शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
2
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
3
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
4
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
5
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
6
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
7
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
8
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
9
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
10
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
11
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
12
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
13
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
14
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
15
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
16
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
17
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
18
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
19
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

मनाच्या दुखण्यांवर फुंकर घालणार्‍या मनमोकळ्या दोस्तांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 13:24 IST

मानसिक आजारांनी त्रस्त असणार्‍यांना मदत हवी आहे. वाढते आजार ही रोजगार संधी व्हावी हे काही बरं नव्हे; पण तसं झालंय.

ठळक मुद्देमानसिक आरोग्य क्षेत्रात उत्तम मनुष्यबळाची गरज वाढते आहे.

अतुल कहाते 

ताणतणाव आणि मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्या हा प्रकार माणसाला काही नवा नाही. जसजसं माणसाचं आयुष्य अधिकाधिक धकाधकीचं होत गेलं आणि एकत्न कुटुंबपद्धतीपासून माणूस जसजसा विभक्त कुटुंबपद्धतीकडे जात राहिला तसतसं या ताणतणावांचं प्रमाण अजून गंभीर होत गेलं. जे लोक आपल्या आयुष्यात लौकिक अर्थानं अपयशी ठरतात त्यांना तर या ताणतणावांच्या समस्या सतावताच; पण ‘यशस्वी‘ ठरलेल्यांचीही यातून सुटका होऊ शकत नाही! एकीकडे आपण काही करू शकलो नाही याचा तणाव, तर दुसरीकडे हे सगळं करून आपण नेमकं काय मिळवलं, असा प्रश्न. याच्या जोडीला नातेवाईक, मित्न-मैत्रिणी, सहकारी यांच्याशी संबंधित असलेल्या मुद्दय़ांवरून येणारे ताणतणाव वेगळेच. नवरा-बायकोमध्ये स्मार्टफोन आणि व्हॉट्सअ‍ॅप यांच्यापासून कुणी कशात पुढाकार घ्यायचा आणि  माघार घ्यायची यावरून होत असलेला विसंवाद तर आता घरोघरी दिसतो. आधीच्या पिढीला कसं आणि कुणी सांभाळायचं तसंच पुढच्या पिढीशी कसं जुळवून घ्यायचं या मुद्दय़ांवरूनही अनेक घरांमध्ये सगळं बिनसलेलं दिसतं. एकूण काय स्ट्रेस आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न आता मोठे होत चालले आहेत. शिक्षणाकडे दुर्लक्ष किंवा त्यामधली कामगिरी एकदम घसरणं, व्यसनं लागणं, स्मार्टफोन आणि इंटरनेटचं अ‍ॅडिक्शन यामुळे असंख्य प्रश्न निर्माण होणं ही कोवळ्या वयातल्या मुलांची भीषण समस्या बनली आहे.

संधी कुणाला?जवळपास प्रत्येक शाळा, महाविद्यालय, कार्यालय अशा ठिकाणी आता मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या समुपदेशकांची नेमणूक केली जाते. मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्या मोठय़ा रोजगार संधीला निमित्त ठराव्यात हे काही फार बरं लक्षण नव्हे, निकोप सक्षम समाजाचं लक्षण तर अजिबातच नाही; पण निदान मदतीचा हात देणारी आणि त्याविषयी उघड मदत मागणारी माणसं आता उपलब्ध असणं ही चांगलीच गोष्ट आहे. अर्थातच हे काम करणं अजिबातच सोपं नाही. त्यासाठी मानसशास्त्नाचा सखोल अभ्यास करणं, अनेक ‘केस स्टडी’ स्वतर्‍ कुणाच्या तरी हाताखाली हाताळणं अशा अनेक गोष्टी पारंपरिक अभ्यासक्र माखेरीज कराव्या लागतात. आपलं व्यक्तिमत्त्व अशा प्रकारचं काम करण्यासाठी योग्य आहे का हेसुद्धा आपण योग्य माणसांकडून तपासून घेतलं पाहिजे. संभाषणकौशल्य आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असल्याशिवाय आपण समोरच्या माणसाचा विश्वास संपादित करू शकत नाही याची प्रत्येक होतकरू समुपदेशकानं जाणीव ठेवलीच पाहिजे!

स्कोप का आणि किती?मानसिक समस्या वैयक्तिक तसंच सामूहिक पातळीवर समजून घेऊन त्यातून योग्य दिशा दाखवू शकणार्‍या समुपदेशकांची प्रचंड मोठय़ा प्रमाणावर गरज आत्ताच भासते आहे. मानसिक प्रश्न अधिकाधिक जटिल आणि गंभीर होत चाललेले असल्यामुळे ही गरज आणखी वेगानं वाढणार यात शंका नाही. मानसशास्त्नाच्या पदवीच्या शिक्षणापासून फक्त मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्यांचा ऊहापोह करणार्‍या अभ्यासक्र मांर्पयत असंख्य शैक्षणिकपर्याय त्यासाठी उपलब्ध आहेत. याविषयात गांभीर्यानं अभ्यास करून विविध क्षेत्रात काउन्सिलर, शाळा-कॉलेजात समुपदेशक, कार्पोरेट जगातलं काम आणि स्वतर्‍ची स्वतंत्र प्रॅक्टिस अशा अनेक संधी या क्षेत्रात आहेत. भविष्यात त्या वाढणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात तर त्या अधिकच वाढत जाणार आहेत.