शहरं
Join us  
Trending Stories
1
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
2
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
3
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
4
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
5
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
6
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
7
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
8
‘पीओके’ हा पाकिस्तानचा भाग नाही, इस्लामाबाद हायकोर्टात पाकची कबुली
9
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
10
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार
11
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
12
सुनीता विल्यम्स यांच्या अवकाश मोहिमेला ब्रेक
13
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
14
मनोज जरांगे-पाटील यांचे ४ जूनपासून पुन्हा उपोषण
15
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
16
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
17
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
18
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
19
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
20
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...

काय तो निर्णय घ्याच!

By admin | Published: October 30, 2014 7:37 PM

आपण काही निर्णयच घ्यायचा नाही, काही जबाबदारीच घ्यायची नाही, असं कातडीबचाव धोरण असेल, तर कसं तुमचं करिअर होईल?

विनोद बिडवाईक

आपण काही निर्णयच घ्यायचा नाही, काही जबाबदारीच घ्यायची नाही, असं कातडीबचाव धोरण असेल, तर कसं तुमचं करिअर होईल?

-----------------

आपण आयुष्यात किती निर्णय घेतो. खरं तर हरघडी निर्णयच घेत असतो. गर्दीच्या वेळेस कोणती बस घ्यावी इथपासून ते कुठले कपडे घ्यायचे, कुठलं शिक्षण घ्यायचं, कुठलं करिअर करायचं हे सगळे निर्णय आपल्याला घ्यावेच लागतात. 
गर्दीच्या वेळेस स्पेसिफिक बसने वेळेवर जात, बसायला जागा, विंडो सीटही घेणं हे तुमचं लॉजिक आहे. हे लॉजिक तुमच्या मेंदूत आपोआप प्रोसेस होतं आणि तुम्ही निर्णय घेता.
आपण हे जे रोजच्या आयुष्यात करतो तेच जॉब करताना, ऑफिसातही करावं लागतं.
जेव्हा तुम्ही जॉब करता तेव्हा बरेचसे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. एखाद्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कसं वागायला हवं इथपासून तर अचूक निर्णय घेत काम कसं तडीस न्यावं हे तुमचं तुम्ही ठरवणं अपेक्षित असतं. प्रत्येक गोष्ट तुम्ही बॉसला विचारणो अपेक्षित नाही. संस्थेच्या कल्चरप्रमाणो कदाचित एकादा बॉस सगळे निर्णय घेतही असेल, पण एखादा निर्णय घेतला आणि तो योग्य कसा आहे हे पटवून दिलं तर बॉस ऐकतो, कौतुकही करतो. असं करणारे अनेक कर्मचारी आपल्या अवतीभोवती असतात. 
उमेदवाराकडे ही अत्यंत महत्त्वाची निर्णयक्षमता आहे की नाही हेच बरेचदा मुलाखतीत तपासलं जातं. 
मुलाखतकर्ता बरेचदा एखादी काल्पनिक घटना सांगतो आणि अशा परिस्थितीत तू कसा वागशील? असं   विचारतो. या प्रश्नावर तुमच्या मेंदूचा खरा कस लागतो. एकतर अशा सिच्युएशनचा तुम्ही विचार केलेला नसतो. अचानक ती सांगितली जाते. विचार करायला वेळच नसतो. तेवढय़ातल्या तेवढय़ात मग तुम्हाला बरेचसे अल्टरनेटिव्ह स्वत: शोधावे लागतात. सांगावे लागतात.
त्या घटनेचं तुम्ही कसं विेषण करता आणि भविष्यातील होणा:या परिणामाचा कसा विचार करता हे तुम्ही सांगितलेल्या उत्तरात तपासलं जातं. निर्णय करताना तुम्ही वेगवेगळे पर्याय कसे तपासले आणि योग्य निष्कर्षावर कसे पोहोचलात हे समजून घेतलं जातं. 
खरं सांगायचं तर आजच्या वर्क कल्चरमध्ये प्रभावी निर्णयक्षमता अतिशय आवश्यक आहे. एखाद्या इमेलला काय उत्तर द्यावं या साध्या प्रश्नावर डोकं खाजवणा:या आणि हातावर हात धरून बसलेल्या अनेक व्यक्ती मी अवतीभोवती बघितल्या आहेत. 
मात्र असे निर्णय न घेतल्यामुळे कामाचं प्रचंड तणाव एखाद्या व्यक्तीवर येऊ शकतो. व्यवसायावर नकारात्मक प्रभाव पडतो तो वेगळा. कर्मचा:यांसाठी एअरलाईनची तिकिटे बुक करणा:या फ्रंट ऑफिसच्या कर्मचा:याने वेळेवर तिकिटे बुक केली नाही.  तर तिकिटांची किंमत दुप्पट द्यावी लागते. एक दिवस निर्णय न घेतल्यामुळे तिकिटांची किंमत वाढीव द्यावी लागते. तोटा होतोच.
प्रत्येक व्यवसायात हा नियम लागू होतो. वेळेवर निर्णय घेणं आणि कामाला लागणं महत्त्वाचं. प्रत्येक व्यक्तीचा वाटा आपल्या परीने असतो. अगदी तळातला कर्मचारीही ब:यापैकी कॉस्ट सेव्ह करू शकतो.
मात्र अनेकजण काही निर्णय घ्यायला, स्वत:चं डोकं चालवून काही काम करायलाच कचरतात. पण तं पाहता या प्रभावी निर्णयक्षमतेचं तंत्र खूप कठीण नाही. 
 मुलाखतीत निर्णयक्षमता जोखणारा एखादा प्रश्न आलाच तर शांतपणो परिस्थिती समजून घ्या. विचार करायला एक छोटासा पॉज घ्या. कदाचित भुतकाळात अशाप्रकारची काही परिस्थिती तुम्ही, तुमच्या मित्रने, आईवडिलांनी हाताळली असेल. याचा विचार करा. वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करा आणि महत्त्वाचं म्हणजे भविष्यात या पर्यायापैकी कुठला पर्याय प्रभावी ठरू शकेल याचा विचार करून निर्णय घ्या.
उत्तर देतानाही सांगा की, मी अमुक निर्णय घेईन, त्यामागे हे लॉजिक आहे.
बिचकू मात्र नका, निर्णय घेणं तसं काही फार अवघड नसतो, फक्त जबाबदारी घ्यायची तयारी ठेवाच.