इलेक्शन जवळ आलं, आता पुन्हा तोच जुना तरुण मतदारांचा देश, तरुणांचा आवाज, युवाशक्तीचा जोश, त्यांची ताकद अशी चर्चा सुरू होईल.
फस्ट आणि सेकंड टाइम व्होटर्सना भूलवण्याचे प्रयत्न सुरू होतील.
पण आम्ही त्या प्रयत्नांना भुलू असं या पॉलिटकल पाटर्य़ांना वाटतं तरी कसं?
मी तरी नाही भुलणार?
माझा आत्ताचा ताजा अनुभव सांगतो, मी साधं माझं डोमिसाईल काढायचं म्हणून कागदपत्रं घेऊन फिरत होतो तर इतका त्रास झाला. इतके खेटे घातले नगरसेवकापासून सरकारी कार्यालयात की जीव नकोसा झाला !
त्यात त्रास कसला झाला तर, तुम्ही काय पोरंटोरं, तुम्हाला काय अक्कल, असाच एकूण सगळ्यांचा सूर. कुणी मला आणि माझ्या मित्रांना काही किंमतच द्यायला तयार नव्हतं.
मग आता जेव्हा आमची ‘तरुण’ मतं मागायला येतील तेव्हा आम्ही झाल्या अपमानाचं काय करायचं?
माझ्यासारखे अनेक तरुण जागोजागी असतील ज्यांचे घरात अपमान होतात, नातेवाईक अपमान करतात, कॉलेजं, सरकारी कार्यालयं, राजकारण्यांची ऑफिसेस सगळ्या ठिकाणी अपमान.
आणि मग म्हणे आमचा देश म्हणजे ‘तरुणांचा’ देश. तरुण लोकशाही. मी नाही मानत.
आम्हाला मान द्या, तर आम्ही तुम्हाला मान देऊ.
आता पोकळ शब्दांना आम्ही भुलणार नाही, एवढं लक्षात ठेवा.
- प्रथमेश पारीख
घाटकोपर