-नितांत महाजन
सतत धूम्रपानाचा आणि कोविड-19चा संसर्ग होण्याचा काही परस्पर संबंध आहे का?याचा अभ्यास आता इंग्लंड आणि अमेरिकेत अनेक संस्था, विद्यापीठं करत आहेत. महामारीच्या सुरुवातीच्या काळात, विशेषत: युरोपात जे कोरोनाबळी जात होते त्यांच्यात वृद्धांची संख्या मोठी होती. त्यामुळे चर्चा अशीही होती की, तरुणांना या आजाराचा फार धोका नाही.प्रत्यक्षात नंतर आलेल्या आकडेवारीने हे स्पष्ट केलं की, तरुणांनाही मोठय़ा प्रमाणात संसर्ग होत आहे, आणि दगावणा:यांत तरुणांचं प्रमाणही वाढत आहे.हाच ट्रेण्ड भारतीय उपखंडातल्या देशातही दिसला.याचकाळात इंग्लंड सरकारने देशभरातल्या युवकांना सल्ला दिला की, धूम्रपान सोडा. जे तरुण धूम्रपान करतात त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे.त्याचा परिणाम म्हणून आणि वाढती बळींची संख्या समोर असल्याने इंग्लंडमध्ये अलीकडच्या काळात 1 मिलिअन तरुणांनी स्मोकिंग सोडल्याची माहिती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे वृद्धांपेक्षाही 16 ते 29 या वयोगटातील तरुणांचं स्मोकिंग सोडण्याचं प्रमाण जास्त असल्याचं आकडेवारी सांगते.
****
स्मोकिंग करताय मग तिनात एकाला धोका
अमेरिकेतही युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि सॅन फ्रॅन्सिस्को यांनी 18 ते 25 या वयोगटातील तरुणांचा अभ्यास केला. त्यांचंही म्हणणं हेच आहे की, या वयात जे मुलंमुली सिगारेट ओढतात त्यांना इतरांपेक्षा कोविड-19चा धोका इतरांपेक्षा (म्हणजे व्यसन न करणा:यांपेक्षा) अधिक आहे. त्यात सिगारेटच नाही तर इ सिगारेट पिणारे, अन्य तंबाखूजन्य किंवा मादक पदार्थ सेवन करणारेही आहेत. त्यात असे दिसते की व्यसन करणा:या दर तीन तरुणांत एकाला कोविडचा गंभीर धोका आहे. अमेरिकेच्या नॅशनल हेल्थ इंटरव्ह्यूमधून ही आकडेवारी समोर येते आहे.
24 ते 34 या वयोगटातही जे स्मोकर्स आहेत, त्यांना अधिक गंभीर धोका संभवतो असं अमेरिकेत फ्लोरिडाचा सीडीसी सव्र्हे सांगतो.