रिटिश मीडियात चर्चा आहे.त्या घटनेच्या निमित्तानं ‘आॅक्सिजन’ने राज्यभरातल्या तरुण विद्यार्थ्यांना विचारलं होतं की, तुमच्या संदर्भात असं काही होतं का? तुम्हाला लेक्चर बोअर होतात का? त्यातून आपलं काही नुकसान होतं आहे, असं तुम्हालाही वाटतं का?या एका प्रश्नावर उत्तर म्हणून राज्यभरातील मुलामुलींनी जे लिहून पाठवलं ते अस्वस्थ करणारं आहे..एका मुद्द्यावर साऱ्यांचं एकमत आहे. मुलं म्हणतात, ‘आम्हाला लेक्चर्स नुस्ती बोअर होत नाहीत, तर रटाळ शिकवण्यानं आमचा अभ्यासातला रस उडतो आणि मार्कांवर परिणाम होतो. नोकरीच्या बाजारात आम्हाला कुणी उभं करत नाही. त्यामुळे शिक्षकांनी किमान आम्हाला समजेल आणि विषयाची आवड निर्माण होईल इतपत तरी बरं शिकवावं.’तरुण मुलांनीच लेक्चर बोअर होण्याची, अभ्यासात रस न वाटण्याची काही कारणंही सांगितली. मान्यही केलं की, आम्हीही वर्गात टवाळक्या करतो, कमेण्ट्स करतो, बंक मारतो, रट्टा मारून वेळ मारून नेतो पण या साऱ्यात आमच्या करिअरचा मात्र विचका होतो, असं बहुसंख्य मुलं सांगतात.शिक्षणपद्धतीला केवळ दोष देऊन या प्रश्नातून सुटका होणार नाही हे सांगणारं हे एक वास्तवचित्र आहे.