friendship in corona time, how the bond is changing & celebrating life. | दोस्ती इन लॉकडाऊन टाइम

दोस्ती इन लॉकडाऊन टाइम

ठळक मुद्देग्लोबल पॅनडेमिक असो किंवा आणखी काही, आमची दिल दोस्ती दुनियादारी कायम टिकून राहील.

-इशिता मराठे सकाळी साधारण 8 वाजता घरातून सरळ मॅकडोनाल्ड गाठायचं. मग दुपारी बारा-साडेबारार्पयत तिथेच एका महाराजा बर्गरमध्ये मस्त नास्ता व्हायचा. हळूहळू इतर मित्रमैत्रिणी जमायला लागल्यावर कोणाकडून तरी सहज फ्रेंज फ्राइज आणि कोकची पार्टी मागायची. दुपारचं जेवण कोणत्याही मित्रमैत्रिणीच्या घरी. मग संध्याकाळ होईर्पयत गप्पाटप्पा, मजामस्ती, एखादा सिनेमा आणि फोटो काढणं यात वेळ असाच निघून जायचा. मग अगदी अंधार पडायला लागल्यावर जरा नाखुशीनेच निरोप घ्यावा लागायचा. घरी जाऊन पुन्हा त्याच लोकांशी सोशल मीडियावर तासन्तास बोलायचं. उद्या कुठे कसं भेटायचं, ते ठरवायचं. कधी कधी अचानक स्लीपोव्हर प्लॅन करायचा. असा असायचा अकरावी-बारावीतला जवळपास प्रत्येक दिवस. हा सीन चालू होता मार्चर्पयत. आता ऑगस्ट महिना. मी माङया मित्रमंडळींना मार्चपासून भेटलेले नाही. सकाळी साडेसात वाजता झोपेतून उठून पटकन चांगला शर्ट आणि घरातलीच पॅण्ट घातलेल्या अवस्थेत ऑनलाइन क्लासला हजेरी लावायची. स्वत:चं आवरता आवरता, रेंगाळत रेंगाळत जेवणाची वेळ झाली की नास्ता आणि जेवण सोबतच करायचं. संध्याकाळर्पयत इन्स्ट्राग्राम, नेटफ्लिक्स, यू-टय़ूब, डाऊसपार्टी याच चार अॅप्समध्ये फिरत राहायचं. रात्री किचनमध्ये स्वत:च काहीतरी प्रयोग करून पहायचा आणि छान झालंच तर घरातल्यांना हौशीने खाऊ घालायचा. रात्री दोन-तीन वाजेर्पयत मित्रमैत्रिणींसोबत एकतर चॅटिंग करायचं नाहीतर नेटफ्लिक्स पार्टी अटेण्ड करायची. हे कॉण्ट्रॉडिक्शन पाहून आश्चर्य वाटतं.

कसं काय बदललं हे सगळं?

कुठं गेलं ते रोज एवढय़ा लोकांसोबत हॅँगआउट करणं? आता काय करते मी? हे अजून किती दिवस चालणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माङया दोस्त कंपनीला पुन्हा कधी भेटता येईल? कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या काळात मैत्रीचं स्वरूप पालटलंय. पण संकल्पना तीच आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे मैत्री मेण्टेन करणं अवघड झालंय का? हो नक्कीच. पण त्यामुळे मानसिक दुरावा निर्माण झालाय का? तर मुळीच नाही. अनेक महिने एकमेकांना प्रत्यक्षात न पाहूनसुद्धा आमची मैत्री, एकोपा आणि प्रेम यात जराही फरक पडलेला नाही. उलट या काळात आम्हाला खरी आपली माणसं आणि केवळ ओळखीचे लोक यातली ठसठशीत रेष दिसून आली. सगळेच आपले सखे नसतात हेही समजलं. रोज मॅकडीत भेटणारे, आपल्यासोबत पार्टी करणारे, इन्स्टावर एकमेकांना फॉलो करणारे सगळेच लोक आपण शहर सोडून गेल्यावर आठवण काढणारे नसतील हे लक्षात आलं. आम्ही सगळेच ‘आपली माणसं’ ओळखायला शिकलो. कोण अजूनही आपल्याला अधूनमधून फोन करतं? कोण केवळ दिसलं म्हणून बोलायचे? कोण लॉकडाऊन सुरूझाल्यापासून बोललेलंच नाही? कोणाला वाढदिवसाचं व्हिडिओ कॉल इन्व्हिटेशन पाठवावं? कोणी फक्त नेटफ्लिक्स पासवर्ड हवा म्हणून एकदा मेसेज केला होता? अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टी आता महत्त्वाचा वाटायला लागल्या. आधी आता आत्ता यातलं कॉट्रॅडिक्शन बघून हसूच येतं. ‘सोशल मीडिया शाप की वरदान?’ असे घिसेपिटे निबंधाचे विषय देणारे शिक्षकही आता त्याच माध्यमातून ऑनलाइन क्लासेस घेतात. आता मात्र त्यांनी सोशल मीडिया हे लॉकडाऊनपुरतं तरी वरदान आहे हे मान्य करायला हरकत नाही. यावर कधीच बूमर्स आणि झमर्सचं एकमत होणार नाही असं मला वाटतं. पण ते असो. याच सोशल मीडियाद्वारे एकमेकांना न भेटताही मजामस्ती कशी करायची याचे नाना प्रकार आम्ही शोधून काढले आहेत. एकमेकांना मिस्स पाठवून स्पॅम करणं, व्हिडिओ कॉन्फरन्सवर गप्पा किंवा वाढदिवस सेलिब्रेट करणं, नेटफ्लिक्स पार्टी हे फीचर वापरून सोबत मुव्हीज पाहणं आणि चॅटिंग करणं असे विविध उपाय आम्ही वापरतो. पण आम्ही जरी टेक्नोसॅव्ही पिढी असलो स्क्रीन्सवर आमचं कितीही प्रेम असलं तरी इतक्या सहजासहजी आम्ही या लॉकडाऊनच्या लाइफस्टाइलमध्ये रुळलो नाही. सुरुवातीला तर महिनाभर ही लॉकडाऊनची संकल्पनाच पटेना. दिवस मित्रमैत्रिणींशिवाय कसा काढायचा हाच मोठा प्रश्न होता. एकमेकांपासून दूर राहणं अशक्य वाटतं होतं. मग हळूहळू रिअलाइन झाली की कोरोना व्हायरस आणि हा लॉकडाऊन काही इतक्यात जाणार नाही. याच्याशी आपल्याला अॅडजस्ट व्हावं लागणार. कनेक्टेड राहण्याचे काही मार्ग काढावे लागणार. यात वेगवेगळे अॅप्स आणि इंटरनेटचो मोठा आधार मिळाला. हाउस पार्टी अॅपवरून इतरांसोबत गेम्स खेळायचे, इन्स्टावर विनोदी फिल्टर्स लावून व्हिडिओ कॉल करायचा, रात्री उशिरार्पयत लूडोचे डाव खेळायचे, सोबत सीरिजचे सिजन्स बिंज वॉच करायचे, स्म्यूल अॅपवर सर्वासोबत मनसोक्त कॅरओके करायचा. एकमेकांना टिकटॉक बनवून पाठवायचे (आता टिकटॉक भूतकाळ झाला.) डुओलिंगो वर एखादी नवीन भाषा शिकायची. मूव्ही मॅराथॉन करायची. यू-टय़ूबवर बघून नवीन पदार्थ बनवायला शिकायचं आणि त्या रात्री व्हिडिओ कॉलवर सोबत जेवण करायचं. एकमेकांसाठी गाण्यांच्या प्लेलिस्ट बनवायच्या. मित्रमैत्रिणींचे फोटो मजेशीर पद्धतीने एडिट करायचे असे सर्व उद्योग आम्ही करतो. रोज इतका वेळ सोबत घालवल्याने आमच्यासाठी आता प्रत्येकच दिवस फ्रेण्डशिप डे झाला आहे. ग्लोबल पॅनडेमिक असो किंवा आणखी काही, आमची दिल दोस्ती दुनियादारी कायम टिकून राहील.

Web Title: friendship in corona time, how the bond is changing & celebrating life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.