शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

3 गोष्टी शिका, यशाचा व्हिसा मिळवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 5:34 PM

इंडस्ट्री 4.0मध्ये तीन महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात घेऊ. त्याला आपण ‘कृतीची त्रिसूत्री’ म्हणू.

ठळक मुद्देपरवाची बातमी आहे की सोफिया ही एआय आधारित रोबोट अझरबैजान नावाच्या देशात गेली तेव्हा तिला इ-व्हीसा मिळाला

- डॉ. भूषण केळकर

दिवाळी झाली. पाडवा झाला. नववर्षाचं स्वागत झालं. रीतीप्रमाणं वहीपूजनही झालं. इंडस्ट्री 4.0ला सामोरं जाताना आणि आपलं करिअर घडवताना कोणत्या वहीतली कुठली पानं आपण लक्षात ठेवायला हवीत, याबद्दल आपण आजच्या संवादात विवेचन करणार आहोत.इंडस्ट्री 4.0मध्ये तीन महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात घेऊ. त्याला आपण ‘कृतीची त्रिसूत्री’ म्हणू.1) नोकर्‍या जातील/संपतील हा भयगंड काढून आपण हे लक्षात ठेवूया की नोकर्‍यांचं स्वरूप बदलणार आहे.2)ज्या नोकर्‍यांत एकजिनसी/एकसारखं काम आहे त्यापेक्षा ज्या नोकर्‍या वा कामात नावीन्यपूर्णता व बदलात्मक गुणविशेष आहेत अशाच कामांमध्ये आपण प्रगती करणं गरजेचं आहे. 3) निरंतर शिक्षण. कंटिन्युअस लर्निग. याला पर्याय नाहीच हे ओळखून (आळस टाळून !) शिकत राहणं - तेही वेगवेगळ्या माध्यमातून!यापुढील काळात मायक्रोलर्निग - किंवा म्हणू की शॉर्ट टर्म अभ्यासक्रमांना खूप महत्त्वही असेल आणि मागणीसुद्धा. त्यामुळे एकाच गोष्टीत खूप खोलात जाणं आणि तिथंच ‘डबकं’ होऊन राहणं धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या मूळ पदवी/पदविका शिक्षणाच्या अनुषंगाने काही अन्य कोर्सेस करणं श्रेयस्कर. उदा. कॉमर्सचे मुलं-मुली टॅली किंवा एमएस-सीआयटी हे करतातच; परंतु तुम्ही बेसिक डाटा अ‍ॅनालिसीसवरचे एमओडीसीवरील र्कोसेस (जे विनामूल्य आहेत) करावेत. सगळ्यात सोपं म्हणजे एक्सेल मॅक्रोज. तुम्ही पायथॉन प्रोग्रामिंग शिकून घ्यायला (Coursera.org किंवा ode academy) या साइटची मदत घ्यायला हरकत नाही. तेही घरबसल्या.इंजिनिअरिंग/सायन्सच्या विद्याथ्र्यानी ‘डाटा सायन्सेस’ मध्ये,R नावाच्या विनामूल्य असणार्‍या सॉफ्टवेअरवर अभ्यास करावा. या दोन्हीला प्रचंड मागणी आहे हे आपण मागील काही लेखात पाहिलं आहेच.नावीन्यपूर्ण कौशल्यं म्हणलात तर मेकॅनिकल वा इन्स्ट्रमेंटेशन इंजिनिअर्सनी विशेषतर्‍ रोबॉटिक्स वा मेकॅट्रॉनिक्सचे कोर्सेस करावेत. कॉम्प्युटरमधील विद्याथ्र्यानी विशेषतर्‍ कलागुण (चित्रकला) अवगत/आवड असणार्‍यांनी ज्याला वक/व म्हणतात अशा विषयांत पारंगत व्हावं. इंजिनिअर वा बी.एस्सी., बीसीए, एमसीए विद्याथ्र्यानीसुद्धा हे शिकून घ्यायला हवं. जर माणसशास्त्र/समाजशास्त्र आवडत असेल तर जरूर कोगनिटिव्ह कॉम्प्युटिंग कोर्स करावा. ही नुसती काही उदाहरणं आहेत. अर्थातच सगळी सूची/यादी देणं, विस्तार भयास्तव व जागेच्या अभावी मी टाळतो आहे. जे विद्यार्थी कला शाखेत आहेत, त्यांनी विशेषत्वाने क्रिएटिव्ह/ सृजनात्मक काम निवडून करणं आवश्यक आहे. ते तुम्ही केलंत तर तुम्ही नुसते टिकूनच राहणार नाही तर उत्तम प्रगती कराल. उदा. भाषेच्या विद्याथ्र्यानी तोच तोच पाठय़क्रम/ विद्यापीठाचा शिक्षणावर अवलंबून न राहता उ412ी1ं/ ी7ि यावर क्रिएटिव्ह रायटिंग/लिंग्विस्टीक्स वर काम करणं आणि त्याचा प्रत्यक्षानुभव अनेकविध इंटर्नशिप (या इंटरनेटवर उपलब्ध आहेत विनामूल्य !) करून मिळवाव्यात.  Internshala.com तिथं इण्र्टनशिपही शोधता येईल.म्हणजेच आपलं काम हे निरंतर शिक्षण तर आहेच; पण प्रत्यक्षानुभव हापण आहे आणि हे सृजनात्मक काम आपण इंटरनेटच्या साहाय्याने करू शकतो.परवाची बातमी आहे की सोफिया ही एआय आधारित रोबोट अझरबैजान नावाच्या देशात गेली तेव्हा तिला इ-व्हीसा मिळाला. रॉबॉट्स आणि मानव यांच्या सहअस्तित्वाच्या आगामी कालखंडात आपल्याला यशाचा व्हिसा मिळेल तो बदलांना सामोरं जाण्याची तयारी, सृजनात्मक काम व निरंतर शिक्षण या  त्रिसूत्रीवर!( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)