शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

तुम्हाला १० डोकी आहेत का?

By admin | Updated: January 14, 2016 21:29 IST

१० ते १६ जानेवारी हा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह. त्यानिमित्तानं खबरदारीचे उपाय सांगितले जात आहेत. अनेक शहरांत हेल्मेटविना वाहन चालविणाऱ्यांना पोलीस दंड ठोठावत आहेत.

 - दिलीप भट , अमरावती

१० ते १६ जानेवारी हा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह. त्यानिमित्तानं खबरदारीचे उपाय सांगितले जात आहेत. अनेक शहरांत हेल्मेटविना वाहन चालविणाऱ्यांना पोलीस दंड ठोठावत आहेत. पण त्यापलीकडे ही हेल्मेट सक्ती का महत्त्वाची आहे, हे सांगणारा हा विशेष लेख..
महाराष्ट्र हे स्वत:ला सर्वात प्रगत राज्य आहे असं मानण्यात धन्यता मानते; पण मग ते आधुनिक वैज्ञानिक विचार आचरणात का आणत नाहीत? आता हेच पाहा, सध्या हेल्मेट सक्तीला सर्वत्र विरोध होतोय. पुण्यासारख्या शहरात हेल्मेट सक्तीविरु द्ध मोर्चा निघाला. हेल्मेट न वापरता ते वापरण्यानं येणाऱ्या संभाव्य अडचणींवरच जास्त चर्चा या मोर्चेकरी विरोधकांनी केली. 
खरं तर संपूर्ण जगामध्ये आणि भारतातील काही राज्यांतही हेल्मेट वापरणं हे अनिवार्य आहे. विदेशामध्ये लहान मुले सायकल शिकतात तेव्हापासून ते मोठ्या व्यक्तीही सायकल चालवताना हेल्मेट घालतात. स्केटिंग करताना, सायकल स्पर्धेसाठी विदेशात सर्वत्र हेल्मेट वापरतात. त्यांना हेल्मेट डोक्याचं संरक्षण कसं करतं हे माहीत असतं, पटलेलंही असतं. तेच सीट बेल्टचंही. कार चालवताना सीट बेल्ट लावणं हे सर्व पाश्चिमात्य देशांत अनिवार्य आहे. सीट बेल्ट जर बांधला नाही तर तत्काळ दंड होतो. आता भारतातसुद्धा सीट बेल्ट लावणे अनिवार्य झाले आहे. 
मात्र आपल्याकडे केलेले नियम कुणी स्वत:हून पाळत नाही म्हणून मग सरकारला हेल्मेट वापरा असं म्हणतही सक्ती करावी लागते. मागील चार-पाच वर्षांपासून हेल्मेट वापरणं आवश्यक ठरवलं गेलं आहे. मात्र हेल्मेट वापरण्याचं थेट कोर्टकज्जे करत जनतेनं प्रयासपूर्वक टाळलंच आहे. अजूनही आपल्याकडे तरुण मुलांना दुचाकी चालवताना होणाऱ्या गंभीर अपघातांची कल्पना नाही. दुचाकी चालवताना ती घसरल्यास डोक्याला दुखापत होते. वळणावरती गाडी घसरल्यास तर ती अधिक गंभीर असते. ही दुखापत गंभीर स्वरूपात होते. दुचाकीची गती प्रतितास फक्त २० किलोमीटर असतानाही चालक जर त्यावरून पडला तर त्यास होणारी दुखापत ही एका मजल्यावरून पडल्यावर होणाऱ्या दुखापतीएवढी असते. ३० किलोमीटर प्रतितास धावणाऱ्या दुचाकीचा अपघात झाल्यास डोके फुटते. ४० किलोमीटर प्रतितास या वेगानं धावणाऱ्या दुचाकीवरून पडल्यास मेंदूला मोठा आघात होऊन, मान मोडून मृत्यू ओढवतो. 
हेल्मेट वापरल्यास अपघातात डोक्याचं संरक्षण होतं, मेंदूला इजा होण्यापासून आपण वाचवू शकतो म्हणून हेल्मेट अनिवार्य आहे. मात्र प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात हेल्मेट न वापरता दुचाकी आणि हेल्मेटची टर उडवणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. मात्र त्यामुळे आपण आपला जीव धोक्यात घालतो आहोत याची जाणीव तरुण मुलामुलींना होत नाही. 
वर्तमानपत्रात रोज दुचाकी अपघाताच्या, त्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या बातम्या प्रसिद्ध होतात. मात्र यापुढे त्या अपघाताच्या बातमीत जर हे प्रसिद्ध झाले की, दुचाकीस्वारानं हेल्मेट घातलेले नव्हते त्यामुळे अपघातात त्याचे डोके फुटून मेंदू बाहेर आला तर हे भीषण वास्तव वारंवार वाचल्यानं तरी अनेक तरुण वाचक स्वत:च्या काळजीपोटी हेल्मेट वापरू लागतील की काय असं मला वाटतं! दुचाकीस्वारांना हे का कळत नाही की, व्यक्तीच्या हाताची, पायाची, बरगडीची हाडं आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार सांधली जाऊ शकतात; पण डोक्याला, मेंदूला इजा झाली तर जीव गमवावा लागतो. निदान हेल्मेट वापरल्यानं डोक्यास गंभीर इजा, दुखापत तरी होत नाही! म्हणून आपल्या सुरक्षिततेसाठी ते वापरायला हवं! हेल्मेट बनवणाऱ्या कंपन्यांना लाभ व्हावा म्हणून ही सक्ती आहे असं म्हणत अपप्रचार करणं, हेल्मेट वापरायला विरोध करणं हा बौद्धिक आडमुठेपणा नाही का? 
- इतरांचा नाही पण आपला जीव वाचवण्यासाठी तरी वाहनं चालवताना स्वत:चं डोकं खांद्यावर शाबूत ठेवायला हवं!
४ 
गैरसमज
हेल्मेटला नाही म्हणणारी
खोटी कारणं !
 
१) हेल्मेट वापरल्यास स्पॉँडिलायटिस होतो?
हे म्हणणं अशास्त्रीय आहे, असं अनेक अस्थिरोगतज्ज्ञांचं स्पष्ट मत आहे. मानेच्या आणि पाठीच्या कण्याच्या चुकीच्या हालचाली आणि बैठकीमुळे स्पॉँडिलायटिस होतो. क्रिकेटमधे विकेटकीपर असतो. त्याचं हेल्मेट हे सर्वसाधारण हेल्मेटपेक्षा अधिक वजनदार असतं. ते हेल्मेट घालून तो वनडेच नाही तर टेस्ट मॅचलाही दिवस दिवस मैदानावर उभा असतो. तरीसुद्धा त्याला स्पॉँडिलायटिस होत नाही, ही महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्यावी. त्यामुळे हेल्मेटने स्पॉँडिलायटिसचा त्रास होतो हे म्हणणं खरं नाही!
२) मागून येणाऱ्या वाहनाने जर हॉर्न वाजवला तर ऐकू येत नाही?
हेल्मेट घातलेले असतानाही ऐकू येतं. मुळात ओव्हरटेक करताना मागून पुढे जाणाऱ्या चालकाने हॉर्न वाजवणं अपेक्षित असतं. आणि ओव्हरटेकही नेहमी पुढच्या गाडीच्या उजव्या बाजूने करावं असा नियम आहे. डाव्या बाजूनं ओव्हरटेक करणं हाच अपराध आहे. मात्र हा अपराध अनेकजण करतात. दुसरं म्हणजे दुचाकीच्या हँडलबारच्या दोन्ही बाजूस दोन आरसे (रिअर व्ह्यू मिरर) असतात. त्यात पाहिलं की आपणास मागून येणारं वाहन स्पष्ट दिसतं. गाडी चालवताना अधूनमधून दोन्ही आरशांवर नजर ठेवावी म्हणजे मागून कुठलं वाहन येतंय, ते ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतं आहे का हे कळेल. आपल्या दुचाकीला हे आरसे नसल्यास ते त्वरित लावून घ्यायला हवेत. तसंही गाडी चालवताना अचानक वाहन थांबवणं, सिग्नल न देता डावी-उजवीकडे वळणं, हे चूक आहे. असं केल्यानं अनेकदा मागून येणारी गाडी पुढच्या गाडीवर आदळते. आणि अशा प्रकारच्या अपघातात हमखास दुचाकी चालकाच्या डोक्यास गंभीर दुखापत होते. हेल्मेट वापरले तर निदान ही दुखापत तरी होत नाही. 
 
३) हेल्मेट वापरलं की जीव गुदमरतो?
हेल्मेटमुळे ऊन, वारा, धूळ यांपासून संरक्षण होतं. महिलांनी, मुलींनी हेल्मेट वापरलं तर त्यांना अतिरेक्यांप्रमाणे चेहरा झाकून घ्यावा लागणार नाही. आणि हे जीव गुदमरण्याचं कारणही काही खरं नाही. हेल्मेटमध्ये व्हेंटिलेशनची व्यवस्था असते. उच्छ्वासामुळे फक्त पावसाळ्यातच गाडी थांबली असताना हेल्मेट समोरच्या विंडशिल्डच्या आतील भागावरती वाफ थंड होऊन पारदर्शकता कमी होते. यासाठी अशा वेळेस विंडशिल्ड उचलल्यास परत ते पारदर्शक होतं. सिग्नलवर गाड्या थांबतात तेव्हा त्या तीस सेकंदाच्या अवधीमध्ये एरव्हीही गुदमरल्यासारखं होतं. सिग्नलपाशी थांबलेली शेकडो वाहनांची इंजिनं चालूच असतात, त्यांच्यातील एक्झॉस्ट फ्युममुळे आणि धुरामुळे वाहनचालकांना एरवीही गुदमरल्यासारखं होतं.
 
४) हेल्मेट सांभाळणं फार कटकटीचं असतं?
हेल्मेट वापरताना येणाऱ्या आणि सांगितल्या जाणाऱ्या अडचणीदेखील अशास्त्रीय आणि अव्यवहार्य आहेत. हेल्मेट आॅफिसमध्ये, दुकानात किंवा इतर ठिकाणी सांभाळत बसावं लागतं असं अनेकजण सांगतात. पण पावसाळ्यात रेनकोट, छत्री आपण काळजीपूर्वक सांभाळतोच ना, कारण ते गरजेचं असतं. तसंच हेल्मेटचंही. एकदा हेल्मेट वापरण्याची सवय झाली की ते सांभाळण्याची सवय होते. दुचाकीला हेल्मेट लॉक करून ठेवण्याची व्यवस्था करता येते. म्हणजे सतत जवळ बाळगण्याची, चोरीला जाण्याचीही भीती नाही.