शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

लागीर झालेल्या भय्याचा आणि गॅरीचा फ्लोरल शर्ट पाहिला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 15:44 IST

गॅरी, डॉ. साबळे आणि लागीर झालेला भय्या एकदम फ्लोरल शर्ट घालून का अवतरले?

ठळक मुद्देफ्लोरल प्रिंटेड जॅकेट, ट्राय करनेमें क्या जाता है?

- श्रुती साठे

इतकी र्वष फ्लोरल प्रिण्ट्सवर बायकांची मक्तेदारी होती; पण काळ बदलला आणि पुरु षांसारखे ब्लेझर, पॅण्ट, स्ट्राइप्स तरुणीही वापरू लागल्या. आताशा तर महिलांसाठीचेच रंग असे लेबल चिकटविलेले रंग पुरुषही वापरू लागलेत.  पुरुषांच्या कलेक्शनमध्ये गुलाबी, जांभळ्या रंगाचे शर्ट, टी-शर्ट, फ्लोरल प्रिंटेड कुर्ता, शर्ट, जॅकेट यांचा समावेश होऊ लागला. फ्लोरल प्रिंट हे बॉलिवूडमध्ये रणवीर सिंग, करण जोहर यांनी खूपदा अत्यंत सफाईदारपणे कॅरी केलेत; पण आता आपल्या मराठी टीव्ही सृष्टीतल्या नटांनासुद्धा फ्लोरल प्रिंट्स आपलेसे वाटू लागलेले दिसतात. टीव्ही मालिकेमध्ये राजकारण्याची भूमिका साकारणारा किरण गायकवाड सिरिअलमध्ये नेहमीच पांढर्‍या  ड्रेसमध्ये दिसतो; परंतु मध्यंतरी एका अवॉर्ड शोमध्ये किरण फ्लोरल प्रिंटेड वेस्ट कोट आणि त्याला कॉन्ट्रास्ट अशा निळ्या कुत्र्यात सुरेख दिसला. माझ्या नवर्‍याची बायको फेम अभिजित खांडकेकर त्याच्या उत्तम स्टाइल सेन्ससाठी ओळखला जातो. मालिकेमध्ये त्याचा लूक अतिशय फॉर्मल, क्लीन फिट कपडय़ांमध्ये आहे.  अभिजितने या अवॉर्ड शोसाठी निवडलेला फ्लोरल प्रिंटेड शेरवानी आणि धोती लूक त्याला शोभून दिसला.  नीलेश साबळेसुद्धा या शोमध्ये फ्लोरल प्रिंटेड वेस्ट कोटमध्ये पाहायला मिळाला. पांढर्‍या  कुत्र्यावर त्याने वापरलेला डार्क फ्लोरल कोट हा लूक तरुणांनी नक्की ट्राय करून पाहावा असा आहे.  सणासुदीचे दिवस असले  की ऑफिस, कॉलेजमध्ये हटकून ट्रॅडिशनल डे असतो. त्यावेळी समस्त तरुणांनी आपले खाकी रंगाचे नेहरू/मोदी जॅकेट बाजूला ठेवून यावेळी काहीतरी बदल म्हणून नक्की फ्लोरल प्रिंटेड जॅकेट ट्राय करावेत. ट्राय करनेमें क्या जाता है?