शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
3
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
4
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
5
मुलाखतीदरम्यान 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर चिडले, काम सोडतो म्हणाले; नेमकं काय घडलं?
6
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
7
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
8
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण
10
मतदान केलं नाही म्हणून पक्षाने पाठवली नोटीस; BJP खासदार म्हणाले, "सभेला बोलवलं नाही तर मी..."
11
असं काय झालं की RBIनं सरकारला दिले ₹२.११ लाख कोटी, इमर्जन्सी रिस्क बफर का वाढवला?
12
किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला
13
बिघाड असलेली पोर्शे वडिलानेच दिली आपल्या लेकाच्या ताब्यात; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
14
मुकेश अंबानींच्या ₹१५००० कोटींच्या अँटिलियापेक्षाही मोठ्या घरात राहतात राधिकाराजे गायकवाड; माहितीये कोण आहेत त्या?
15
पुण्यातील पोर्शेच्या घटनेनंतर यूपी पोलीस ॲक्शनमोडवर; २ मुलांच्या मृत्यू प्रकरणी एकाला ६ महिन्यांनंतर अटक
16
कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...'
17
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
18
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
19
मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली
20
चोरी गेलेले, हरवलेले हजारो मोबाइल दिले परत; सीईआयआर पोर्टलच्या मदतीने केला तपास

आठ तास झोपेचं महत्त्वं माहिती आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 6:48 PM

मानवी मेंदूसाठी झोप फार आवश्यक.पण शांत झोपण्याची परवानगी आपण मेंदूला देतो का?

-प्रज्ञा शिदोरे 

जवळ जवळ प्रत्येक रात्री आपल्या शरीरामध्ये मेटामॉफरेसिस म्हणजे कायापालट होतो. आपला मेंदू हा बदल घडवून आणतो. आपला मेंदू हे बदल त्याच्या वागणुकीत आणि उद्देशामध्ये करतो. आपली शुद्ध काही काळासाठी मालवून आपला मेंदू अक्षरश: ‘आवरा आवर’ करतो.  आपल्याला पुढच्या दिवसासाठी तयार करत असतो. हे सारं ते करत असतो तेव्हा आपण झोपतो!

कोणत्याही शारीरिक क्रि येपेक्षा ‘झोपणं’ याविषयी समजून घेणं खूपच अवघड. कारण झोपलेला ‘शुद्धी’तच नसतो ना ! पण, इस. पूर्व 350 मध्ये अँरिस्टॉटलने पहिल्यांदा ‘ऑन स्लीप अँण्ड स्लीपलेसनेस’ नावाचं पुस्तक लिहिलं. त्यानंतर 2300 वर्ष कदाचित काहीच घडलं नाही. 1924 मध्ये र्जमन शास्त्रज्ञ हान्स बर्जर यानं इलेक्ट्रोएनसीफ्लॉग्राफचा शोध लावला. यामुळे मेंदूमधल्या घडामोडी लक्षात येणं सोपं झालं. यामुळे झोपेचा शोध वैचारिक पातळीवरून शास्त्रीय पातळीवर शोध सुरू झाला. 

सध्याच्या काळात आपण आपल्या झोपेला फारच कमी लेखत असतो. ‘झोपेचं कर्ज’ ही आपली जीवनशैली बनत चाललं आहे. ‘इफ यू स्नूज, यू लूज’, जो थांबला तो संपला वगैरे वाक्प्रचार आपल्या शरीरासाठी  सर्वात आवश्यक अशा झोपेपासून आपल्याला दूर करत असतात. एवढंच नव्हे तर आपल्या आजूबाजूची आमिषं आपल्याला झोपेपासून दूर दूर नेतात. कसं असतं ना, की आपण जर चांगले 8 तास झोपलो, तर रात्रीच्या सिरिअल्स कोण पाहणार, हॉटेल्स कशी चालणार, सिनेमे कसे चालणार. माणूस ‘कन्झ्युमर’ किंवा उपभोक्ता झाला आणि हे सर्व प्रश्न सुरू झाले.अरियाना हफिंग्टन (हफिंग्टन पोस्ट या ऑनलाइन वृत्तपत्राच्या संपादक) यांनी नेमकं या विषयावर ‘स्लीप रिव्होल्यूशन’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. 2016 साली प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक अमेरिकेत लगेचच हिट झालं. आपल्याला झोपेची आवश्यकता का आहे, त्यामुळे आपल्या मनावर - शरीरावर कसे परिणाम होतात, कमी झोपेमुळे आपण रोगांना कसं आमंत्रण देतो हे विषय या पुस्तकात हाताळले आहेत.

याविषयी रसेल फॉस्टर यांनी ‘आपण का झोपतो’ या विषयी टेड टॉक दिलं आहे. ते तुम्हाला टेड टॉकच्या वेबसाइटवर बघायला मिळेल. हेसुद्धा नक्की ऐका.   

या सगळ्यांचं बेसिकली म्हणणं काय? 

तर लोकहो. प्लीज रोज आठ तास शांत झोपा !