शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

फलटण ते फ्लोअर क्लिनिंग मशीन, बारावीला कमी मार्क पडले म्हणून मी नाराज झालो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 12:57 PM

बारावीला कमी मार्क पडले म्हणून मी नाराज झालो. डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेतली साता-याला गेलो.

- प्रतीक विजयकुमार काटकर

बारावीला कमी मार्क पडलेम्हणून मी नाराज झालो.डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेतलीसाता-याला गेलो.पण तेव्हाच ठरवलंआता प्रयत्न करायचे,अभ्यास करून मोठी झेप घ्यायची.पुण्यात इंजिनिअरिंगला आलोआणि आता तरएक सुवर्णपदक जिंकूननवीन टप्पा गाठलाय...अपयश येतं; पण निराश नाही व्हायचं, एवढंच मी स्वत:ला सांगतो. २०११ला माझी बारावी झाली. रिझर्ल्ट लागला. मार्क कमी पडलेले. वयच असं होत की, भरकटून गेलो होतो. अर्थात मार्क कमी पडले म्हणून आई-वडिलांनी रागराग केला नाही किंवा ते चिडलेही नाहीत; पण त्यांच्या विश्वासाला तडा मात्र माझ्यामुळे गेलाच.मार्क फारच कमी होते. कुठे अ‍ॅडमिशन मिळेल असं वाटतच नव्हतं. डोनेशन भरून अ‍ॅडमिशन घेणंही शक्य नव्हतं. कारण परिस्थिती सर्वसामान्य. माझे वडील तत्त्वाने चालणारे त्यामुळे तो मार्ग बंद होता.मॅकेनिकल डिप्लोमा इंजिनिअरिंगला साताºयाला गौरी शंकर पॉलिटेक्निकला अ‍ॅडमिशन घेतलं. घरातून निघालो. ठाम निश्चय केला की या स्पर्धात्मक जीवनात टिकून रहायचंच. डिप्लोमा पूर्ण केला. कॉलेजमध्ये माझी कामगिरी उत्तम होती. शेवटच्या वर्षाला मार्कपण चांगले आले.बारावीला झालेल्या गोष्टीतून धडा घेऊन मी उच्च्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करायची असं मनाशी ठाम ठरवलं होतंच. मार्क उत्तम होते त्यामुळे आता पुण्याच्या नामवंत इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिकायचं तर फी खूप. तरीपण वडिलांनी खूप प्रयत्न करून पैसे जमवले आणि माझ्या डिग्रीच्या अभ्यासाला सुरुवात झाली. फलटणहून व्हाया सातारा मी पुण्यात पोहचलो.कॉलेज जीवनात चांगले मित्र जमलो, चांगले अनुभवी शिक्षक संपर्कात आले. आमचे अकोलेकर सर सांगायचे की मेहनत इतनी खामोशीसे करो की कामयाबी शोर मचाए. ते कायम लक्षात ठेवलं. इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष उजाडलं. पण मी अजून हाच विचार करत होतो की शिक्षण संपत आलं; पण अजून काही मनाला समाधान मिळालं नाही. काही तरी राहिल्यासारखं वाटायचं. शेवटच्या वर्षाचा प्रोजेक्ट मी आणि माझे पार्टनर करत होतो. एक विषय घेऊन त्या मध्ये स्पेशलायझेशन करायचं होतं. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग शेवटच्या वर्षाला पुण्याच्या भिवराबाई अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकत होतो.आम्ही प्रोजेक्टवर काम केलं, राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा झाली आणि प्रदर्शनही झाले. तिथे भाग घेऊन प्रोजेक्ट सादर केला. या मेकॅनिकल प्रोजेक्टच्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत माझ्या प्रोजेक्टला सुवर्णपदक जाहीर झालं. १० एप्रिल २०१७ रोजी ही बातमी ‘लोकमत’मध्येच आमच्या फोटोसहीत छापून आली.आज जेव्हा त्या फोटोकडे पाहतो तेव्हा लक्षात येतंय की, नेमकं कसं जमलं हे? २०१४ ते २०१७ हा माझा डिग्रीच्या शिक्षणाचा काळ, एक एक वर्ष पुढे जात होतो. कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमांमध्ये मी नेहमी अग्रेसर असायचो. माझा मित्रपरिवार चांगला आणि साथ देणारा होता. आम्ही दरवर्षी शिवजयंती आयोजित करायचो. एक वर्ष मी कॉलेज टेक्निकल इव्हेण्टचा प्रमुख होतो. सकारात्मक ऊर्जा नेहमी मनात असायची. माझे मित्र प्रशांत कापरे, अक्षय कडव आणि राहुल कदम नेहमी सोबत असायचे. शेवटच्या वर्षाचा प्रोजेक्ट एकत्र करायचा असंच आम्ही ठरवलं.विषय काय घ्यायचा यापासून सुरुवात होती. आमच्या डिपार्टमेंटला अजय उगले होते. त्यांच्या देखरेखीखाली प्रोजेक्टचं काम करायचं ठरवलं. मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन आणि अभ्यास करायचा होता. मी आणि माझे प्रोजेक्ट पार्टनर मित्र कामाला लागलो. रोज वेगवेगळ्या अडचणी येत होत्या. पैशाची अडचण असायची. खूप धावपळ व्हायची. पण प्रोजेक्टचं काम आम्ही मनापासून केलं.त्याच वेळी सिंहगड इन्स्टिट्यूट श्रीमती काशीबाई नवले कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग आणि रोटरी क्लब आॅफ पुणे यांच्या वतीने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्टÑीय प्रोजेक्ट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.राष्टÑीय पातळीवर घेण्यात येणाºया या स्पर्धेत ८४ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीला अनुसरून आम्ही फ्लोअर क्लिनिंग मशीन तयार केलं. विजेशिवाय चालणारं, कमीत कमी श्रम, पाण्याची व पैशाची बचत करणारं, कोणताही मेंटनन्स नसणारं आणि सर्वसामान्यांना परवडणारं, रोजच्या जीवनात स्वच्छतेला महत्त्व देणारं असं हे मशीन आम्ही प्रोजेक्ट म्हणून बनवलं. हे जे उपकरण आम्ही बनवलं याची नोंद राष्टÑीय वस्तू उत्पादन कंपन्यांकडून घेण्यात आली. आणि आम्हाला सुवर्णपदकही मिळालं. आंतरराष्टÑीय ख्यातीचे उद्योजक आणि कायनेटिक ग्रुपचे संस्थापक पद्मश्री अरुण फिरोदिया यांच्या हस्ते आम्ही पुरस्कार स्वीकारला.त्या फोटोकडे पाहून माझ्या स्थलांतराचा, यशाअपयशाचा हा प्रवास आठवला. माझे आई-वडील, मित्र आणि शिक्षक यांनी साथ दिली. वेळोवेळी मदत केली. म्हणून माझ्या सारख्या जेमतेम विद्यार्थ्याला कष्टाच्या जोरावर यश मिळालं.प्रवास आता सुरूच आहे, कष्ट करायचे, हरायचं नाही हे तर मनाशी पक्कं आहेच.छोटीशी गावं.त्यापेक्षा मोठी; पण छोटीच शहरं.या शहरात राहणारी जिद्दी मुलं.आपल्या स्वप्नांचा हात धरून,संधीच्या शोधातमोठ्या शहरांकडे धावतात.काय देतात ही मोठी शहरं त्यांना?कसं घडवतात-बिघडवतात?आणि जगवतातही..?- ते अनुभव शेअर करण्याचाहा नवा कट्टा.तुम्ही केलाय असा प्रवास?आपलं छोटंसं गाव, घर सोडूनमोठ्या शहरात गेला आहात शिकायला?मोठ्या शहरात? दुसºया राज्यात? परदेशातही?काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला?काय अनुभव आले?कडू-वाईट?हरवणारे-जिंकवणारे?त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीतबदलली का?दृष्टिकोन बदलला का?त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला?तुम्ही त्या शहराला?की संपलंच नाही उपरेपण?या साºया अनुभवाविषयी लिहायचंय?तर मग ही एक संधी !लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट.१. लिहून पाठवणार असाल तरपाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा.सोबत तुमचा फोटो आणि पत्ता-फोन नंबरहीजरूर लिहा..