शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

दीपिका पदुकोन सांगतेय तिच्या एकाकी संघर्षाची अत्यंत व्यक्तिगत कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 4:18 PM

‘कशी/कसा आहेस तू?’ या साध्या प्रश्नाला ‘मी मस्त’ असं उत्तर देताना कुणाची नजर हललेली दिसली, तर तिथं थांबू नका! पुन्हा विचारा! - वाचा लोकमत दीपोत्सव 2018

ठळक मुद्देहे  ‘बोलणं’ सोपं नसतं.  ती अवघड वाट मी चालले.

 दीपिका पदुकोन / लोकमत  दीपोत्सव 

खरं तर सगळं छान चाललं होतं.हातात नवं प्रोजेक्ट होतं.त्यातली नवी आव्हानं होती.स्वतर्‍मधल्या क्षमता नव्यानं गवसत होत्या. उणिवांवर मात करण्याच्या प्रयत्नांमधला आनंद सापडू लागला होता;- आणि अचानक सगळं बदलत गेलं.सगळं नीट चालू असताना अचानक आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटायला लागलं. कामाच्या, स्नेहाच्या माणसांबरोबरच्या सवयीच्या संवादात मध्येच अडथळे यायला लागले. कुणीतरी आपल्याशी काही बोलत असावं आणि बटण बंद करून दिवा विझवल्यासारखा अंधारच वाटेत यावा, तसं ! आतून अचानक विझल्याचे हे क्षण माझ्या सवयीचे नव्हते. सुरुवातीला गडबडले. नंतर सावरून घ्यायला शिकले. तो तुटला क्षण पटकन उचलून मागचा संवाद पुढे चालूच असल्याचं दाखवणं, हा तर माझ्या व्यवसायाचाच भाग होता. ती चतुराई मला सवयीनं साधत गेली. शूटिंग सुरू आहे, मी सेटवर आहे, पुढल्या सीनची चर्चा करते आहे. स्क्रिप्ट्स-डायलॉग्ज-कॉश्चुम्स-रिहर्सल्स-शूट यांनी गजबजलेल्या दिवसाला सामोरी जाते आहे.. इव्हेण्ट आहे, अवॉर्ड शोज आहेत, त्या आधीची तारांबळ आहे.. मी मित्रमैत्रिणींबरोबर डिनरला आले आहे, गप्पांना उधाण आलं आहे.. मी प्रवासात आहे, पोहचल्यावर तिथं जाऊन करायच्या कामांबद्दलचे तपशील, तिथल्या मिटिंग्जमध्ये चर्चेला येणारे विषय अशा नेहमीच्या गोष्टींबद्दल माझी टीम मला अपडेट्स देते आहे.... हे सगळं आधी होतं तसं चालू आहे. ताज्या यशानं नव्या जबाबदार्‍या आणल्या आहेत, त्यामुळे या धावपळीचा वेग वाढला आहे.. त्याबरोबर आलेल्या नव्या आव्हानांशी मी सगळ्या शक्तीनिशी झगडा मांडला आहे..आणि या लढणार्‍या शरीरातलं, त्यामागे धावणार्‍या मनातलं काहीतरी बिनसलं आहे !असं काहीतरी, जे माझ्या सवयीचं नाही. परिचयाचं नाही.डोकं दुखतं. पोट ठीक नाही. शरीरात कुठंतरी असह्य वेदना आहे. या गोष्टी समजतात. त्यावर उपाय केला पाहिजे हे कळतं. त्यामागची कारणंही अनेकदा आपली आपल्यालाच शोधता येतात. ताण आहे. खाण्यापिण्याकडे नीट लक्ष नाही. धावपळ फार झाली. थोडी विश्रांती घेतली की शरीराचा थकवा जाईल. ताण आणणारे विषय-माणसं यांच्याशी ‘डील’ करणंही सवयीनं शिकतोच आपण. .. इथं मी एकटी होते..आणि मला नेमकं काय होतं आहे, हे माझं मलाच कळत नव्हतं.मध्येच विझणार्‍या दिव्यासारखी अचानक आटून जाणारी एनर्जी. कुणाशी काही बोलता-बोलता अचानक काही म्हणता काही न सुचून मध्येच तुटू पाहणारा संवाद. उगीचच डोळे भरून येणं. सगळ्यापासून दूर पळावंसं वाटणं. आपल्याशी कुणी काही बोलायला येऊ नये, नको त्या क्षणी आपण पकडले जाऊ नये अशी एक विचित्र तळमळ.होता होईतो या अशा विचित्र भावनांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्या वर येऊ पाहतात, तर त्यांना आणखीच आत, अंधारात लोटत राहतो. त्या जणू नाहीतच असं स्वतर्‍ला पटवू पाहतो.मीही तेच  करत होते.पण मनाआड दडपलेल्या गोष्टीचं गाठोडं गाठीच्या आत राहीना. हळूहळू ते फुटू लागलं.हे  ‘बोलणं’ सोपं नसतं. ती अवघड वाट मी चालले. मी ती हिंमत केली आणि मला मदत करणार्‍या डॉक्टरांसमोर माझं मन उघडं केलं. पिंजर्‍यात कोंडून घातलेल्या श्वापदासारखी अवस्था होती माझी. बाटलीत बंद केलेला प्राण असावा कुणाचा तशी तगमगीची अवस्था.मला मोकळं व्हायचं होतं. सुटका हवी होती..

 

टॅग्स :Lokmat Deepotsav 2018लोकमत दीपोत्सव 2018