शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
4
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
5
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
6
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
7
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
8
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
9
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
10
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
11
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
12
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
13
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
14
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
15
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
16
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
17
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
18
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
19
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
20
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

इंजिनिअर्सचा लोंढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:15 PM

जॉब नाही, असेल तर त्याच्यात मन रमत नाही आणि आहे तो जॉब टिकेल की नाही सांगता येत नाही अशा अवस्थेतल्या इंजिनिअर्सची तडफड शोधणारा विशेष अंक

देशभरातील इंजिनिअर्सना आता कंपन्यांमध्ये इण्टर्नशिप कंपलसरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.देशभरात दरवर्षी सुमारे आठ लाख तरुण इंजिनिअर होतात. आणि त्यातले फक्त ४० टक्के तरुण इंजिनिअर नोकरीसाठी ‘लायक’ ठरतात, ही भारत सरकारने जाहीर केलेली आकडेवारी आहे.एवढेच नव्हे, तर अ‍ॅस्पायरिंग माइण्ड्स या संस्थेच्या अभ्यासानुसार तर देशभरात इंजिनिअर म्हणून डिग्री घेऊन बाहेर पडणारे फक्त पाच टक्के उत्तम इंजिनिअर ठरतात. बाकीचे ९५ टक्के इंजिनिअर म्हणवायच्या योग्यतेचेही नसतात.नॅशन एम्प्लॉईबिलिटी रिपोर्ट अर्थात राष्ट्रीय रोजगार क्षमता अभ्यासानुसार ही आकडेवारी योग्य असून, देशभरातील इंजिनिअर्सच्या गुणवत्तेचा मोठाच प्रश्न आहे.इंजिनिअरची रोजगार क्षमता वाढवणं आणि मेक इन इंडिया अभियानाला चालना देणं या दोन हेतूंनी अलीकडेच सरकार आणि आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन या संस्थेनं इंजिनिअर्ससाठी इण्टर्नशिप सक्तीचा निर्णय घेतला आहे.आणि महाविद्यालयांना ताकीद देत सक्ती केली आहे की, तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी कंपन्यांमध्ये इर्ण्टनशिप शोधा.हे सारं वातावरण एकीकडे बदलत असताना, दुसरीकडे इंजिनिअरिंग प्रवेशासाठीची धावपळही आता सुरू झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे प्रवेशाचे वाद आणि त्यातून होणारे घोळ सुरूच आहेत.आणि दुसरीकडे आयटी क्षेत्रात नोकर कपात, इंजिनिअर्सना न मिळणाºया किंवा घटणाºया नोकºया यामुळे उद्योग क्षेत्रात चिंतेचं वातावरण आहे.त्यामुळे तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल किंवा इंजिनिअरिंग करायचं ठरवत असाल किंवा इंजिनिअर होऊन नोकरी शोेधत असाल तर तुमच्यासाठी या अंकात इंजिनिअरिंग जगाचं एक वास्तव चित्र आहे..ते चित्र सुखद नाही, त्यात हॅपी एण्डिंग तूर्तास दिसत नाही..पण निदान जी वस्तुस्थिती आहे ती पाहण्याची ताकद तरी आपण कमवली पाहिजे, तर कदाचित योग्य मार्ग सापडू शकेल..तो सापडावा..म्हणून तरुण इंजिनिअर्सच्या जगात घेऊन जाणारा हा एक खास अंक..