शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

सूर्यप्रकाशात उजळून निघणारी नवी करिअरची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 13:10 IST

सौरऊर्जा हे क्षेत्र झपाटय़ानं विकसित होत आहे. तंत्रज्ञ आणि तज्ज्ञच नाही तर अगदी सौरऊर्जा सल्लागार्पयत अनेक संधी या क्षेत्रात तयार होत आहेत.

ठळक मुद्देसोलर एनर्जी एक्स्पर्ट - ‘या’ संधीवर नजर हवी!

अतुल कहाते  

सौरऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळत असलेली ऊर्जा. ती साठवण्यासाठी अलीकडच्या काळात ‘फोटोव्होल्टाइक सेल (पीव्ही सेल)’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बॅटर्‍या वापरल्या जातात. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्नामध्ये मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या ट्रान्झिस्टर, डायोड यांच्यासारख्या उपकरणांसारखीच ही पीव्ही सेल असते. सध्याच्या हिशेबानुसार एक पीव्ही सेल वीजनिर्मितीच्या कामात किमान तीन दशकं उपयुक्त ठरू शकत असल्यामुळे तिचं आयुष्य तसं चांगलं मानलं जातं. त्यातच या तंत्नज्ञानामध्ये सातत्यानं सुधारणा होत असल्यामुळे अनेक ठिकाणी वीजनिर्मितीचं मुख्य साधन म्हणून सौरऊर्जा वापरण्याचं प्रमाण नजीकच्या काळात वाढणार यात शंका नाही. जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, तेल तसंच कोळसा यांच्यासारख्या इंधनांच्या साठय़ांवरच्या मर्यादा हे सगळं आपल्याला सौरऊर्जेकडे वळायला भाग पाडेल अशी दाट शक्यता आहे.

संधी कुणाला?

सौरऊर्जेशी संबंधित असलेली निरनिराळी कामं करू शकणार्‍या तंत्नज्ञांची गरज म्हणूनच इथून पुढे भासणार आहे. त्यात सौरऊर्जानिर्मितीची यंत्नणा तयार करणं, सौरऊर्जा साठवू शकणार्‍या पीव्ही सेल्स बनवणं, ही सगळी यंत्नणा जुळवणं आणि तिची निगा राखणं, यामधल्या तांत्रिक अडचणी दूर करणं अशा असंख्य कामांचा समावेश होतो. जर्मनीनं तर केव्हाच सौरऊर्जेकडे खूप मोठय़ा प्रमाणावर वळायचं ठरवलं आहे. भारतानंही सौरऊर्जेला महत्त्वाचं स्थान दिलं आहे. हळूहळू डिझेल आणि त्यापाठोपाठ पेट्रोल याऐवजी वीज हेच वाहनांसाठीचं इंधन म्हणून वापरलं जाण्याचं प्रमाण वाढत जाणार हेही स्पष्ट दिसतं आहे. अशावेळी सातत्यानं सुधारणा होत चाललेलं सौरऊर्जेचं तंत्नज्ञान अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.सध्या सौरऊर्जेशी संबंधित असलेले पूर्णवेळचे अभ्यासक्र म नसले तरी अनेक अभियांत्रिकी स्वरूपाच्या अभ्यासक्र मांमध्ये त्याविषयीचं प्राथमिक प्रशिक्षण दिलं जातं. काही ठिकाणी मात्न फक्त सौरऊर्जेशी संबंधित असलेले अल्पकालीन प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. वर्तमानपत्नांमध्ये त्याच्या अधूनमधून जाहिराती येत असतात. साधारण पाच दिवसांमध्ये अगदी सर्वसाधारण तांत्रिक ज्ञान असलेला कुठलाही माणूस अशा प्रशिक्षण वर्गाला हजेरी लावून सौरऊर्जेबाबतचं जुजबी ज्ञान मिळवू शकतो. अर्थातच प्रत्यक्ष कामातूनच याविषयीचा अधिक अनुभव मिळू शकतो. शिवाय हे काम बहुतेक वेळा विजेशी संबंधित असल्यामुळे या क्षेत्नात काहीही करण्यापूर्वी ‘वायरमन’सारख्या प्रशिक्षण वर्गालाही हजेरी लावणं महत्त्वाचं ठरतं. अन्यथा कधीकधी यातून जीवघेणे अपघात घडू शकतात.

स्कोप का आणि किती?या संदर्भातली एक महत्त्वाची कारकीर्द म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतींचं सौरऊर्जीकरण करण्याची असू शकते. म्हणजेच एखादं गृहसंकुल तयार आहे आणि आता त्यावर सौरऊर्जा निर्मितीसाठीचे पॅनेल्स बसवायचे आहेत. मुळात हे शक्य आहे का, ते नेमकं कसं केलं पाहिजे, त्यामुळे इमारतीच्या सौंदर्याला बाधा येऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, सौरऊर्जा निर्मितीमधल्या अनेक पर्यायांपैकी नेमका कोणता पर्याय निवडला पाहिजे, या सगळ्यांची रचना कशी केली पाहिजे या गोष्टींचा विचार यात होतो. अर्थातच सिव्हिल इंजिनिअर किंवा संबंधित पदविकाधारक, वास्तुरचनाकार अशा प्रकारच्या क्षेत्नांमधल्या काही गोष्टी शिकून घेतलेल्या माणसाला आता सौरऊर्जेसाठीच्या पर्यायांशी संबंधित असलेलं हे काम जमू शकतं. म्हणजेच अशा क्षेत्नांमध्ये मूळ पदवी घेऊनही सौरऊर्जेकडे वळता येईल.सौरऊर्जेला आता सरकारकडूनही पाठिंबा मिळत असल्यामुळे सौरऊर्जा वापरणार्‍या लोकांना सवलती मिळू शकतात. या नेमक्या कशा प्रकारच्या असतात, त्याचे फायदे-तोटे काय असतात, त्याच्याशी संबंधित असलेल्या करांचे मुद्दे कसे असतात, तसंच यामधल्या कायदेशीर गोष्टी कोणत्या असतात अशा प्रकारची माहिती असलेल्या लोकांची गरजसुद्धा भविष्यात भासणार आहे. म्हणजेच ज्याला सौरऊर्जेशी संबंधित असलेलं शारीरिक स्वरूपाचं काम करायचं नसेल आणि ‘डेस्क जॉब’ हवा असेल अशा तरु ण/तरुणींनासुद्धा या प्रकारच्या कामाकडे वळणं शक्य होईल. याशिवाय सौरऊर्जेसंदर्भातील साधनं, तांत्रिक वस्तू हे विकण्याचा व्यवसायही करता येईल. अर्थात भारतात अशा प्रकारच्या गरजा निर्माण व्हायला अजून थोडा काळ जावा लागेल. मात्र या संधीवर आपली नजर असलेली बरी!