शहरी तरुण गावकरी झाले , आता गावाकडे पाहायची नजर बदलेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 02:43 PM2020-05-28T14:43:18+5:302020-05-28T14:51:40+5:30

शिकून कायमचे ‘शहरी’ झालेले आता कोरोनाकाळात गावात परतले, तेव्हा बदलत्या नजरांचे हे काही तुकडे.

coronavirus: urban youth back in villages, will it change the attitude towards rural life? | शहरी तरुण गावकरी झाले , आता गावाकडे पाहायची नजर बदलेल का ?

शहरी तरुण गावकरी झाले , आता गावाकडे पाहायची नजर बदलेल का ?

Next
ठळक मुद्दे...आता गावी आलेच!

- श्रेणिक नरदे

कुणाचं, कशाचं, कधीचं, कायचं कशाचंच काही सांगता येत नाही. 
रंकाचा राजा, राजाचा रंक होतो. कल किसने देखा है ? कशाला उद्याची बात. 
- अशा गोष्टी आपलं जीवन किती बेभरवशाचं आहे हे सांगण्यासाठी बोलल्या जायच्या. 
मात्र त्यासगळ्याचा अर्थ आता कळतोय. तेव्हाही संकटं होतीच पण कुठंतरी माणूस या सर्व परिस्थितींवर विजय मिळवून. स्ट्रॅटजी आखायचा, प्लॅनिंग करायचा, आपलं भविष्य सुरक्षित, नियोजनबद्ध करायचा. 
काहीजण तर असे पुढच्या पाच वर्षाचं कशाला कधीकधी दहावीस वर्षाचंही नियोजन करायची. 
वयाच्या चोविसाव्या वर्षी लग्न, 25व्या वर्षी मुलं, म्हणजे आपण पन्नास वर्षाचे होऊ आणि पोरं हाताखाली येतात. 
- असा सल्ला काही मुरब्बी लोक लग्नाळू मुलामुलींना द्यायचे. म्हणजे 25 वर्षाचंही नियोजन करताना लोक घाबरत नसायचे. 

आज आताची परिस्थिती अशी आहे, की आपण आज काय करणार आणि  उद्या काय होईल  याचीही शाश्वती नसणारा हा कोरोना काळ शड्ड ठोकून उभा आहे. 
तो माणसातील दांभिकपणा टारटार फाडून उसवून टाकतोय.
आपण तीनचारेक महिने मागचा विचार केला आणि आताचा विचार केला तर हरेक क्षेत्नातील माणसांत काही ना काही बदल झालाय हे नाकारता येणार नाही.  ग्रामीण भागातील लोकांना याचा फार मोठ्ठा फटका बसला असला तरी शहरातही फारसं वेगळं वातावरण आहे अशातला भाग नाही. 
याआधी पुणो, मुंबई किंवा जिल्ह्याच्या मोठ्ठय़ा शहराकडे ग्रामीण भागातून जाणा:यांची संख्या मोठी होती. पैसा कमवणो हा मूळ हेतू असला तरीही, शहरांबद्दल कुणाला आकर्षण नसतं ? 
तिथल्या सुखसुविधा, झगमगाट, तिथे असणारी सुरिक्षतता या गोष्टींनी माणसं शहराकडे ओढली जाणं साहजिक होतं. 
पूर्वी काहीजण जाऊन शहरात स्थायिक झाले होते त्यांचा प्रवास भाडय़ाच्या घरातून स्वत:च्या घराकडे होत असतो. 
काहीजणांनी तर गावची वाटणीची तीनचार एकर शेती विकून शहरात दोन तीन खोल्याची घरं घेतली होती. हे सगळं बरंच बरं चाललेलं होतं. 
गावाकडे काय होतं ? 
गावात वर्षानुवर्षे कर्ज फिरवाफिरवी करत नुकसानीतली शेती चालू होती, नुकसान जरी झालं नाही तरी फारसा फायदाही होत नव्हता. 
आम्ही झक मारली आमच्या पोरांनी यातून बाहेर पडावं म्हणून आई वडिलांनी इंग्लिश मीडिअम शाळेत पोरं टाकली. 
पोरं इंग्रजी माध्यमातून शिकून पुढे डिग्री मिळवायची आणि मुंबई-पुणो शहरं गाठायची. 
यातून गावात जेमतेम शिकून राहीलेले जवळच कुठेतरी एखादी नोकरी करत शेतीही सांभाळायची. 
मग कधी पेपरातून, टीव्हीवरून परदेशातील मोठ्ठय़ा पगाराची नोकरी सोडून टरबुजाचं विक्र मी उत्पादन घेणार्याची यशोगाथा, कडकनाथ कोंबडी पाळून लाखो कमवा, अशा मोटिवेशनने या बिचा:या गावक:यांचा सापडेल तिथे गळा कापला जायचा. 
नशिबाला दोष देण्यावाचून यांच्याही हातात काही नव्हतं. त्यावेळीच थोडा अभ्यास केला असता आणि शहरात गेलो असतो तर आपलं तरी कोण तोंड बघितलं असतं ?- असं वाटत रहायचं.


पण हा कोरोना आला.
 आपल्याकडे त्यावेळी जनता कफ्यरू लावला. ताटय़ा कुटल्या, घंटी वाजवली तरी ते काही जायचं नाव घेईना.
म्हणून मग लॉकडाउन चालू झालं तेव्हा शहरांना सौम्य धक्का बसला. लॉकडाउन वाढतच चालला तसे कोरोनाबाधित लोकही वाढू लागले तशी शहरांची चिंता वाढतच चालली. 
कामच नाही तर पगार देणारे तर कुठून देणार? परिणामी नोकरी चालली, नोकरी गेली, शिल्लक पैसा (?) तोही संपत आलेला. आणि कोरोना कधीही येऊन गाठेल  मग?  गावाकडे चला!  हा एकमेव उपाय होता. 
 नाइट पँट/ बर्मुडा टीशर्ट, बारीक चाक असलेल्या मोठय़ा बॅगा, गॉगल आणि कानात ब्ल्यूटूथ हेडसेट असा रूबाब असणारे लोक ट्रकला लटकून, दूधाच्या टँकरमध्ये बसून, काहीजण पायी चालत गावाकडे सटकले. 
आता गावक:यांनीही वेशीला हे भल्ले मोठ्ठे चर खोदून ठेवले होते, काटय़ाकुटय़ा लावून गावात यायला सक्त मनाई केली होती. ही मनाई खरंच सुरक्षेपोटी होती का? की अन्य कशाच्या घुसमटीची प्रतिक्रि या होती ? 
- हा एक स्वतंत्न चर्चेचा आणि तितकाच महत्त्वाचाही विषय आहे.
 परगावाहून आलेल्या लोकांना मराठी शाळेत क्वॉरण्टाइन करण्यात येत होतं तेव्हा इंग्रजी मीडिअमला शिकणारे आज मराठी शाळेत जाऊन बसले अशा आशयाचे व्हॉट्सअॅप, टिकटॉक मेसेज, व्हिडीओ शेअर होत होते. 
आता या शहरातून आलेल्यांना गावात काय दिसलं ? 
इथं बाकी काहीही असलं तरीही यांची शेती ब:यापैकी सुरू आहे. 
पैसा मुबलक जरी नसला तरी पैसा येतो आहे. 
मोठमोठय़ा चैनीच्या गोष्टी नसल्या तरी आपला जीव सुरक्षित आहे याची हमी आहे. 
माणसाला माणसं तशी धरुन आहेत.
या गोष्टींनी शेतीबद्दल वेगळं मत असणार:यांचं मन परिवर्तन झालंच. शेतकरी कसा जगतो नी काय खातो हे कळलं तरी फार. नाही म्हणायला आता शेतक:याचं बाजारमूल्य लोकांच्या दृष्टीने या कोरोनाकाळात वाढतंय. 
त्यातही आता लगीनसराईचे दिवस.
लग्नाचा धडाका उठलाय. पण जुना डामडौल उरला नाही. 
घराच्या पुढंच मांडवं टाकून पाचपन्नासांच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पडताहेत.
 गावाला दाखवण्यासाठी जो रूबाब होता तो कुणीच बघायला नसल्यामूळे आता तो रुबाब कमी झालाय. 
लग्नं या रूबाब, देखाव्याशिवायही होऊ शकतात हे लोकांना पटतंय. होता होईल तितका पैसा लोक वाचवत आहेत. 
शहरातलाच नवरा पाहिजे, आणि अमूकच हुंडा घेणार म्हणणारे शहरातले तरुणही जरा शांत होऊ लागलेत आता. 
गेल्या काही वर्षात या देशाचे नागरिक म्हणजे शहरी लोक ही बहुतेक सरकारांची धारणा असायची.
 कांदा महागला की शहरांना त्नास व्हायचा, शहरांना त्नास झाला की सरकारला व्हायचा, मग सरकारं परदेशाहून कांदा आयात करून शेतक:याला देशोधडीला लावायचे. 
आता हेच सुजाण शहरवासीय उघडय़ा डोळ्यांनी खेडय़ातली शेती बघताहेत. 
या निमित्ताने त्यांचं मनपरिवर्तन होऊन निदान काही शेतमाल महागला तरीही आपण थोडं सोसावं ही जाणीव आली तरी जगन्यामरणाच्या काळात खेडय़ांनी दिलेला आधार सफल होईल.
कोरोनानं गावाकडं असंही काही बदलायला लागलंय. ते बरंय म्हणायचं.

 

Web Title: coronavirus: urban youth back in villages, will it change the attitude towards rural life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.