शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हार्मोन्स बनतात कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 07:35 IST

हार्मोन्स हा शब्द तर आपल्याला माहितीच असतो. अनेकजण चेष्टा करतात, म्हणतात तरुण मुलं परस्परांना, दादा, हार्मोन्स बॅलन्स चेक करून घ्या.

- यशपाल गोगटहार्मोन्स हा शब्द तर आपल्याला माहितीच असतो. अनेकजण चेष्टा करतात, म्हणतात तरुण मुलं परस्परांना, दादा, हार्मोन्स बॅलन्स चेक करून घ्या.मुली तर उदास होऊन म्हणतात, माझं हार्मोनचं तंत्र बिघडलं आहे. वजनाचा काटा आणि हे तंत्र याची अनेकजण सांगड घालून ठेवतात. तेही ऐकिव माहितीवर.पण हार्मोन्स बनतात कसे?या हार्मोन्सची निर्मिती विशिष्ट ग्रंथींमध्ये होते. या ग्रंथी शरीरात विभिन्न ठिकाणी असतात. या ग्रंथींना एकत्रितपणे अंर्तस्त्रावी ग्रंथी असं म्हणतात. या ग्रंथींच्या समूहातून जे एक तंत्र विकसित होतं त्याला एण्डोक्रि न सिस्टम असं म्हणतात.चिकित्साशास्त्रात याचा अभ्यास करणाºया शाखेला एण्डोक्रिनॉलॉजी असं म्हणतात. आणि जो उपचार करतो त्याला म्हणतात एण्डोक्रि नॉलॉजिस्ट.पण शरीरात असतात कुठं या ग्रंथी? आणि कोणत्या?पिट्युटरी, थायरॉइड, पॅराथायरॉइड, अ‍ॅड्रिनल, स्वादुपिंड व ओव्हरी (बीजांड) किंवा टेस्टीस (वृषण). अशा या ग्रंथी. याच्या व्यतिरिक्त काही अवयव जसे त्वचा किंवा चरबीच्या पेशी या मूळत: अंर्तस्त्रावी ग्रंथी नसल्या तरीही काही प्रमाणात तसंच कार्य करत असतात.भ्रूमध्य रेषेत, मोठ्या मेंदूच्या तळाशी स्थित असलेली वाटाण्याएवढी पिट्युटरी ग्रंथी इतर सर्व ग्रंथींची महानायिका (मास्टर ग्लॅण्ड) बनून स्वामित्व गाजवते. गळ्यामध्ये मध्यभागी फुलपाखराच्या आकाराची थायरॉइड ग्रंथी ही पर्यवेक्षकाप्रमाणे देखरेखीचे काम करीत असते. कॅल्शिअम व इतर क्षारांचा समतोल ठेवणारी पॅराथायरॉइड ग्रंथी थायरॉइडची सख्खी शेजारीण आहे ! इन्सुलिनच्या माध्यमातून शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवणारी ग्रंथी म्हणजे स्वादुपिंड.किडनीच्या डोक्यावर गांधी टोपीप्रमाणे स्थिरावलेली अ‍ॅड्रिनल ग्रंथी ऊर्जा देण्याचं कार्य करत असते.याचं काम जन्मभर चालतं. पण वयात येताना या ग्रंथी मोठा गहजब करतात.किशोरवयीन मुलामुलींमध्ये पौगंडावस्थेत जे बदल घडतात ते ओव्हरी (बीजांड ) व टेस्टीस (वृषण) या ग्रंथींच्या स्रावावर अवलंबून असतात.या सर्व ग्रंथी शरीराच्या त्या त्यावेळच्या आवश्यकतेनुसार क्षणोक्षणी संबंधित अवयवांना कार्यक्षम ठेवतात.पण या ग्रंथीनीच ताल सोडला किंवा त्यांचं काम बिघडलं तर?किंवा अन्य आजारांमुळे त्यांच्या कामात बिघाड झाला तर?तर आपल्या शरीरातही गोलमाल होतो.त्यात सेक्स हार्मोन संबंधातले आजार अजाणतेमुळे किंवा संकोचामुळे अंगावर काढले जातात. त्यातले बरेचसे आजार प्राणघातक नव्हे; पण दैनंदिन जीवनात बाधक मात्र ठरत असतात. आणि नेमकं कशानं काय घोळ होतोय हेच कळत नाही. आपल्या देशात या एण्डोक्रिन आजारांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यांचं निदान व उपचारही बरेचदा होत नाही.अनेकांना वाटतं की उपचार महाग असतील. पण तसंही नाही. वाजवी दरात औषधं सहज उपलब्ध होतात. उदाहरणार्थ थायरॉइड हार्मोन्सवरील गोळीचा दिवसागणिक खर्च दोन रुपयांपेक्षाही कमी आहे. वजनावरील आजार बरेच वेळा खाण्यामध्येच बदल केल्यामुळे आटोक्यात येतात. असे पर्याय अनेक आहेत; पण आपण बोललं तर.. मोकळं होऊन आजार सांगितले तर..(लेखक एण्डोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोनतज्ज्ञ आहेत.)