शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
2
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
3
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
4
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
5
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
6
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
7
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
8
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
9
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
10
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
11
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
12
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
13
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
14
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
15
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
16
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
17
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
18
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
19
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
20
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!

झूम वापरताय? - सावधान, हे वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 12:28 PM

चला झूम मिटिंग करू, गप्पा मारू, ऑनलाइन गेटटुगेदर करू ही अनेकांना गंमत वाटते आहे; पण झूम वापरणं वाटतं तितकं सुरक्षित नाही. ते वापरताना खबरदारी घ्या.

- आवेझ  काझी

लॉकडाऊन वाढला आहे. आता बरेच दिवस झाले अनेक कंपन्या, शासकीय कामकाज, शिकवण्या सगळं ऑनलाइन चाललं आहे. वर्क फ्रॉम होम हा परवलीचा शब्द झाला आहे. त्यामुळे विविध व्हचरुअल अॅप्लिकेशनचा वापर वाढला आहे. एका वेळी 100 व्यक्तींना ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग पुरवणा:या झूम  अँप चा वापर या  कामासाठी जास्त प्रमाणात दिसून येत आहे.चला झूम कॉल करू असं म्हणत ऑफिशियल काम ते अगदी मित्रंच्या गप्पा, नातेवाइकांचं गेटटुगेदर झूमवर पार पडत आहे.दुसरीकडे हे झूम  अँप   हॅक होतं अशा बातम्याही एव्हाना तुमच्यार्पयत पोहोचल्या असतीलच.पण पर्याय नाही म्हणत अनेकजण सर्रास झूम वापरत आहेत.तर हे झूम वापरताना त्याची कार्यप्रणाली आणि वापरताना घ्यायची काळजी हे आपण लक्षात ठेवलेलं बरं.

कुठून आलं हे  अँप ?

1. झूम  अँप हे चीनमधील एरिक युवान या व्यक्तीने क्लाउड मिटिंग्स करता तयार केलेलं  अँप  आहे.2. ज्यात एकाच वेळी 1क्क् व्यक्ती व्हिडीओ चॅट, मिटिंग्स करू शकतात. 40 मिनिटं मोफत बोलता येतं.3. लॉकडाऊन काळात हे सर्व सोयीस्कर असल्याने झूम  अँप चा वापर मागील तीन महिन्यात 2क् पट वाढला आहे. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून झूम  अँप चा धोकापण लक्षात येणो गरजेचे आहे.4. मात्र झूम अॅपचा वापर वेबकॅम आधारित असल्यानं यूजर्सच्या मिटिंग्समधील संवेदनशील डाटा हॅकर चोरी करून मालवेअर, रॅन्समवेअर किंवा पोर्न, खंडणी इत्यादी प्रकारचे गुन्हे करू शकतात. 5. झूम अॅपमध्ये एण्ड टू एण्ड एनक्रिप्शन नसल्यामुळे व्हिडीओ मिटिंग्समधील गोपनीय माहिती सहज काढून ती सायबर स्पेसमध्ये लिक केली जाऊ शकते.

 

 इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (cert-in.org.in) झूम वापराबाबत दिलेल्या सूचना

cert-in हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्नज्ञान मंत्नालयामधील एक कार्यालय आहे. हॅकिंग आणि फिशिंग यासारख्या सायबर घटनांचा सामना करण्यासाठी ही एक नोडल एजन्सी आहे. हे भारतीय इंटरनेट डोमेनच संरक्षण मजबूत करते.तसेच केंद्रीय गृहमंत्नालयानेसुद्धा झूम अॅपबद्दल अॅडव्हायझरी प्रकाशित केली असून, झूम  अँप  वापरताना काही गोष्टींची काळजी घ्या, असं सूचवलं आहे.1. ऑनलाइन मिटिंग्सचे पासवर्ड हे मजबूत (स्ट्रॉँग- अल्पफान्युमरिकल ) असावा.2. प्रत्येक मिटिंग्सच्या वेळी अॅप अपडेट करावं.3. प्रत्येक मिटिंग्सच्या वेळी युनिक/स्वतंत्न पासवर्ड द्यायला हवा.4. प्रत्येक यूझरला मिटिंग्समध्ये डायरेक्ट अॅक्सेस न देता वेटिंग रूमचा ऑप्शन एनेबल ठेवावा.5. अनोळखी व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात यावा.6. या मिटिंगमध्ये महत्त्वाची माहिती,फाईल्स शेअर करू नयेत.7. खासगी संभाषण, वैयक्तिक संभाषण शक्यतो टाळावे.8. आपण क्लाउड मिटिंग्स घेणार आहोत व त्यात कोणता विषय असेल याबाबतची माहिती ज्यांचा विषयाशी संबंध नाही, त्यांना देऊ नये.9. झूम अॅपवर अनाहुतपणो अश्लील संदेश, क्लिप्स किंवा साहित्य त्यातून तत्काल बाहेर पडावे.10. झूम अॅपची गरज असेल तरच हा अॅप मोबाइलमध्ये/लॅपटॉपमध्ये ठेवा. ज्यांना गरज नाही, जे वापरत नाहीत, त्यांनी डिलीट करून टाकलेला बरा.11. स्पायवेअरद्वारे ही माहिती हॅकर चोरून गुन्हे करू शकतात. झूम  अँप संदर्भातील काही गुन्ह्यांची माहिती असल्यास सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क करा.12. अमेरिकन वेबसाइट सी नेटनुसार कॅलिफॉर्नियात झूम  अँप बाबत कायदेशीर कारवाई सुरूकरण्यात आली आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार झूम अॅपमधील हजारो व्हिडीओ लिक होत सायबर स्पेसमध्ये उपलब्ध होत आहेत त्याचा दुरूपयोग होऊ शकतो. जर्मन मंत्नालयाने झूम अॅपवर बंदी घातली आहे. त्याच धर्तीवर केंद्रिय गृहमंत्नालय अॅडव्हाझरी व CERT - IN च्या सूचना पाळणो अत्यावश्यक आहे. सायबर सुरक्षा ही आपली सगळ्यांची सामाजिक जबाबदारी आहे हे कधीही विसरूनये.

(लेखक लातूर येथे पोलीस उपनिरीक्षक असून, सायबर गुन्हे अभ्यासक आहेत.)