दोन तासात फुल मॅरेथॉन पळणारा सुपर ह्युमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 07:00 AM2019-10-17T07:00:00+5:302019-10-17T07:00:02+5:30

1 तास 59 मिनिटे 40.2 सेकंद !.. काय आहे हे? हे आहे मानवी क्षमता आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतीक ! म्हणून तर ताशी 21 किलोमीटर वेगानं धावत त्यानं मॅरेथॉन रेकॉर्ड केलं!

Eliud Kipchoge -Super Human who ran the full marathon in two hours | दोन तासात फुल मॅरेथॉन पळणारा सुपर ह्युमन

दोन तासात फुल मॅरेथॉन पळणारा सुपर ह्युमन

Next
ठळक मुद्देएल्यूइड किपचोगेनं केलेला हा इतिहास आणि हे नाव कधीच पुसलं जाणार नाही, एवढा मोठा विक्रम त्यानं करून ठेवला आहे..

-मयूर  पाठाडे 

एक तास 59 मिनिटे 40.2 सेकंद !..
काय आहे हे?
हे आहे मानवी क्षमता आणि त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतीक!
नवं सर्वोच्च रेकॉर्ड!
कॅनडाचा धावपटू एल्यूइड किपचोगे यानं परवाच फूल मॅरेथॉनचं आतार्पयतचं (जे पूर्वीही त्याच्याच नावावर होतं) रेकॉर्ड मोडलं आणि मानवी क्षमतांच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला.
दोन तासांच्या आत फूल मॅरेथॉन (42 किलोमीटर) धावणं हे आतार्पयत अनेकांचं केवळ स्वपAच असलं तरी अनेक धावपटू आजर्पयत त्यासाठी प्राणपणानं प्रय} करीत होते.
हे आव्हान मानवी क्षमतांच्या पलीकडे नसलं तरी अशक्यप्राय आहे असं विज्ञानही सांगत होतं. मानवी क्षमतांची उंची अटकेपार नेऊन ठेवताना आणखी किमान काही वर्षे तरी हा विक्रम मोडला जाणार नाही, याची तजवीज एल्यूइडनं करून ठेवली आहे. 
मॅरेथॉन ही लांब पल्ल्याची शर्यत. तुमचा दमसांस दीर्घकाळ टिकवणं आणि आपल्या क्षमतेचा अंदाज घेत, एनर्जी टिकवत पळत राहणं, पळत राहणं हे या शर्यतीचं प्रमुख उद्दिष्ट आणि या स्पर्धामध्ये यशस्वी होण्याचं गमकही ! पण या सार्‍या उद्दिष्टांची आणि त्यातल्या तंत्राचीच एल्यूइडनं पार मोडतोड करून टाकली आणि मॅरथॉनला चक्क ‘स्पिंट’मध्ये बदलून टाकलं ! ताशी तब्बल एकवीस किलोमीटर वेगानं धावणं हे कदाचित फक्त रोबोटलाच शक्य होऊ शकेल; पण एल्यूइडनं ते प्रत्यक्षात आणलं.
पण हे काही एका रात्रीत घडलं नाही. त्यामागे वर्षानुवर्षे त्याचा ध्यास एल्यूइडनं घेतला होता. त्याच एका स्वपAानं त्याला पछाडलं होतं. मॅरेथॉनमधले अनेक विक्रमही त्याच्या नावावर आहेत. तब्बल चार वेळा लंडन मॅरेथॉनचं विजेतेपद त्यानं पटकावलेलं आहे. पण दोन तासांत मॅरेथॉन पूर्ण करणं या स्वपAानं त्याला पछाडलं होतं. गेल्या वर्षीही बर्लिनमध्ये त्यानं तसा प्रय} केला होता; पण केवळ एक मिनिटानं त्याचा विक्रम हुकला होता. त्यानं ही मॅरेथॉन दोन तास एक मिनिट आणि 39 सेकंदात पूर्ण केली होती ! पण हा वाढीव एक मिनिटही त्याला आणखी कमी करायचा होता.
त्यासाठी त्यानं आणखी जिवापाड मेहनत घेतली. आपलं टायमिंग सुधारण्यासाठी अपरंपार कष्ट घेतले. दिवसरात्र कशाचाही विचार न करता अधिकाधिक खडतर परिस्थितीत धावण्याचा सराव केला आणि अखेर तो जिंकला !
जे आजर्पयत केवळ एक मानवी स्वपA होतं ते प्रत्यक्षात आलं.
एल्यूइड म्हणतो, ‘हे स्वपA पूर्ण झाल्याचा आनंद कल्पनातीत आहे. खूप मोठं प्रेशर होतं. स्पर्धेपूर्वी केनियन राष्ट्राध्यक्षांपासून तर अनेक नामांकित लोकांचे फोन येत होते. अशा परिस्थितीत कामगिरीचं आणखी मोठं दडपण तुमच्यावर येतं. कदाचित त्या दडपणाखाली तुमची कामगिरी आणखी खालावते. पण मी खरंच स्वपA सत्यात उतरवलं आहे. मुख्य म्हणजे इतिहास लिहिला आहे. माझी कामगिरी मोडीत काढण्यासाठी आणखी अनेकांना त्यामुळे प्रेरणा मिळेल; पण माझी कामगिरी कायम सुवर्णाक्षरांनीच लिहिलेली राहील ! मानवी क्षमतांना मर्यादा नाही, हे मी पुन्हा एकदा नव्यानं सिद्ध केलं आहे.’
रॉजर बॅनिस्टर या धावपटूनं बर्‍याच वर्षापूर्वी एक विक्रम नोंदवला होता. एक मैलाचं अंतर त्यानं केवळ चार मिनिटांच्या आत पूर्ण केलं होतं. त्यानंतर अशा प्रकारचं रेकॉर्ड करण्यासाठी तब्बल 65 वर्षे लागली !
एल्यूइडचे कोच पॅट्रिक सॅँग म्हणतात, त्यानं अक्षरशर्‍ मिलिटरी शिस्तीनं रात्रीचा दिवस केलं. प्रय}ांत कुठलीही कमतरता ठेवली नाही. तुमच्यात जिद्द आणि अपार मेहनतीची तयारी असेल, तर मानवी क्षमतांना कुठल्या उंचीवर नेऊन ठेवता येतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे एल्यूइड ! विक्रम मोडण्यासाठीच असतात. कदाचित नंतर आणखी कुणी तरी हे रेकॉर्ड मोडेल; पण ‘इतिहास’ कधीच बदलला जाणार नाही.
खरं आहे हे. एल्यूइड किपचोगेनं केलेला हा इतिहास आणि हे नाव कधीच पुसलं जाणार नाही, एवढा मोठा विक्रम त्यानं करून ठेवला आहे..

**********

.पण विक्रम ‘अधिकृत’ नाहीच!

एल्यूइडनं इतिहास रचला,
.पण
त्याचा हा विक्रम ‘अधिकृत’ मात्र मानला जाणार नाही.
त्याला अनेक कारणं आहेत.
एक तर आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक संघटनेनं आयोजित केलेली ही कुठलीही मान्यताप्राप्त स्पर्धा नव्हती.
एल्यूइड ज्या मार्गावर धावला, तो रुट बर्‍यापैकी फ्लॅट होता, त्यात कोणतेही चढउतार नव्हते, शिवाय रस्ता सरळ होता.
एल्यूइडनं या विक्रमासाठी 41 पेसमेकर्सची मदत घेतली होती. एल्यूइडला प्रेरणा देण्यासाठी, त्याची कामगिरी उंचावण्यासाठी दर ठरावीक अंतरानं हे नामांकित धावपटू त्याच्या पुढेमागे पळत होते. 
ठरावीक वेळानं एल्यूइडला पाणी, एनर्जी ड्रिंक वगैरे गोष्टी मिळत होत्या. इतर मॅरेथॉन स्पर्धामध्ये या गोष्टी धावपटूला रस्त्यावर असणार्‍या स्टॉल्सवरूनच घ्याव्या लागतात.
त्यामुळे एल्यूइडचा हा विक्रम ‘अधिकृत’ म्हणून मानला जाणार नसला, तरी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक संघटनेनंही या प्रय}ाबद्दल त्याचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

*********

 

Web Title: Eliud Kipchoge -Super Human who ran the full marathon in two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.