शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

इट प्रे अ‍ॅण्ड लव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 10:22 IST

एक असं जग जे आपल्याला सोबत करतं, प्रश्नं विचारतं आणि भानावरही आणतं..

अमेरिकन लेखिका एलिझाबेथ गिलबर्ट हिचं हे पहिलं पुस्तक नाही. ती तिच्या लेखणीतून वाचकांना खिळवत आलेली आहे. पण इट प्रे अ‍ॅण्ड लव्ह हे पुस्तक तसं खास आहे. कारण ते तिच्या स्वत:च्या आयुष्यावर आधारित आहे असं ती म्हणते.३२ वर्षांच्या एलिझाबेथचा घटस्फोट झाला तेव्हा ‘माझ्या आयुष्यातलं सारं काही संपलं’ अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. खरंतर अनेक वर्षे तिचे आणि तिच्या नवऱ्याचे वाद होत असत. पण कसं असतं ना, की काही काळ गेला की आपल्याला आपल्या आसपासच्या माणसांची सवय होऊन जाते. ती माणसं नसली की आपल्याला हरवल्यासारखं वाटतं. एलिझाबेथबद्दल नेमकं तेच झालं.या मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी एलिझाबेथने बाहेर पडायचं ठरवलं. आणि या हरवलेल्या मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी, स्वत:ला शोधण्यासाठी ती प्रवासाला निघाली. एलिझाबेथ ही लेखिकेपेक्षा खरंतर पत्रकारच होती. तिचं सुरुवातीचं पॅशन म्हणजे ट्रॅव्हल रायटिंग पण संसाराच्या गराड्यात ती हे सगळं विसरूनच गेली होती. या प्रवासामधून तिनं तिचं आयुष्य पुन्हा सुरू करायचं असं ठरवलं. या तिच्या वर्षभराच्या प्रवासामध्ये ती तीन देश फिरली- इटली, भारत आणि इंडोनेशिया. प्रत्येक ठिकाणी तिला नवी माणसं भेटली. नव्या अनुभवांमधून ती समृद्ध झाली. आणि तिला जगण्यातला सूर पुन्हा गवसला, अशी ही गोष्ट आहे.तिच्या या पुस्तकामधून आपण एक ट्रॅव्हलॉग म्हणजे भ्रमणकथा वाचतो आहोत असं वाटतंच नाही. आपण एलिझाबेथशी मैत्री करायला लागतो. अनेक वेळा तिच्यामध्ये स्वत:लाही शोधायला लागतो. एखाद्या मैत्रिणीबरोबरच्या सहज संवादासारखं तिचं लिखाण आहे.या पुस्तकावर आधारित याच नावाची फिल्मही आली आहे. ज्युलिया रॉबर्ट्सने एलिझाबेथचं काम केलं आहे. कमाल फिल्म आहे ती. हे पुस्तक, मूळ इंग्रजीमधलं नक्की वाचा. या पुस्तकाचा मराठी अनुभवादही उपलब्ध आहे.eat pray & love असा सर्च मारला तर या सिनेमाचे ट्रेलरही पाहता येतील.- प्रज्ञा शिदोरे pradnya.shidore@gmail.com