शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:28 IST

यंदाच्या आयपीएलने धोनीची वापसी झाली, कोहली आणि शर्माला अपयशाचे धक्के बसले आणि बडा स्टार खेळाडू नसताना सनरायझर्स चमकले. क्रिकेटच्या मैदानावर असा खेळ रंगलेला असताना या आयपीएलने प्रेक्षकांना काय धडे दिले?

- निशांत महाजनआयपीएलच्या मॅचेस आपण पाहतो. त्यात क्रिकेट आहे, थरार आहे. प्रेशरही आहे. त्यात काही संघ आपले फेव्हरिट आहेत, काही हरले की बरं वाटतं. त्यात सोशल मीडिया आयपीएलवर तडका मारतं. मुंबई हरतेय सतत म्हणून जोक फॉरवर्ड होतात, शेरेबब्बर विराट कोहलीचं पानीपत होतंय म्हणूनही लोक त्याची टर उडवतात. हे सारं आयपीएलमध्ये होतं. पाहणारे पाहतात, कमावणारे पैसा कमावतात.आपल्याला काय मिळतं? नाही म्हणायला क्रिकेटचा आनंद मिळतोच. मॅचमध्ये थरार असतोच. कुणी काहीही म्हणो, आपल्यासाठी मैदानावर खेळली जाणारी मॅच, पडणारा प्रत्येक चेंडू खराच असतो.

मात्र त्यापलीकडेही या आयपीएलचे काही धडे आहेत. ज्याला आपण ‘लेसन्स’ म्हणू.. ते धडे मैदानात खेळाडू शिकत असले तरी क्रिकेट पाहणारा कुणीही त्यातून बरंच काही समजून-उमजून घेऊ शकतो. या २०१८ च्या आयपीएलमध्ये असं काही दिसतंय का..?अर्थात दिसतंय. आणि त्यात ठळकपणे समोर येतोय धोनी. त्याची कामगिरी. धोनीला फक्त भूतकाळ आहे वर्तमानकाळ आणि भविष्य नाही असं म्हणणाऱ्यांना त्यानं उत्तर दिलंय. नेतृत्वानंही आणि कामगिरीनंही. दुसरं उदाहरण सनरायझर्स हैदराबादचं. आयपीएलच्या सुरुवातीलाच आॅस्ट्रेलियन वॉर्नरच्या माघारीचा अपशकून झाला. काही जानीमानी नावं सोडली तर या संघात स्टार, लार्जर दॅन टीम असा खेळाडू नाही. तरी कामगिरी पाहा, सगळ्यांपेक्षा चांगला हाच संघ खेळतोय. म्हणजे पुन्हा तेच, कुणीतरी एकच ग्रेट असण्यापेक्षा सगळी टीमच ग्रेट असू शकते, उत्तम खेळू शकते याचं सनरायझर्स हे एक उदाहरण आहे. दुसरीकडे ओव्हर कॉन्फिडन्सने शर्मांजीच्या मुलाचा घात करत मुंबई टीमला तळ दाखवला हे ही त्यात आलंच..हे सारं झालं क्रिकेटच्या दृष्टीनं विश्लेषण. त्यापलीकडे या आयपीएलने काही धडे आपल्यासमोर ठेवले आहेत.फायनेस्ट फिनिशरयंदाचा सगळ्यात मोठा धडा म्हणजे महेंद्रसिंग धोनी. तो संपला, संघावर ओझं झाला म्हणून केवढी टीका झाली. त्यात तीन वर्षे चेन्नई संघ आयपीएलच्या बाहेर होता. तो यंदा परतला, धोनीनं पुन्हा निळी जर्सी घातली. कप्तानी हाती घेतली. आणि जिंकण्याचा धडाका लावला. तो मैदानात उतरला की जिंकून, आपल्या हातात विजय घेऊनच परततो. अलीकडेच एका सामन्यानंतर त्यानं कॅप्टन ग्यान दिलं. तो म्हणाला, ‘ मी फार विचार करत नाही. एकच पाहतो, टार्गेट काय? ओव्हर्स किती उरल्या? त्या कोणत्या बॉलर्समध्ये वाटल्या जातील? टार्गेट हातात आहे की नाही? एवढंच पाहतो आणि मग ठरवतो, जे होईल ते होईल आपण जिंकण्याची प्रोसेस चुकवायची नाही. आपली खरी ताकद काय, कधी गेम चेंज होईल हे काही त्याक्षणी ठरवायचं नसतं. आपल्याला वाटतं ते करायचं टप्पे ठरवून!’तो आजवर हेच करत आला. टार्गेटचे टप्पे ठरवतो, एकेक टप्पा पुढे जातो. काम संपवूनच परत येतो. हे असं टप्पे ठरवून करिअर गोलच्या दिशेनं पुढं सरकणं, आणि लोकांनी मोडीत काढलेलं असताना जिंकणं यालाच तर फायनेस्ट फिनिशर म्हणतात.इग्नोर द नॉइजहे काय सोपं काम आहे का? आयपीएलच्या खेळावर गल्लीबोळात टीका, कमेण्ट होते. सगळे सल्ले देण्यात एक्सपर्ट, चुका दाखवण्यात एक्सपर्ट. लोकांनी धोनीच्या, रोहित शर्माचं काय, विराट कोहलीच्या चुकांचं वाभाडं काढलं. आर. आश्विन आणि हार्दिक पंड्याला सगळ्यांनीच सुनावलं. मात्र तरीही त्यांनी आपला खेळ सुरूच ठेवला. विशेषत: धोनी. त्यानं लोक काय म्हणतात याकडे लक्षच दिलं नाही. इग्नोर द नॉइज असं म्हणत सगळ्या अनावश्यक टीकेकडे काणाडोळा करता येणं हे एक स्किल आहे. ते शिकता आलं तर कामगिरी सुधारू शकते.स्कोअर हायमुळात आपली स्पर्धा कुणाशी असते? आयपीएल तर दावाच करतंय की ही बेस्ट व्हर्सेस बेस्ट स्पर्धा आहे. इथं सगळेच बेस्ट. प्रचंड पैसा लागलेला आहे. कामगिरी दाखवली नाही तर सरळ बाहेर. गौतम गंभीर बाहेर बसलेला सगळ्यांनी पाहिलाच. त्यामुळे जे इतरांना हरवण्यासाठी नाही तर स्वत: जिंकण्यासाठी खेळतात तेच जिंकताना दिसतात. मुख्य म्हणजे पूर्वी आपण किती भारी खेळायचो याला काही अर्थ नाही, आज काय स्कोअर केला, किती केला यालाच महत्त्व आहे. आजच्या स्पर्धेत जो आज चांगला खेळतो तोच जिंकतो. त्यामुळे स्कोअर हाय हे सूत्र ज्याला साधलं तो जिंकला.चुकलं काय?इतरांचं काय चुकलं हे सगळ्यांनाच दिसतं, आपलं काय चुकलं हे कुणालाच दिसत नाही. त्यामुळे परफॉर्मन्स अ‍ॅनालिसिस हे एक नवीन सूत्र आयपीएलच्या निमित्तानंही दिसलं. केकेआरच्या टीमनं ते वेळोवेळी केलं. स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करत सामने जिंकलेही. फोकस कायम ठेवा असं सगळेच सांगतात. पण, तो कायम राखताना आपलं चुकलं कुठं याचंही विश्लेषण करणं गरजेचं ठरतं. सनरायझर्स, चेन्नई आणि केकेआर आणि पंजाबनंही ते यंदा बºयापैकी केलं. ज्यांनी केलं नाही ते अजूनही तळातच आहे. आपल्या कामाच्या संदर्भात असं आपलं आपण परफॉर्मन्स अ‍ॅनालिसिस करतो का?