coronavirus : कोरोनानंतर नोकऱ्यांचं काय होईल? आपलं  काय  होईल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 07:25 PM2020-04-09T19:25:53+5:302020-04-09T19:30:43+5:30

जॉब जातील हे नक्कीच, नवे जॉब्ज कमी होतील, हेही नक्की. पण नव्या संधीही समोर येतील. ..अशा काळात तुम्ही काय कराल? काय करू शकाल?

coronavirus: What will happen after lock down time? what about job loss? who will survive & how? | coronavirus : कोरोनानंतर नोकऱ्यांचं काय होईल? आपलं  काय  होईल ?

coronavirus : कोरोनानंतर नोकऱ्यांचं काय होईल? आपलं  काय  होईल ?

Next
ठळक मुद्देपल्याला स्वत:हून काही गोष्टी शिकाव्या लागतील, नजर-नजरिया आणि कामाची पद्धत सगळंच बदलावं लागेल.

अतुल कहाते 


कोरोना विषाणूमुळे जगभरात पसरलेल्या विलक्षण भीतीचा थोडा अलिप्तपणो विचार केला तर ‘‘हेही दिवस जातील’’ असा विश्वास मनात आल्यावाचून राहत नाही.  अशी संकटं कमी-जास्त प्रमाणात यापूर्वी आलेली आहेत आणि इथून पुढेही येतीलच.  या पाश्र्वभूमीवर इथून पुढच्या काळात नेमकी कोणती क्षेत्नं या त्सुनामीतूनही तग धरून राहतील या गोष्टीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. जवळपास अख्खं जगच ‘लॉकडाउन’ झालेलं असतानाच्या काळात आपली जीवनशैली कशी होती याचा विचार केला तरी आपल्याला काही उत्तरं मिळतील.
पुढचे काही महिने, कदाचित वर्षंसुद्धा माणसं आपल्या घराबाहेर असताना खूप सतर्कअसतील; सतत आपल्याला कोरोना विषाणूची बाधा होत तर नाही ना; याचा ते विचार करत राहतील. म्हणजेच हॉटेल, चित्नपटगृहं, शॉपिंग मॉल्स, प्रवास आणि पर्यटन या क्षेत्नांमध्ये त्याचा मोठा परिणाम दिसेल अशी शक्यता आहे.
माणूस लांब जाण्याऐवजी आपण आहोत तिथेच या सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करेल.
आणि तशा सुविधा त्याला पुरवण्यावर भर दिला जाईल. 
या बदलांना पूरक असं आपल्याला रोजगार म्हणून काही करता येईल का या संदर्भातला विचार आपण केला पाहिजे. 
वस्तू आणि खाद्यपदार्थ घरी बसून मागवण्यापासून गोव्याच्या समुद्रकिनार्यावर जाण्यापेक्षा ‘ऑग्युमेंटेड रिअॅलिटी’चं तंत्नज्ञान वापरून तोच अनुभव घरबसल्या घेण्यार्पयत असंख्य बदल यामुळे होऊ शकतात. हे संकट किती भीषण रूप धारण करेल आणि किती काळ टिकेल यावर अर्थातच ते अवलंबून आहे. तरीसुद्धा घरपोच अन्नपदार्थ पोहोचवण्यापासून माहिती तंत्नज्ञान क्षेत्नार्पयत असंख्य प्रकारच्या लोकांना यातून नवी कामं मिळू शकतात. 
शिक्षण, प्रशिक्षण, व्यायाम आणि आरोग्य अशा क्षेत्नांमध्येही घरबसल्या हे सगळं साध्य व्हावं अशी लोकांची अपेक्षा असेल. 
यामुळे ऑनलाइन माध्यमातून निरनिराळ्या गोष्टी शिकवू शकणारे, ‘जिम’मध्ये लोक येत नाहीत म्हणून उदास न होता लोकांकडून त्यांच्या घरीच व्यायाम करून घेऊ शकणारे, अगदी शिकवण्यासुद्धा याच प्रकारे घेणारे असे असंख्य प्रकारचे छोटे उद्योग करणं आता आपल्या घराच्या बाहेर न पडता करणं शक्य होईल. त्यासाठी हे सगळं जमण्यासाठी आत्मसात करावं लागणारं जुजबी तांत्रिक कौशल्य, संगणक आणि इंटरनेट यांची उपलब्धता आणि संबंधित सॉफ्टवेअर मिळवणं गरजेचं असेल. 
पारंपरिक प्रकारे ही कामं करणा:या लोकांना आता वेगानं ऑनलाइन जगाशी जुळवून घ्यावं लागेल. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे फक्त भारतापुरताच आपल्या कामाचा विस्तार न ठेवता काही जणांना परदेशस्थ भारतीयांना किंवा त्यांच्या मुला-मुलींना आपल्या कौशल्याच्या आधारे ग्राहक बनवता येईल. 
त्यामुळे कोरोनामुळे जॉब लॉस होतील, अनेक लोकांच्या हातचं काम जाईल हे जितकं खरं आहे, तितकंच हे ही खरं आहे की, संभाव्य बदल आणि आपत्ती याचा विचार करून आपण आजच तयारीला लागलं पाहिजे.
नुस्तं काळजी करुन काहीही होणार नाही.
त्यापेक्षा आपल्याला स्वत:हून काही गोष्टी शिकाव्या लागतील, नजर-नजरिया आणि कामाची पद्धत सगळंच बदलावं लागेल.
त्यादिशेनं जरा विचार करायचा, आपण योग्य मार्गावर जाऊन थांबायचं म्हणून या काही गोष्टी लक्षात ठेवा.
आता वेळ आहे तर वेळीच त्या करायलाही लागा.
जमेल. प्रयत्न केला तर हे ही नक्की जमेल!

1. ‘कम्फर्ट झोन’
तो आता सोडा! आणि मिळेल ते काम, मिळेल ती संधी
त्यावर झडप घाला!

सर्वसाधारणपणो मध्यमवर्गीय आणि त्यातही मराठी माणूस आपल्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडायला तयार नसतो असं आपण नेहमीच म्हणतो. म्हणजेच अनपेक्षित आव्हानं स्वीकारणं, भराभर बदलणा:या परिस्थितीला तोंड देणं, चाकोरीबाहेरचं काही करून पाहणं हे आपल्याला जमत नाही किंवा ते आपल्याला नकोच असतं. आता मात्न अशा प्रकारचा विचार करणा:या लोकांसमोर मोठे प्रश्न उभे राहणार आहेत; किंबहुना राहिलेच आहेत. अगदी गेल्या महिन्यार्पयत अगदी आरामात आपल्या नेहमीच्या कामात व्यग्र असलेल्या लोकांना कोरोनानं दिलेला धक्का मुळापासून उखडून टाकणारा ठरलेला आहे. आपली इतक्या वर्षांची गृहीतकं एका क्षणात उद्ध्वस्त करणारा हाहाकार या विषाणूनं माजवला आहे. म्हणूनच आपण या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सखोल विचार केला पाहिजे.
इथून पुढे ‘‘मी अमुक प्रकारचं काम करणार नाही’’ किंवा ‘‘मला हे जमेल असं वाटत नाही’’ अशा प्रकारची विधानं करणारा माणूस जगरहाटीच्या चक्र ातून वेगानं बाहेर फेकला जाईल. कोरोना हे आजचं संकट आहे; उद्या कदाचित ते दूर होईलही. तरीही भविष्यात अशा प्रकारची संकटं अत्यंत अनपेक्षितरीत्या विजेच्या वेगानं आपल्यावर आक्र मण करू शकतात याची नांदी या निमित्तानं झालेली आहे. इतकी र्वष फक्त कार्यालयामधल्या खुर्चीवर बसून काम करणा:या लोकांना कदाचित इथून पुढे हस्तकौशल्याची कामं करावी लागतील. शिकावी लागतील.
कोरोनापश्चात काळात कोणते उद्योग वाचतील आणि कोणते नवे उद्योग उभे राहतील याचा विचार प्रत्येकानं करण्याची गरज आहे. या हाद:यामध्ये आपली नोकरी किंवा आपला उद्योग यांचा नाश जरी झाला नाही, किंवा आता आपली नोकरी वाचली तरी पुन्हा असं काही संकट आलं तर तेव्हा काय होईल याचा विचार आत्ता झाला पाहिजे. 
इथून पुढे उद्योगात माणसांचा वापर कमी करून यंत्नमानवांचा वापर अधिक वाढेल हे आपण कधीचं बोलतोय. आता कोरोनात्तर काळात यंत्रमानव अधिक कामाला लागतील.
कंपनी व्यवस्थापन त्यात गुंतवणूक करतील. कोरोनाच्या संकटामुळे केवळ आर्थिकच नव्हे; तर संसर्ग कमी करण्याच्या दृष्टिकोनातूनही याचा विचार नक्कीच केला जाईल. म्हणजेच आपलं काम आधीपासूनच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्नमानव यांच्या तडाख्यामुळे धोक्यात येण्याची चिन्हं होती का याचा विचार न करणा:या लोकांना हा दुसरा धक्का आहे. 
बॅंकांपासून अनेक कार्यालयांच्या स्वागतकक्षामध्ये तसंच इतर प्रकारचं काम करणारे लोक, हॉटेलमधले वेटर्स, विक्री/मार्केटिंग करणारे लोक अशा असंख्य लोकांची जागा यंत्नमानव घेतील. म्हणजेच ‘व्हाइट कॉलर’च नव्हे; तर ‘ब्ल्यू कॉलर’वाल्यांनाही कोरोनानं संकटात लोटलं आहे. त्यामुळे आवडेल ते नाही, मिळेल ते, ज्याची गरज असेल ते असे काम आपण करू हे लक्षात ठेवा.
कम्फर्ट झोन, आवडीचं काम या गोष्टी आताच मनातून काढून टाका.

2. नेटवर्किंग  वाढवा!
संपर्क जितका जास्त, तितकी संधी जास्त. माणसं जोडा,
जोडलेली टिकवा! एकला चलो रे, तर संपलं!

कोरोनापश्चात काळात आपला रोजगार मिळवत राहण्यासाठी आणि तो गमावला असेल तर नव्यानं उभं राहण्यासाठी आपला संपर्क वाढवणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे. नोकरी मिळवण्याच्या पारंपरिक पद्धती आता अपु:या पडतील; हे नक्की. म्हणजेच आपला ‘बायोडेटा’ तयार करून अनेक कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागाला पाठवून आता भागणार नाही. कुठल्या कंपन्यांना नेमक्या कोणत्या प्रकारच्या लोकांची गरज आहे याचा शोध आता स्वत:हून घेणं भाग आहे. रोजगार मेळाव्यांपासून शक्य तितक्या ठिकाणी रोजगारांशी संबंधित असलेल्या संधींचा सतत मागोवा घेतला पाहिजे. 
‘व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्स’चा अपवाद वगळता आपण शाळा/महाविद्यालय या काळातले आपले मित्नमैत्रिणी, आपल्या आधीच्या कामाच्या ठिकाणांचे सहकारी, इतर मित्न/मैत्रिणी, नातेवाईक या सगळ्यांशी संपर्क साधून आपल्याला ठाऊक नसलेल्या रोजगाराच्या संधी कुठून मिळू शकतील का याचा विचार केला पाहिजे. अर्थातच यातून आपल्यासमोर येणा:या काही संधी आपल्या कौशल्यांना तसंच अनुभवाला साजेशा नसतीलही. तरीही त्या न दवडता आपल्याला त्यात काही करता येणं शक्य आहे का याचा ध्यासच घेणं भाग आहे. कित्येकदा लोक ‘‘हा माणूस हे काम करायला तयार होईल का?’’,
 ‘‘याला अशा प्रकारचं काम करणं अपमानास्पद वाटेल का?’’ 
अशा प्रश्नांपोटी ठाऊक असलेल्या संधी आपल्यापर्यंत आणत नाहीत. 
यातून संबंध बिघडण्याची भीतीसुद्धा काही जणांना वाटते. 
आता हे सगळं पार विसरून आणि कशाचीही लाज न बाळगता आपण जवळपास सगळ्या प्रकारची कामं करण्यासाठी तयार असल्याचं लोकांना म्हणूनच सांगणं भाग आहे. आपलं ‘स्टेटस’, आपला अहंगंड हे सगळं आपण कुरवाळत बसण्याची ही वेळ नाही. 
आपल्यासमोर या सगळ्यातून उपलब्ध होऊ शकणा:या रोजगाराच्या संधींचं पुढचं पाऊल म्हणजे आपल्याला त्यासाठीची मुलाखत बहुधा ऑनलाइन माध्यमातून द्यावी लागेल. आपल्याला याची सवय नसेल तर आपण अशा काही मुलाखतींची चाचणी दिली पाहिजे. म्हणजेच आपले मित्न किंवा कुणी परिचित यांना आपली रोजगारासाठीची मुलाखत ऑनलाइन घेत असल्याचा भास निर्माण करून त्याचा सराव आपल्याकडून घ्यायला भाग पाडायला हवं. अन्यथा हाती आलेली संधी केवळ ऑनलाइन मुलाखत नीट देऊ न शकल्याच्या कारणामुळे हुकू शकते. आपण आपला प्रभाव मुलाखतकत्र्यावर ऑनलाइन माध्यमातून कशा प्रकारे टाकू शकू हा विचार केंद्रस्थानी ठेवून त्यासाठी तयारी केली पाहिजे. अशा मुलाखती घेण्याचा त्या माणसालाही कदाचित सराव नसेल हा मुद्दाही विसरून चालणार नाही.
मात्र प्रत्येक माणूस आपल्या कामाचा आहे, माणसांशी संपर्क वाढवा, माणसं जोडा, जोडलेली टिकवा, हेच तगण्यासाठी महत्त्वाचं ठरेल!

3.संधी तसा बायोडेटा
कॉपी पेस्ट बायोडेटाचे दिवस गेले,
जसं काम, तसा बायोडेटा!

रूढ पद्धतीनुसार आपण आपला एक ठोकळेबाज ‘बायोडेटा’ बनवलेला असतो. 
त्यात आपल्याविषयीची प्राथमिक माहिती, आपल्या शिक्षणाचे तपशील, आपला कामाचा अनुभव आणि  इतर उल्लेखनीय गोष्टी यांचा समावेश असतो. तोच बायोडेटा आपण काही तपशील कालानुरूप बदलून वर्षानुवर्षे वापरत राहतो. नोकरी बदलायची वेळ आली तरीसुद्धा आपण तोच बायोडेटा पुढे करतो. त्यात काही बदल नावाची गोष्ट आपल्याला आवश्यक वाटत नाही.
ऑल्विन टॉफ्लर यांनी फार पूर्वी म्हणून ठेवल्याप्रमाणो भविष्यात आपण एकाच एक प्रकारचं काम कायम करत राहण्याची शक्यता आता दुर्मिळ आहे. जर कामाचं स्वरूपच बदलत राहणार असेल तर आपला बायोडेटा तसाच राहून कसा चालेल? 
इथून पुढे कामाचं स्वरूप जशा प्रकारचं असेल त्याला अनुरूप असा आपला बायोडेटा बनवावा लागणार आहे. आपण आपल्या बायोडेटामधली तथ्यं तर बदलू शकत नाही. उदाहरणार्थ आपलं शिक्षण किंवा आपला आजवरचा कामाचा अनुभव यामधले असंख्य तपशील काळ्या दगडावरच्या रेघांसारखे असतात. त्यात बदल काय करणार? म्हणूनच आपण चाणाक्षपणो कुठल्या कंपनीला नेमक्या कोणत्या प्रकारच्या कौशल्यांची गरज आहे याचा विचार करून त्यानुसार आपल्या बायोडेटाला योग्य ती दिशा दिली पाहिजे. 
उदाहरणार्थ समजा आपला अनुभव एखाद्या शाळेत शिकवण्याचा असेल आणि एका कंपनीला ऑनलाइन पद्धतीनं शिकवू शकणा:या लोकांची गरज आहे. अशा वेळी आपण हे काम यापूर्वी केलेलं नाही ही गोष्ट विसरून तातडीनं ऑनलाईन पद्धतीनं कसं शिकवलं जातं, त्यात काय तंत्नज्ञान वापरलं जातं, कोणत्या अडचणी येतात, त्या कशा सोडवल्या जातात या गोष्टी कुणा परिचिताकडून तातडीनं शिकून घेतल्या पाहिजेत आणि किमान आपण ऑनलाईन पद्धतीनं शिकवू शकतो असं आपल्या बायोडेटामध्ये म्हटलं पाहिजे. अन्यथा आपला बायोडेटाच दुर्लक्षिला जाईल आणि मुलाखतीला आपल्याला बोलावलं जाण्याचा किंवा ही मुलाखतसुद्धा ऑनलाईन होण्याचा पुढचा टप्पा उजाडणारच नाही. म्हणजेच आपल्या बायोडेटामध्ये काहीही खोटं न नमूद करता आपण त्याला फक्त समोरच्या संधीनुसार बारीकशी छटा दिली पाहिजे. 
रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी इथून पुढे ऑनलाइन प्रकारच्या विश्वातल्या असल्यामुळे प्रत्येकानं त्याविषयीची किमान माहिती करून घेणं आवश्यक आहे. तसंच संगणक आणि ऑनलाईन विश्वाशी संबंधित असलेल्या कौशल्यांचा उल्लेख आपल्या बायोडेटावर असण्याची खात्नी करून घेतली पाहिजे. कुठलंही काम आता याशिवाय होणं जवळपास अशक्य असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

4. नोकरी नाही,  पैसे  देणारं काम पाहिजे!
पर्मनण्ट पाहिजे, सरकारीच पाहिजे, 9 ते 5 पाहिजे, 
हे सगळं विसरा, उत्तम पैसे मिळाले पाहिजे, नोकरी नाही!

वरवर हे शीर्षक एकदम अचंब्यात पाडणारं वाटेल. आपण व्यावसायिक नसलो तर नोकरीशिवाय आपल्याला उत्पन्न कुठून आणि कसं काय मिळणार? म्हणूनच या शीर्षकाचा विस्तारानं विचार करणं गरजेचं आहे. खरं म्हणजे आजच याच्या पाऊलखुणा दिसायला लागल्या आहेत आणि भविष्यात तर हे चित्न आणखी पक्कं होत जाईल. अनेक कंपन्या आता त्यांचं काम करून घेण्यासाठी कायमस्वरूपी लोक नेमण्याऐवजी कंत्नाटी किंवा तात्पुरत्या तत्त्वावर लोक नेमण्यावर भर देतील. याचं उघड कारण म्हणजे सगळीकडे विलक्षण अनिश्चितता असताना आणि भविष्यात काय घडेल याविषयी कुणीच खात्नीनं भाकीत करू शकत नसताना आपल्या डोक्यावर मोठा भार घ्यायची कुणाची तयारी असणार? 
भारतीयांना कदाचित याची आत्तापर्यंत सवय नव्हती; पण आता मात्न अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही. 
इथून पुढचा काळ एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करण्याचा कदाचित नसेल. त्याऐवजी कंपनीनं सांगितलेलं, नेमून दिलेलं काम ठरावीक काळात एखाद्या कंत्नाटासारखं करणं आणि त्याचा मोबदला घेऊन पुन्हा नवं काम हुडकणं असा प्रवास लोकांना करावा लागेल. म्हणजेच वर्षानुवर्षे एकाच कंपनीला चिकटून राहण्याची चैन आता खूप कमी लोकांना करता येईल. त्याउलट एकाच कंपनीला नव्हे तर अनेक कंपन्यांना आपली कौशल्यं महत्त्वाची वाटली पाहिजेत यासाठी त्यांना धडपडावं लागेल. काही काळ काम करणं, त्यानंतर कामाची वाट बघणं, या काळात निराश न होता बदलणा:या जगाला अनुसरून नवी कौशल्यं आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं या सगळ्याची मानिसक आणि आर्थिक तयारी ठेवावी लागेल. 
दरमहा आपल्याला ठरावीक पगार येत राहील असं समजण्याचा गाफीलपणा परवडणार नाही. कमी-जास्त आणि अनिश्चित उत्पन्न मिळत राहील.
म्हणूनच नोकरी असेल किंवा नसेल; आपण सातत्यानं उत्पन्न मिळवण्यासाठी धडपड केली पाहिजे. 
अल्पकालीन कंत्नाटं, छोटी कामं, ‘फ्रीलान्सिंग’चा प्रकार हे सगळं आपल्यासमोर उभं ठाकलेलं आहे. 
परदेशी हे अनेक वर्षांपासून घडत असलं तरी आपल्याला त्याची सवय नाही. 
आता मात्न ती करूनच घ्यावी लागेल. 
याचाच दुसरा अर्थ म्हणजे एकाच प्रकारच्या कौशल्यावर किंवा कामावर भिस्त न ठेवता आपण आणखी एक-दोन वेगळ्या गोष्टी करू शकतो का आणि त्यातून कमाई करू शकतो का याचाही विचार केला पाहिजे. 
आपल्या छंदांपासून कलांपर्यंत कशाकशातून आपण उत्पन्नाचे नवे मार्ग शोधू शकतो हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

5. जुनी कात टाका, शून्यापासून सुरुवात करा! आपल्या अनुभवाच्या जोरावर आपण यापुढे तगणार नाही, आजचं काय ते बोला!

गेली काही वर्षं माहिती तंत्नज्ञान आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या क्षेत्नांमध्ये तुफान वेगानं होत असलेल्या बदलांविषयी बोललं जात असे. अनुभवी लोकसुद्धा त्यात ज्या प्रकारे कालबाह्य ठरायला लागले ते बघून या क्षेत्नामधले लोक हताश; तर क्षेत्नाबाहेरचे लोक अवाक् झाले. जवळपास सततच नवं काहीतरी शिकत राहण्याचं बंधन या क्षेत्नामधल्या लोकांवर असतं हे बघून ‘‘नको रे बाबा’’ अशी काही जणांची त्याविषयीची भावना झाली. 
आता याचा पुढचा टप्पा आपल्यासमोर आला आहे. माहिती तंत्नज्ञान हेच बव्हंशी उद्योगांच्या आणि क्षेत्नांच्या मुळाशी आल्यामुळे या उद्योगांमध्ये आणि क्षेत्नांमध्येही कालबाह्यतेचा मुद्दा ठळकपणो समोर येत चालला आहे.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर ‘वर्क फ्रॉम होम’ या भारतात सर्वसामान्यपणो ङिाडकारल्या जाणा:या प्रकाराचा नाइलाजानं का होईना; पण बव्हंशी लोकांनी स्वीकार केला आहे. याचा परिणाम ‘कार्यालय’ या गोष्टीवर होईल का? भविष्यात कार्यालयांची गरज खूप कमी होईल का? तसं झालं तर त्याच्याशी संबंधित असलेल्या असंख्य उद्योगांचं आणि लोकांचं काय होईल? करमणुकीसाठी लोक चित्नपटगृहांमध्ये जायचं टाळून घरीच आपल्याला हवं ते बघतील का? 
अशा वेळी जास्त वेळ घरीच राहणा:या लोकांच्या गरजा काय असतील? त्या पूर्ण करण्यासाठी काही उद्योग निर्माण होतील का? त्यात आपण कुठे बसू शकतो का हा विचार व्हायला हवा.
उच्चशिक्षणासाठी प्रामुख्यानं अमेरिका आणि इतरही अनेक देश इथे जाणा:या विद्याथ्र्याच्या संख्येत आता घट होईल का? त्याऐवजी इथेच राहून त्यांना विदेशी विद्यापीठांच्या पदव्या मिळतील का? अशा परिस्थितीत शिक्षण, प्रवास, व्हिसा, परकीय चलन, या सगळ्यासाठीची तयारी यासाठी उभा केलेला डोलारा कोसळेल का? त्या क्षेत्नातल्या लोकांनी वेगानं नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार आत्तापासून केला पाहिजे.
आधीच संकटात असलेल्या ‘रिअल इस्टेट’ क्षेत्नाचं आता काय होईल? महागडय़ा गुंतवणुकी नको म्हणून लोक घरं घ्यायचं एकीकडे टाळतील; पण घरी बसूनच काम करण्याची वेळ वारंवार येऊ शकते याचा विचार करून परवडणारी घरं घेण्याकडे त्यांचा कल असेल का? म्हणजेच निवासी तसंच व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या ‘रिअल इस्टेट’वाल्यांनी नव्यानं याकडे बघणं गरजेचं ठरेल. 
थोडक्यात काय; तर जवळपास प्रत्येक क्षेत्नामधल्या माणसांना कात टाकून नव्या जगाकडे नव्यानं बघण्याची गरज भासेल!


 

6. आज का सोचो, अभी का सोचो!
अल्पकालीन विचार, शॉर्टटर्म प्लॅनिंग हे स्किल नव्यानं शिकावं लागेल!

सर्वसामान्यपणो आपल्याला दीर्घकालीन विचार करण्याचा सल्ला दिला जातो.
ते बरोबरच आहे. आपण धोरणी असलं पाहिजे; आपण पुढची अनेक वर्षं काय घडेल असा दृष्टिकोन ठेवून निर्णय घेतले पाहिजेत. एकीकडे आपण महत्त्वाच्या गोष्टींच्या बाबतीत हे धोरण कायम राखत असलो तरी आताचा काळ अल्पकालीन धोरणांचाही आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कोरोनासारख्या संकटांनी जर क्षणार्धात जगव्यापी घडामोडी घडू शकणार असतील आणि सगळं वैश्विक चित्न क्षणात पार बदलणार असेल तर आपण त्यासाठी सज्ज राहणं गरजेचं नसेल का? अर्थातच त्यावाचून आपण प्रचंड मोठय़ा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण होईल. म्हणूनच अल्पकालीन विचारही आता महत्त्वाचा असेल.
याचा सारांश म्हणजे ‘‘पुढची 1क् वर्षं मी काय करत असेन?’’ यासारख्या मूलभूत आणि दीर्घ टप्प्यांच्या मुद्दय़ांबरोबरच आपण पुढच्या काही महिन्यांचा सतत आढावा घेणं आता भाग आहे. जर आपण हा पुढचा अल्पकालीन टप्पा सुरळीतपणो पार पडू शकलो तरच 1क् वर्षांनंतरचा विचार कामाचा ठरेल. अन्यथा त्या मनोरथांना काहीच अर्थ उरणार नाही. 
प्रख्यात ब्रिटिश अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्सनं कल्ल 3ँी ’ल्लॅ 14ल्ल, 6ी ं1ी ं’’ ीिं ि असं उगीच म्हणून ठेवलं नव्हतं. अल्पकालीन विचार नेमका कसा करायचा? आपल्याकडे सध्या काम नसेल तर तातडीनं ते मिळवण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करायचा. हे काम संपल्यावर पुढचं काम आपण नेमकं काय करू शकू आणि त्यातून काय कमाई होऊ शकेल यासाठीची तयारी करू शकतो. एकाच वेळी एकापेक्षा जास्त काही काम करू शकतो का या मुद्दय़ांकडे आपण गांभीर्यानं बघू शकतो.
अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे दोलायमान झाली असेल तर भविष्यात असं घडू नये यासाठी तरतूद करण्यावर आपण प्रचंड भर दिला पाहिजे. किमान 6 आणि खरं म्हणजे 12 महिने आपल्याला एक दमडीची कमाई झाली नाही तरी आपण या आपत्तीतून तरून पुढे जाऊ शकू यासाठीची आर्थिक तरतूद करण्यासाठी आपण परिस्थिती जरा सुधारल्यावर जीवापाड धडपडलं पाहिजे. म्हणजेच आपला इतक्या काळासाठीचा खर्च सुरू राहण्यासाठीचा आपत्कालीन निधी आपण साठवला पाहिजे, तो सुरक्षित बॅँकेमध्ये ठेवला पाहिजे आणि सर्वसामान्य परिस्थितीमध्ये त्याला अजिबात हात लावता कामा नये. हीच गोष्ट आपण आपल्या कौशल्यांच्या बाबतीत साध्य करण्यासाठी धडपडत राहिलं पाहिजे. असे अल्पकालीन टप्पे सांभाळले तर दीर्घ काळाची काळजी करण्याची गरजच उरणार नाही!


 

Web Title: coronavirus: What will happen after lock down time? what about job loss? who will survive & how?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.