शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

..अ डॉग टेल! प्रेमाची अबोल भाषा सांगणारे दोन सुंदर अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 08:45 IST

- प्रज्ञा शिदोरेमाणूस आणि प्राण्याचं नातं ते कित्येक हजार वर्षांचं. इतर प्राण्यांपासून संरक्षण मिळावं, निसर्गातले धोके आधीच समजावेत यासाठी माणसानं जंगली कुत्र्यांना माणसाळवलं. आता माणसाला त्याचं रक्षण करण्यासाठी कुत्र्यांची गरज नाही, पण एवढ्या हजार वर्षांच्या एकत्रित प्रवासामुळे माणूस आणि प्राणी हे नातं घट्ट झालं. आजही अनेक कुटुंबं अशी आहेत ज्यांच्या ...

- प्रज्ञा शिदोरे

माणूस आणि प्राण्याचं नातं ते कित्येक हजार वर्षांचं. इतर प्राण्यांपासून संरक्षण मिळावं, निसर्गातले धोके आधीच समजावेत यासाठी माणसानं जंगली कुत्र्यांना माणसाळवलं. आता माणसाला त्याचं रक्षण करण्यासाठी कुत्र्यांची गरज नाही, पण एवढ्या हजार वर्षांच्या एकत्रित प्रवासामुळे माणूस आणि प्राणी हे नातं घट्ट झालं. आजही अनेक कुटुंबं अशी आहेत ज्यांच्या घरात कुत्रा हा त्या घराचा अविभाज्य भाग आहे. याच विषयावर जॉन ग्रोगन या पत्रकारानं एक कमाल पुस्तक लिहिलं आहे ‘मार्ली अ‍ॅण्ड मी’. या पुस्तकावर आधारित एक चित्रपटही गाजला आहे.

कुत्र्याचं पिल्लू आणणं, त्याची काळजी घेणं, त्याला सवयी लावणं (लावण्याचा प्रयत्न करत राहणे! कारण शेवटी काही कुत्र्यांची शेपूट... ) मग त्याचं वृद्धत्व, आणि मग काही अवघड निर्णय. मार्लीच्या या सर्व प्रवासाचं जॉन मस्त वर्णन करतो.तसाच कमाल चित्रपट म्हणजे ‘हाचि- अ डॉग्ज टेल’. हाचि हा जपानमधील आकिता जातीचा एक कुत्रा. या जातीचे कुत्रे कमालीचे निष्ठावंत. ही गोष्ट आणि त्या कुत्र्याची आणि त्या मालकाची. हाचि दर दिवशी आपल्या मालकाला स्टेशनपर्यंत सोडायला येत असतो आणि नेमक्या त्याच्या यायच्या वेळी त्याला घ्यायला जात असतो. एकदा त्याचा मालक आॅफिसला जातो; पण त्याचा तिथेच मृत्यू होतो. तो परतच येत नाही. तर हा हाचि त्याची रोज ट्रेन यायच्या वेळेला वाट बघत बसतो. एक नाही दोन नाही तर हाचि स्वत: जाईपर्यंत, म्हणजे तब्बल ९ वर्षं!तुमचा असा जीवाभावाचा प्राणी दोस्त असेल वा नसेल, नितळ प्रेमासाठी हे सारं आवर्जून पाहा. प्रेमाची परिभाषा किती वेगळी असते हे यानिमित्तानं आपल्यालाच जाणवतं.

रिचर्ड गेरचं अप्रतिम काम असलेला हा चित्रपट यू ट्यूबवर तुम्हाला कधीही बघता येईल!

पाहाhttps://www.youtube.com/watch?v=BSZk2Ozo2fU