कोरोनाकोंडीत तरुण मुलगे स्वयंपाकाला लागलेत, काय सांगतो त्यांचा अनुभव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 06:50 AM2020-04-23T06:50:00+5:302020-04-23T06:50:07+5:30

मुलगा-मुलगी दोघांना स्वयंपाक आलाच पाहिजे हे खरं; पण आपल्याकडे अनेक मुलगे अजूनही नाहीच करत स्वयंपाक. कोरोनाकोंडीत काही तरुण दोस्तांनी मात्र या कलेचा हात धरला, त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा.

coronavirus : lockdown- young men are cooking delicious food, sharing their experince.. | कोरोनाकोंडीत तरुण मुलगे स्वयंपाकाला लागलेत, काय सांगतो त्यांचा अनुभव?

कोरोनाकोंडीत तरुण मुलगे स्वयंपाकाला लागलेत, काय सांगतो त्यांचा अनुभव?

Next
ठळक मुद्देया स्वयं-पाक-कलेनं त्यांना काय आनंद दिला?

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर


आमच्याकडे पुरुष स्वयंपाकघरात काम करत नाहीत. आम्ही स्वयंपाकासाठी ‘कुक’ ठेवू. 
आम्ही स्विगीवरून मागवू. आम्हाला किचनच्या कामाचा कंटाळा येतो. स्वयंपाकात फार वेळ जातो. - अशी सगळी कारणं आजवर सांगत धकवता आलं.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे ही मिजास बाजूला ठेवावी लागली.
किमान वरण-भात, खिचडी अथवा मॅगी करण्याशिवाय घरी असलेल्यांना सध्या पोट भरणं शक्य नाही हे लक्षात आलं. मॅगी मिळण्याचे दिवसही तसे लवकर संपले.
कुटुंबात बहुसंख्य मुलींना किमान स्वयंपाक करता येतो.
पण मुलगे?
तरुण मुलं?
ज्यांनी कधीच स्वयंपाक केला नव्हता, त्यांचं काय झालं?
काही जणांनी यानिमित्तानं पहिल्यांदाच स्वयंपाकघरात पाऊल ठेवलं. कुणी कुकर लावायला शिकलं, कुणी खिचडी, वरण-भात, ऑम्लेट इथवर पोहोचले.
काही जणांना मात्र त्या करण्यातली मजा लवकर समजली आणि त्यांनी  खिचडीवर समाधान न मानता बिर्याणीपासून ते पराठे, डोसे-केक असे वेगवेगळे पदार्थ करायचे ठरवलं.
आता या स्वयंपाक-कलेत आपण मास्टर होऊ असं म्हणत एकेक प्रयोग उत्साहानं सुरूकेले.
त्यांच्याशी बोलायचं ठरवलं. जरा गप्पा मारल्या. 
*** 
पुण्यात राहणारा कृतार्थ शेवगावकर. इंजिनिअर आणि नाटय़ कलाकार. मूळचा औरंगाबादचा. नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आहे.
लॉकडाउन सुरू होण्याच्या आधी इतर अनेक बॅचलर्सप्रमाणो कृतार्थही मेसमध्ये जेवत होता;  पण 21 दिवसांचं लॉकडाउन सुरू झालं, आणि मग तो जरा चपापलाच. घरात गॅस होताच, आवश्यक तो किराणा आणून आता स्वत:च स्वयंपाक करून पाहूयात, असं त्यानं ठरवलं. 
कृतार्थ सांगतो, ‘लहानपणापासून आई-आजी यांना स्वयंपाकघरात काम करताना मी निरीक्षण केलेलं होतंच, तेच आठवत-आठवत गरज पडेल तेव्हा फोन किंवा व्हिडीओ कॉल करून मी बेसिक स्वयंपाकाची सुरुवात केली. सुरुवातीला मसाला खिचडी, मग कणकेचा अंदाज घेत हळूहळू पोळ्या, बेसिक फोडणीच्या भाज्या केल्या. चवीला चांगलं लागतंय हे कळल्यावर भीड चेपली आणि मग यू-टय़ूब, मित्न-मैत्रिणी आणि घरच्यांसोबतचे कॉल यासोबत मी रोज वेगवेगळे प्रयोग करायला लागलो.’
साध्या वरण-भातापासून सुरू करत आता त्यानं वरणफळं, आलू पराठा, पुदिना पराठा, छोले, वांग्याचे काप इतकंच नव्हे तर कुकरमध्ये केकसुद्धा करून पाहिलाय. मी  केलेली भरल्या वांग्याची भाजी तर मलाच बेहद आवडली होती, असं तो आवजरून सांगतो.
कृतार्थ म्हणतो, ‘स्वयंपाक करताना माझा वेळ फारच चांगला जातो, गेल्या महिन्याभरात मी जवळपास रोज नवा पदार्थ करून पाहिला. त्या वेळात आपलाच आपल्याशी संवाद होतो, पदार्थ छान झाला की आपण खुश होतो. खरं तर या आनंदापासून अनेक पुरुष विनाकारण वंचित असतात. आपल्याकडे उगीचच पुरुषप्रधानतेने अमुक कामं मुलींचीच, असे गैरसमज करून ठेवले आहेत. ते ओलांडून पुरुष खरंच स्वयंपाकघरात आले तर स्व-निर्मितीचा आनंद तर मिळतोच, याशिवाय स्वयंपाक करणा:या घरातील महिलांना मदत होईल. शिवाय चांगला संवाद वाढीस लागेल.’ 
***


पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहाणारा केदार देवही असाच प्रयोगशील आहे.
केदार वकिलीची प्रॅक्टिस करतोय आणि त्याचे उच्चशिक्षणही सुरू आहे. दुर्दैवाने दोन वर्षापूर्वी केदारचे आईवडील गेले, तेव्हापासून तो एकटाच आहे. लॉकडाउन सुरू होण्याच्या आधीर्पयत केदारकडे स्वयंपाकाला मावशी येत होत्या; पण लॉकडाउनच्या काळात त्यांनाही येण्या-जाण्याचा धोका नको, म्हणून केदारने स्वत:च स्वयंपाकाचे प्रयोग करायचं ठरवलं. 
केदार म्हणतो, ‘तसं भात-खिचडी करणं आधीपासून येत होतं; पण स्वयंपाकाच्या मावशी असल्याने पूर्ण स्वयंपाक करण्याची वेळ कधीच आली नव्हती. सुरुवात पोळ्यांपासून केली, सुरुवातीला कणकेत किती पाणी टाकायचं याचा अंदाज न आल्याने कणीक पातळ झाली, कधी जास्तच घट्ट झाली; पण मग नंतर अंदाज आला आणि गोल पोळ्या बनवण्यासाठी ताटलीने कापण्याची फेमस आयडियाही वापरली. साध्यासुध्या भाज्या करायला सुरुवात केली. जमायला लागलं तसं भाकरी करून पाहण्याचा विचार आला. नाचणीचे पीठ मिळाले, सुमारे चार ते पाच वेळा भाकरी करण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी झाला. नाचणीच्या पिठातही पाणी योग्य प्रमाणात टाकणो महत्त्वाचे असते; पण हळूहळू मला टॅक्ट जमली आणि आता मी उत्तम भाकरी करू शकतो. अगदी एक दिवसाआड रात्नीच्या जेवणात मी गरमागरम भाकरीचा आनंद घेतोय.’
आपण केलेल्या भाकरी त्यानं शेजारच्यांनाही दिल्या. त्यांनाही त्या खूप आवडल्या.
केदार म्हणतो ‘माङया आईने इडली-सांबार- चटणीची कृती लिहून ठेवली होती, ते पाहून एक दिवस इडली- सांबार- चटणी असे सगळे बनवले. आईइतके छान नाही झाले; पण मी स्वत:ला शाबासकी देऊ शकलो. मग कोबी, फ्लॉवर, आलू पराठे असे वेगवेगळे पराठे करून पाहिले. सध्या ट्रेण्डमध्ये असलेला बॉरबॉन बिस्किटांचा केकपण करून पाहिला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळात मी स्वयंपाकघरातील निगुतीने करण्याच्या गोष्टी शिकलो. उदा. विरजण कसं लावावं, कडधान्यांना मोड कसे आणावेत इ. या गोष्टी छोटय़ाच असतात; पण या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असतात.’
केदारही फोनवरून स्वयंपाकात एक्स्पर्ट लोकांचे सल्ले घेतो आणि गुगल करूनही अनेक रेसिपीज करून पाहतो. त्याला आता खात्नी आहे की यापुढे हॉटेलमधून मागवण्यापेक्षा स्वत:च पदार्थ करून बघण्यावर त्याचा भर असेल.
****
मुंबईच्या भांडूपचे असणारे संजय कोलटकर. गुजरातला असतात. सुरतपासून जवळ असणा:या सचिन नावाच्या गावी एका परफ्युमच्या कंपनीत ते मेन्टेनन्स सुपरवायझर आहेत. अचानक 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर झाल्याने ते मुंबईत घरी येऊ शकले नाहीत. तेसुद्धा रोज दुपारी मेसला जेवायचे, रात्नी कधीतरी खिचडी करायचे; पण आता हॉटेल्स, मेस सगळेच बंद झाल्याने स्वत:हून स्वयंपाक करायचा त्यांनी ठरवलं. संजयजींकडे इलेक्ट्रॉनिक हॉटप्लेट आहे. शिवाय त्यांना दीक्षित डाएट पद्धतीची जीवनशैली आवडत असल्याने दिवसातून फारफार तर त्यांचे दोनेक तास स्वयंपाकघरात जातात. मुख्यत: दोन वेळचे जेवण बनवण्यावर त्यांचा भर असतो. ते सांगतात, ‘स्वयंपाकाच्या क्षेत्नात मी खरंच अजून विद्यार्थीच आहे. लहानपणापासून आई, नंतर बायको यांना स्वयंपाक करताना पाहिलेले असल्याने ते निरीक्षण मला सध्या स्वयंपाक करताना उपयोगी पडतंय. गरज पडेल तेव्हा घरी फोन करून बायकोचे मार्गदर्शन घेतो. मी सध्या बेसिकच पोळी-भाजी, वरण-भात, आमटी असा स्वयंपाक करतोय. त्यात मी मास्टरी मिळवली आहे, असे म्हणता येणार नाही; पण जे केलंय ते उत्तम प्रकारे सजवून पेश करायला मला आवडतं. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकाचे फोटो ऑलमोस्ट रोज फॅमिली ग्रुपवर शेअर करतो.’ त्यांच्या पदार्थाना कुटुंबाची दाद मिळतेय. त्यांनी बनवलेली रताळ्याची खीर, शिरा आणि तांदळाचे घावन ही त्यांना स्वत:लाही खूप आवडली होती.
 


पुण्यातील नांदेड सिटीमध्ये राहाणारं मेघ आणि डॉ. गीतांजली घोलप हे जोडपं. अफोर्डेबल कन्स्ट्रक्शनमध्ये असणा:या मेघचा स्वत:चा खोपा टेक्नॉलॉजीज नावाचा व्यवसाय आहे. सध्या मेघ आणि गीतांजलीची फेसबुक वॉल तोंडाला पाणी सुटेल अशा पदार्थानी भरून वाहतेय. हैदराबादी बिर्याणी, डबल का मिठा, गुलाब जामुन, रवा डोसा, बंबैया भेळ, घरी बनवलेले पाव. ऑलमोस्ट कोणत्याही लोकप्रिय पदार्थाचं नाव घ्या, मेघनी तो बनविलेला असेलच. म्हणूनच मेघशी बोलायचं ठरवलं. तो म्हणाला, ‘मी खरंच सांगतोय, लॉकडाउन सुरू होण्याच्या आधी मला बेसिक खिचडी, ऑम्लेट एवढेच पदार्थ यायचे; पण मी मुळात भटका आणि अस्सल खवय्या आहे. आता बाहेर कुठेही खादाडी करायला जाता येणार नाही म्हणून मग अगदी बायकोचीही मदत न घेता, मला आवडणारे पदार्थ घरीच बनवायचे ठरवले. आम्ही दोघेही मिळून कोणते पदार्थ करायचे त्याच्या चर्चा करतो आणि मग त्या रेसिपी गुगल करून प्रत्यक्षात बनवितो. माझी बायको फार नेटका संसार करते, त्यामुळे लॉकडाउन सुरू होण्याच्या आधी आमच्याकडे तिने ब:याच भाज्या वाळवून ठेवलेल्या उदा. मेथी, पालक, पुदिना, कांदा, गवार इ. त्यामुळे त्या वापरून, दुकानात सारखं जाणं टाळूनही अनेक चविष्ट पदार्थ मी बनवू शकतो. मला एखादा पदार्थ अगदी मुळापासून तयार करायला आवडायला लागलंय. उदा. सांबार करण्यासाठी विकतचा मसाला आणण्याऐवजी धणो, मिरच्या, डाळी, खोबरं इ. वापरून घरीच ताजा मसाला केला की अप्रतिम चवीचं सांबार तयार होतं, हा शोध मला लागलाय. हैदराबादी बिर्याणी तर इतकी उत्तम झालेली की अक्षरश: शेजा:यांचा फोन आला, काय बनवलंय, आम्हालाही पाठवा. साउथ इंडियन, मुघलाई, पंजाबी, चायनीज अशा सर्व रेसिपीज आम्ही करून पाहतोय. मला त्यात खूप मजा येतेय. आपल्या हाताने आपल्या माणसांसाठी पदार्थ बनवण्याचा आनंद अद्वितीय असतो.’
मेघ सध्या सगळ्या प्रकारचे मसालेही तयार करायला शिकतोय.
***
ही झाली काही उदाहरणं. या काळात अनेक तरुण मुलं पहिल्यांदाच स्वयंपाकघरात गेले. त्यांनी काही पदार्थ करून पाहिले.
पदार्थाचे पोत, रंग, गंध, त्यांच्या हाताला लागले. थोडी वाफ आली हातावर, किंचित चटके बसलेही असतील, मात्र ही पोट भरणारी सुंदर कला त्यांना गवसली असेल. त्यातला आनंद कळला असेल. म्हणतात ना,
कर के देखो, अच्छा लगेगा!!

(स्नेहल मुक्त पत्रकार आहे.)

 

Web Title: coronavirus : lockdown- young men are cooking delicious food, sharing their experince..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.