शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

शहरी तरुण गावकरी झाले , आता गावाकडे पाहायची नजर बदलेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 14:51 IST

शिकून कायमचे ‘शहरी’ झालेले आता कोरोनाकाळात गावात परतले, तेव्हा बदलत्या नजरांचे हे काही तुकडे.

ठळक मुद्दे...आता गावी आलेच!

- श्रेणिक नरदे

कुणाचं, कशाचं, कधीचं, कायचं कशाचंच काही सांगता येत नाही. रंकाचा राजा, राजाचा रंक होतो. कल किसने देखा है ? कशाला उद्याची बात. - अशा गोष्टी आपलं जीवन किती बेभरवशाचं आहे हे सांगण्यासाठी बोलल्या जायच्या. मात्र त्यासगळ्याचा अर्थ आता कळतोय. तेव्हाही संकटं होतीच पण कुठंतरी माणूस या सर्व परिस्थितींवर विजय मिळवून. स्ट्रॅटजी आखायचा, प्लॅनिंग करायचा, आपलं भविष्य सुरक्षित, नियोजनबद्ध करायचा. काहीजण तर असे पुढच्या पाच वर्षाचं कशाला कधीकधी दहावीस वर्षाचंही नियोजन करायची. वयाच्या चोविसाव्या वर्षी लग्न, 25व्या वर्षी मुलं, म्हणजे आपण पन्नास वर्षाचे होऊ आणि पोरं हाताखाली येतात. - असा सल्ला काही मुरब्बी लोक लग्नाळू मुलामुलींना द्यायचे. म्हणजे 25 वर्षाचंही नियोजन करताना लोक घाबरत नसायचे. 

आज आताची परिस्थिती अशी आहे, की आपण आज काय करणार आणि  उद्या काय होईल  याचीही शाश्वती नसणारा हा कोरोना काळ शड्ड ठोकून उभा आहे. तो माणसातील दांभिकपणा टारटार फाडून उसवून टाकतोय.आपण तीनचारेक महिने मागचा विचार केला आणि आताचा विचार केला तर हरेक क्षेत्नातील माणसांत काही ना काही बदल झालाय हे नाकारता येणार नाही.  ग्रामीण भागातील लोकांना याचा फार मोठ्ठा फटका बसला असला तरी शहरातही फारसं वेगळं वातावरण आहे अशातला भाग नाही. याआधी पुणो, मुंबई किंवा जिल्ह्याच्या मोठ्ठय़ा शहराकडे ग्रामीण भागातून जाणा:यांची संख्या मोठी होती. पैसा कमवणो हा मूळ हेतू असला तरीही, शहरांबद्दल कुणाला आकर्षण नसतं ? तिथल्या सुखसुविधा, झगमगाट, तिथे असणारी सुरिक्षतता या गोष्टींनी माणसं शहराकडे ओढली जाणं साहजिक होतं. पूर्वी काहीजण जाऊन शहरात स्थायिक झाले होते त्यांचा प्रवास भाडय़ाच्या घरातून स्वत:च्या घराकडे होत असतो. काहीजणांनी तर गावची वाटणीची तीनचार एकर शेती विकून शहरात दोन तीन खोल्याची घरं घेतली होती. हे सगळं बरंच बरं चाललेलं होतं. गावाकडे काय होतं ? गावात वर्षानुवर्षे कर्ज फिरवाफिरवी करत नुकसानीतली शेती चालू होती, नुकसान जरी झालं नाही तरी फारसा फायदाही होत नव्हता. आम्ही झक मारली आमच्या पोरांनी यातून बाहेर पडावं म्हणून आई वडिलांनी इंग्लिश मीडिअम शाळेत पोरं टाकली. पोरं इंग्रजी माध्यमातून शिकून पुढे डिग्री मिळवायची आणि मुंबई-पुणो शहरं गाठायची. यातून गावात जेमतेम शिकून राहीलेले जवळच कुठेतरी एखादी नोकरी करत शेतीही सांभाळायची. मग कधी पेपरातून, टीव्हीवरून परदेशातील मोठ्ठय़ा पगाराची नोकरी सोडून टरबुजाचं विक्र मी उत्पादन घेणार्याची यशोगाथा, कडकनाथ कोंबडी पाळून लाखो कमवा, अशा मोटिवेशनने या बिचा:या गावक:यांचा सापडेल तिथे गळा कापला जायचा. नशिबाला दोष देण्यावाचून यांच्याही हातात काही नव्हतं. त्यावेळीच थोडा अभ्यास केला असता आणि शहरात गेलो असतो तर आपलं तरी कोण तोंड बघितलं असतं ?- असं वाटत रहायचं.

पण हा कोरोना आला. आपल्याकडे त्यावेळी जनता कफ्यरू लावला. ताटय़ा कुटल्या, घंटी वाजवली तरी ते काही जायचं नाव घेईना.म्हणून मग लॉकडाउन चालू झालं तेव्हा शहरांना सौम्य धक्का बसला. लॉकडाउन वाढतच चालला तसे कोरोनाबाधित लोकही वाढू लागले तशी शहरांची चिंता वाढतच चालली. कामच नाही तर पगार देणारे तर कुठून देणार? परिणामी नोकरी चालली, नोकरी गेली, शिल्लक पैसा (?) तोही संपत आलेला. आणि कोरोना कधीही येऊन गाठेल  मग?  गावाकडे चला!  हा एकमेव उपाय होता.  नाइट पँट/ बर्मुडा टीशर्ट, बारीक चाक असलेल्या मोठय़ा बॅगा, गॉगल आणि कानात ब्ल्यूटूथ हेडसेट असा रूबाब असणारे लोक ट्रकला लटकून, दूधाच्या टँकरमध्ये बसून, काहीजण पायी चालत गावाकडे सटकले. आता गावक:यांनीही वेशीला हे भल्ले मोठ्ठे चर खोदून ठेवले होते, काटय़ाकुटय़ा लावून गावात यायला सक्त मनाई केली होती. ही मनाई खरंच सुरक्षेपोटी होती का? की अन्य कशाच्या घुसमटीची प्रतिक्रि या होती ? - हा एक स्वतंत्न चर्चेचा आणि तितकाच महत्त्वाचाही विषय आहे. परगावाहून आलेल्या लोकांना मराठी शाळेत क्वॉरण्टाइन करण्यात येत होतं तेव्हा इंग्रजी मीडिअमला शिकणारे आज मराठी शाळेत जाऊन बसले अशा आशयाचे व्हॉट्सअॅप, टिकटॉक मेसेज, व्हिडीओ शेअर होत होते. आता या शहरातून आलेल्यांना गावात काय दिसलं ? इथं बाकी काहीही असलं तरीही यांची शेती ब:यापैकी सुरू आहे. पैसा मुबलक जरी नसला तरी पैसा येतो आहे. मोठमोठय़ा चैनीच्या गोष्टी नसल्या तरी आपला जीव सुरक्षित आहे याची हमी आहे. माणसाला माणसं तशी धरुन आहेत.या गोष्टींनी शेतीबद्दल वेगळं मत असणार:यांचं मन परिवर्तन झालंच. शेतकरी कसा जगतो नी काय खातो हे कळलं तरी फार. नाही म्हणायला आता शेतक:याचं बाजारमूल्य लोकांच्या दृष्टीने या कोरोनाकाळात वाढतंय. त्यातही आता लगीनसराईचे दिवस.लग्नाचा धडाका उठलाय. पण जुना डामडौल उरला नाही. घराच्या पुढंच मांडवं टाकून पाचपन्नासांच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पडताहेत. गावाला दाखवण्यासाठी जो रूबाब होता तो कुणीच बघायला नसल्यामूळे आता तो रुबाब कमी झालाय. लग्नं या रूबाब, देखाव्याशिवायही होऊ शकतात हे लोकांना पटतंय. होता होईल तितका पैसा लोक वाचवत आहेत. शहरातलाच नवरा पाहिजे, आणि अमूकच हुंडा घेणार म्हणणारे शहरातले तरुणही जरा शांत होऊ लागलेत आता. गेल्या काही वर्षात या देशाचे नागरिक म्हणजे शहरी लोक ही बहुतेक सरकारांची धारणा असायची. कांदा महागला की शहरांना त्नास व्हायचा, शहरांना त्नास झाला की सरकारला व्हायचा, मग सरकारं परदेशाहून कांदा आयात करून शेतक:याला देशोधडीला लावायचे. आता हेच सुजाण शहरवासीय उघडय़ा डोळ्यांनी खेडय़ातली शेती बघताहेत. या निमित्ताने त्यांचं मनपरिवर्तन होऊन निदान काही शेतमाल महागला तरीही आपण थोडं सोसावं ही जाणीव आली तरी जगन्यामरणाच्या काळात खेडय़ांनी दिलेला आधार सफल होईल.कोरोनानं गावाकडं असंही काही बदलायला लागलंय. ते बरंय म्हणायचं.