शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

THE END..अ‍ॅण्ड दे लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 07:00 IST

संपलं! म्हणजे खरंतर माझ्या सवयीचं, रूटीनचं सगळं संपलं! हा धक्का पचवताना, त्या रु टीनबाहेरचं, आपल्याला न सुचलेल्या सुरु वातींची शक्यता असणारं काहीतरी आता दिसेल, नवं काही सुरु होईल असं आपल्याला का वाटत नाही? शेवट आनंदाची सुरुयातही असू शकतो, अशा शक्यता ज्यांना दिसतात, ते स्वत:चं जगणं बदलतात. कधी कधी जगही बदलून टाकतात.

योगेश दामले

समाप्त.दी एण्ड.ला फीन.अंजाम.लेखाच्या सुरूवातीलाच हे शब्द वाचून कुठेतरी अस्वस्थ वाटलं ना?वर्ष संपत आलंय. संपण्याची हुरहुर. अस्वस्थता मनाशी असतेच. ताळा करतोच आपण मनाशी या वर्षानं काय दिलं, काय हिसकावून घेतलं इत्यादींचा.ही अस्वस्थता जानेवारीचा एखादा आठवडा जाणवते. आपण सवयीने २०१७ अशीच तारीख लिहीतो. ८ जानेवारीनंतर हा बदल अंगवळणी पडतो. यंदाही हे सारं २०१९ च्या ८ जानेवारीपर्यंत राहील. शेवटी हुरहुर कसली? गेलं वर्ष सरल्याची, ओळखीचं काहीतरी संपल्याचीच!शेवट या कल्पनेबद्दलची ही अप्रीती सवयीनेच आपल्यात भिनलीय.ही सवयही किती वर्षं जुनी?हा हिशोब वर्षांच्या गणतीत नाही, शतकांच्याही नाही.आपण झाडावरून गुहेत गेलो तेव्हापासूनच्या हजारो वर्षांचा आहे.झाडावर नसलेली बेगमीची, निवाºयाची सोय गुफेत लाभली. फांदीवरून झुलण्याचा शेवट तितका काय तो गोड मानला. तोही मानवाने नाही बरं का! मर्कटाने!!मर्कटाला स्थैर्य, सुशेगात, कम्फर्ट मानवला आणि तो मानव झाला.पुढे भटकंती त्याच्या स्वभावाचा भाग झाली, पण त्या भटकंतीच्या मुळाशीही स्थैर्याच्या शोधाचीच भूक राहिली.मग स्थैर्याची सवय, व्यसनात पालटली.आहे तसं चालू देण्याची तयारी. ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ पासून आपण मिरवू लागलो ते भय्या दादर उतरोगे? म्हणत लोकलमध्ये सुखाने चेंगरत राहीपर्यंत!या बदल टाळण्याच्या सुप्त वृत्तीतूनच नव्या वर्षाचे निर्धार आपसूक मोडतात.अकरा महिन्यांनी घर बदलायला नको म्हणून घरमालकाच्या नाकदुºया काढल्या जातात. दंतवैद्याच्या खुर्चीतली वेदना नको म्हणून रोज थोडीथोडी दाढदुखी अंगावर काढली जाते. मुळात ‘ परिवर्तन ही संसार का नियम है’ या पुराणातल्या वानगीचं वांगं करून, ‘बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे’ असंच आपण जगतो.या बदलाबद्दलच्या अढीला कुणीही नॉर्मल माणूस अपवाद नाही.आपण काही विणलेला खोपा रिकामा टाकून उडणारे सुगरणपक्षी नाही.आपण आहोत अकराअकरा महिन्यांच्या भाडे कराराने वैतागलेले, स्थिर छपराखाली जगता यावं म्हणून गृहकर्जाच्या धोंड्याखाली दडलेले गरीब जीव आहोत. दरमहा इएमआय भरत ‘सेटल झालो’ या भावनेची किंमत मोजत बसतो.जमलं तर ‘परमनण्ट’ नोकरीत चिकटून बसायचा प्रयत्न करतो.मग सात वर्षांत सहा नोकºया बदलणारा माणूस आपल्याला येडच्याप वाटतो.(तीस वर्षं एकाच आॅफिसात काम करण्याच्या सवयीचं बारसं आपण ‘निष्ठा’ असं केलंय). तीन बॉयफ्रेन्ड मोडून चवथ्याशी भांडायला निघालेली मुलगी आपल्या चारित्र्याच्या रूढ व्याख्यांत बसत नाही.पण आपल्याला पटन नाही म्हणून काळ थांबला नाही.सवयीची नोकरी निवृत्तीत संपली की माणूस बेचैन होतो.सवयीचं नातं ब्रेकअप, मृत्यू, घटस्फोटात संपलं की त्याचं होणारं दु:ख आपल्याला जिवंतपणी संपलेल्या नात्यापेक्षाही जास्त डाचतं.सगळं संपलं! (म्हणजे खरंतर माझ्या सवयीचं, रूटीनचं सगळं संपलं) हा धक्का पचवताना, त्या रु टीनबाहेरचं, आपल्याला न सुचलेल्या सुरु वातींची शक्यता असणारं काहीतरी आता दिसेल, सुरु होईल ही शक्यताच आपण डोळसपणे कधीही पाहत नाही.पण त्या शक्यता ज्यांना दिसतात, ते स्वत:चं जगणं बदलतात. कधी कधी जगही बदलून टाकतात.लढाऊ वैमानिक व्हायचं हे सवयीचं सुखस्वप्न भंगलेला एक मुलगा मिसाइलमॅन एपीजे अब्दुल कलाम झाला.असाच सवयीचा इंजिनिअरिंग डिप्लोमा पोटापाण्याच्या कामी न आलेला एक मुलगा, तो पुढे सुपरमॉडेल मिलिंद सोमण झाला.जुनं स्वप्न भंगल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकलीही असेलच.पण जमिनीवरून अस्मानात उडालेल्या यांना अक्षरश: दाही दिशा मिळाल्या.त्या तुम्हाआम्हाला जमिनीवर मिळतात?छे! आपण नाकासमोरचं रुटीन. आणि परत माघारी! याच चकरा मारतो.कारण?- सवय!डॉ. कलाम आणि मिलिंदच्याही वाट्याला शून्य येऊन गेलं.पण आपल्याला शून्यात पोकळी दिसते. अंतराळ दिसत नाही.त्यांना ते दिसलं असेल.त्या अंतराळात शिरून पाहा‘खरंच, कल्पना करा, तुम्ही अधांतरी आहात.तुम्हाला बांधणारं, खेचणारं गुरूत्वाकर्षणच नाहीये.त्या अंतराळात सुटलेलं काही परत मिळणार आहे? -नाही.मग सुटलेल्याचा सोस कशाला करायचा?

समाप्तीतही एक सुख दडलं आहे. ते अनुभवता येईल?-येतंच!!ताटात नावडत्या वांग्याबरोबर आवडतं श्रीखंड असतंतेव्हा आपण नावडता पदार्थ आधी संपवतो.वांगं संपल्याचं सुख श्रीखंडाच्या पहिल्या स्पर्शात दडलेलं असतं.जिममध्ये व्यायाम करतांना देव देव आठवतो.४८ पुशअप्स कल्पनेतही नसतांना मारले जातात.मात्र ‘कमॉन! डू मोअर!’ असं म्हणणाºया ट्रेनरला त्याक्षणी बुकलावंसं वाटतं.पण घरी जातांना दुखºया स्नायूंतलं खुलणारं सौंदर्य खुणावत असतं.समाप्तीचं सुख त्या पन्नासाव्या पुशअपमध्ये आहे.धोक्याची कल्पना, नाळेचे वेढे, कमरेचं खिळखिळं हाड,या टेबलावर आपल्याला असं सोडून बाहेरनातेवाईकांना मजेत व्हॉट्सॅप करणारा नवरा,अजून ढकल, पूश कर, पुश कर असं कर्कश्शपणे सांगणारी डॉक्टर,या सगळ्यांचा विसर पाडणारा एक जिवंत, जांभळागुलाबी पोटचा गोळा हातात येतो.तेव्हा वेदना समाप्तीचं सुख त्या शेवटच्या पण जीवघेण्या कळेत आहे.तलम सुरकुत्यांच्या जाळीतून ओसंडणारा लळा विसरून,समोर पडलेला देह शांत झालाय.डॉक्टरांचं ‘वी आर सॉरी’ आपल्या कानीही पडत नाहीय.त्या अधांतरी क्षणात आपणआजीच्या जन्मभराच्या खस्ता,लहानपणची सांगोवांगीची गरिबी,तिचं आपल्या आईला वाढवणं, पुढे आपल्याला सांभाळणं,आणि आपल्या चिंतेतून शेवटपर्यंत मोकळं न होणं एका निमिषात जगतो.मग आजीच्या अर्धमिटल्या, विझलेल्या डोळ्यात पाहतो.ती या सगळ्यापलिकडे गेल्याचं, सुटल्याचं तिच्या शांत चेहºयावरून जाणवतं.समाप्तीचं नखभर सुख या भेसूर क्षणाच्या मुठीतही दडलेलं असतं.मुळात ना, समाप्ती हा फारच छोटा शब्द आहे.तो आपल्याला माहित असलेल्या जगाच्या वेशीवर उभा असतो.एखादी गोष्ट आपल्या जगातून संपली,म्हणून का जगावर जगबुडी आलीय?आणि आपलं जग म्हणजे कोण?तर पंधरा नातेवाईक, चवदा स्टेशनं, चार आॅफिसेस, तीन गावं इतकंच!मात्र त्यापलिकडे एक मोठं जग आहे!इतकंच कशाला, तुमच्याआमच्या महाराष्ट्रातल्या सूर्यास्तालाअर्ध्या पृथ्वीपलिकडील कॅलिफोर्नियात पहाट म्हणतात!म्हणजे काय? तर सूर्य आहे तिथेच आहे.फक्त तुमचं सत्य आणि अमेरिकत शिकणाºयातुमच्या मित्राचं सत्य पूर्णत: विरु द्ध आहे.म्हणून एखादी गोष्ट संपली तरी तिची समाप्ती आपल्यापुरती आहे.तिच्यातला परस्पपविरु द्ध पण तितकाच खरा नवा आरंभही असतोचअवतीभोवती कुठंतरी. तो दिसला पाहिजे फक्त.

आता पुन्हा पाहा.श्रीखंडा आधी, श्रीखंडासाठी संपवलेली वांग्याची भाजी.दुखणारं, पण बळकट होणारं शरीर.वठलेलं, पण झडून हवा मोकळी करणारं नातं.रडवणारं,पण रडता रडता हसवून आनंदाने रडायला लावणारं बाळ.हसवणारी, पण हसता हसता रडवून, इतरांसाठी हसत राहणं शिकवून गेलेली आजी.आणि आपल्यातून जाणारं २०१८ही समाप्तीची, भैरवीची वेगवेगळी रूपं आहेत.त्या भैरवीवर प्रेम केलं,तसं तिच्यानंतर येणाºया शांततेवर, रिक्ततेवरही करता येईल..हा शेवट असला तरी आरंभही दूर नाहीच..त्या नव्या मैफलीसाठी तयार व्हा..