फॅशनमधलं आपल्याला काही कळत नाही आणि कुणाला काही विचारण्याची सोय नाही, सतराशे साठ सल्ले मिळतात आणि त्यातून काय निवडायचं हे कळत नाही.
पण मुळात आता असे एक्सपर्ट शोधायची गरजच नाही, ताईमाईचे सल्लेही नकोत आणि कुणाचं काही ऐकणंही नको.
जगभरात काय फॅशन सध्या इन आहेत आणि त्यातही आपल्या वातावरणात, वजन-उंची, रंगाला काय चांगलं दिसेल हा पर्सनलाईज्ड सल्ला आपला मोबाइलच दर दिवशी देऊ शकेल.
म्हणजे खरंतर मोबाइललाच विचारता येईल की, सांग ना, आज काय घालू?
कसं?
मदतीला आहेत काही पॉफ्युलर आणि जगभर फेमस असलेले फॅशन अॅप्स.
त्यापैकी काही फक्त तुमच्या मोबाइलवर डाऊनलोड केले तरी तुम्ही ग्लोबल फॅशनच्या टचमधे तर राहूच शकता तरीही लोकली अत्यंत रिलेटही करू शकता.
फुकटात फॅशन एक्सपर्ट होण्याची ही एक सोपी युक्ती आहे.
त्यासाठी हे सध्या जगभर अत्यंत लोकप्रिय असलेले फॅशन अॅप्स एकदा वापरुन पहा.
1) Asap54
एखादा रंग, स्टाईल, कपडे, बूट तुम्हाला ऑनलाईन आवडले तर ते आपल्याला कसे दिसतील, लेटेस्ट ट्रेण्ड काय याचा गाईड म्हणजे हे अॅप.
अनेक लेटेस्ट फुकट सल्ले तुम्हाला या अॅपवर मिळू शकतात.
https://www.asap54.com/
या साईटवर माहितीही मिळेल आणि अॅपही डाऊनलोड करता येईल.
2) Pose
खरंतर हे एक हवामानविषयक अॅप आहे, पण तसं वाटत नाही. कारण काय घालावं, हवामान काय, आपलं लोकेशन कुठलं हे सारं चेक करुन हे अॅप काय घालता येईल, कुठले रंग चांगले असं उत्तम गाईड करतं. हे अॅप म्हणजे परफेक्ट फॅशन गाईड आहे.
अधिक माहितीसाठी https://poseapp.com/ ही साईट पहा.
3) covet
काही फॅशनवेडे असेही असतात की, ज्यांच्याकडे पैसे फार नाही पण वेळ चिक्कार असतो. त्यांच्यासाठी हे परफेक्ट अॅप आहे. तुम्ही जेव्हा हे अॅप डाऊनलोड करता तेव्हा ते तुमची एक टेस्ट घेतात. विचारतात की हॉट ऑर नॉट? आणि मग हळूहळू तुमचा लूक, तुमची आवड तिथं सेट व्हायला लागते.
गंमत म्हणून हे अॅप वापरुन पहायला हरकत नाही.
अधिक माहितीसाठी http://www.covetfashion.com/ ही साईट पहाता येईल.