कोरोनाचं  आक्रमण ? इकॉलॉजिकल इंटिलिजन्स ही संकल्पना माहित आहे  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 04:38 PM2020-07-09T16:38:46+5:302020-07-09T16:45:23+5:30

मानवी जगण्यावर ते आक्रमण करतात, की माणसं पर्यावरणाचा ऱ्हास करत त्यांना आमंत्रणं पाठवतात.

coronavirus : Ecological intelligence must know this concept | कोरोनाचं  आक्रमण ? इकॉलॉजिकल इंटिलिजन्स ही संकल्पना माहित आहे  का ?

कोरोनाचं  आक्रमण ? इकॉलॉजिकल इंटिलिजन्स ही संकल्पना माहित आहे  का ?

Next
ठळक मुद्देकोरोना आणि त्याचे भाऊबंद

- अतुल देऊळगावकर
 ( ख्यातनाम पर्यावरणविषयक लेखक/पत्रकार)

1) सध्या मास्क, ग्लोव्हज आणि सुरक्षात्मक प्लॅस्टिक वस्तूंचा कचरा वाढतो आहे. कोरोनाचा संसर्ग आणि दैनंदिन आरोग्याच्या दृष्टीनेही तो घातक आहे. वापर करतानाच त्याच्या विल्हेवाटीचा विचार कसा करता येईल?

- कसं आहे, सहसा आपत्ती आल्यावरच आपले डोळे उघडतात. मात्न सर्वसाधारण परिस्थितीत आपण जे वागतो तसंच किंवा त्याच्या काही पट जास्त बरं किंवा वाईट वर्तन आपण आपत्तीच्या काळात करत असतो. मग ते समाजाचं असेल किंवा अधिका:यांचं, नेत्यांचं वर्तन असेल. त्यामुळे कचरा एरव्हीच्या काळात जसा केला जातो त्याहून वेगळा कसा केला जाईल?
वैयक्तिक आणि सामाजिक वर्तन अधिकाधिक जबाबदार झालं पाहिजे हाच आपत्तीचा संदेश असतो. शहर असो की ग्रामीण भाग, रस्त्यावर थुंकणं अजूनही कमी झालेलं नाही. खोकताना तोंडावर हात धरणं हे खरं तर एरव्हीही अंगवळणी पडलेलं असायला हवं होतं तर ते कोरोनाकाळात कामाला आलं असतं. आता तर ते करणं भाग आहे नसता जिवावरच बेतणार आहे. आपण नागरिकशास्नचे धडे केवळ वाचणार असू, त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष आयुष्यात करणार नसू तर आपणच आपल्या लोकशाहीला नख लावतोय असा त्याचा अर्थ होतो. नागरी नियम पाळणं हीसुद्धा देशभक्ती आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे.
आपलं सामाजिक वर्तन सुधारण्यासाठीची, आत्मपरीक्षण करण्यासाठीची ही संधी आहे. नसता नियम तोडण्यातच बहुतेकवेळा आपल्याला पुरुषार्थ वाटत असतो. कच:याबाबतही हेच सांगता येईल. गंमत काय, की आपली श्रीमंती जसजशी वाढत जाते तसा आपला घनकचरा वाढत जातो. आपला कचरा कमी करणं ही आपलीच जबाबदारी असली पाहिजे.

2) तरु ण पिढीला या काळात पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे कुठले प्रयोग करता येतील?

- गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ग्रेटा थनबर्गमुळे जगभरातले दीड कोटी तरु ण रस्त्यावर आले होते. ती तर एक शाळकरी मुलगी होती. ती काय सांगते, विविध वैज्ञानिक, अभ्यासक काय सांगतात, तर आपला पर्यावरणावर पडणारा भार कमी करत नेला पाहिजे. त्याला इकॉलॉजिकल फूटप्रिंट्स म्हणलं जातं. म्हणजे असं, की तुमचा आहार तुम्ही नेमका कुठून मिळवताय? आता  इकॉलॉजिकल इंटिलिजन्सबद्दल बोललं जातंय. तर, तुमचा इकॉलॉजिकल इंटिलिजन्स कशात आहे? तर माझा पर्यावरणावर भार कमी पडला पाहिजे. पाणी मी कमीतकमी वापरलं पाहिजे. स्थानिकतेला प्राधान्य दिलं पाहिजे.
स्थानिकतेला प्राधान्य देणं यातच तर तरुणांसाठी संधी आहे! मोठय़ा आपत्तीत मोठी संधी असते. जगात पहिली महामंदी जेव्हा आली, तेव्हा पहिली औद्योगिक क्र ांतीही झाली. स्थानिक भाज्या, धान्य, डाळी, फळं यांचा लहानसा तरी व्यवसाय उभा करता येईल. समजा, आमच्या लातूर भागात सोयाबीन खूप होतं. तर सोयाबीनवर प्रक्रिया करून आपण काही बिस्किटं, वडय़ा अशी उत्पादनं तयार करू शकू का? ही संधी आपण घेतली पाहिजे. कारण या कोरोनाकाळात तरुणांना नोक:या मिळणार नाहीत, आहे त्या कमी होतील अशी चर्चा आहे. असं असताना स्थानिक ताकदीचा उपयोग करून घेणं जमलं पाहिजे. हे परदेशात सुरू आहे. मात्न जे उत्पादन आपण तयार करतो त्याचा सामाजिक आरोग्यावर काय परिणाम होणार नाही ना, हे पाहिलं पाहिजे.
इसवी सनपूर्व दोनशे वर्षापूर्वी मराठवाडय़ातल्या तेरसारख्या लहानशा गावातून थेट रोमशी व्यापार चालायचा. तिथं बनवली गेलेली हस्तिदंती बाहुली, त्यावरचं कोरीवकाम मशीनवर जमणारच नाही इतकं उत्कृष्ट होतं. मग हे सगळं कौशल्य गेलं कुठे? हे कौशल्य परत आणणं, आणि ते ज्ञानाधारित असणं यावर तरु णांनी लक्ष द्यावं. कोरोनाकाळात ही शक्यता निर्माण झालेली आहे. 

3) एकीकडे हे दिसतं की प्रगत माणूस अगदी सगळ्या निसर्गावरच अधिराज्य गाजवत असल्याचा आविर्भावात जगत असतो. दुसरीकडे पर्यावरणशास्र सांगतं, की मानवाला धोकादायक जीवाणू-विषाणू हे तर निसर्गाचाच भाग आहेत. अशावेळी विषाणूंवर मात, कोरोनावर विजय ही भाषा कितपत खरी आहे? 
- माणसानं निसर्गाचा विध्वंस करत संपत्तीची निर्मिती सुरू केलीय. तो निसर्ग खरवडतोय. मात्न हे खरवडणारे लोक फार थोडे असतात. अगदी एखादा टक्का. त्यांना मदत करणारे दोनेक टक्का. हे पाणी, जंगलं, खनिजांचा विनाश करतात. त्यातून मग खूप मोठय़ा प्रमाणात जंगलांवर अवलंबून असणारे लोक विस्थापित होतात. त्यांना इकॉलॉजिकल रेफ्यूजीज, पर्यावरण निर्वासित असं म्हणतात. त्यांना नाइलाजानं शहरांत जात बकाल जगणं जगावं लागतं.
निसर्ग नष्ट करण्यातून काय झालं, तर गेल्या वर्षी तीन कोटी हेक्टर जंगलांना आगी लागल्या. विशेषत: 1990 नंतरच्या खासगीकरणाच्या लाटेमुळे जंगल नष्ट व्हायला सुरू झालं, कारण आपण जंगलाच्या जवळ, जास्त जवळ जायला लागलो. आपण जंगलांवर अतिक्रमण केलं त्यामुळे जंगलातले प्राणीही शहराकडे यायला लागले. हत्ती, बिबटय़ा, वाघ. जे जीवाणू-विषाणू जंगली प्राण्यांसोबत सुखाने राहात असतात, ते आता माणसांना त्नासदायक ठरू लागलेत. या रोगांना इंग्रजीत झुनॉटिक डिसीजेस म्हणलं गेलंय. प्राणिजन्य रोग. ते 1980 नंतर खूप वाढत चाललेत. त्याचा इशारा 80 सालीच जागतिक आरोग्य संघटनेनं दिला होता. 8क्च्या दशकात आलेला एड्स माकडांमुळे आला. मग वटवाघळं, डुकरं यांच्यामुळे रोग येताहेत. बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, इबोला, सार्स, ही त्याची उदाहरणं. आता डिसीज इकॉलॉजिस्ट प्रकारातले साथरोगतज्ज्ञ सांगतात, की कोरोना हे हिमनगाचं टोक आहे. कोरोना तर सोबतच असणार आहे आपल्या; पण असे अनेक विषाणूही पाठोपाठ येतच राहातील. त्यामुळे तुम्ही या सगळ्यावर मात करणं विसरून जा. फक्त काळाच्या ओघात तुमची प्रतिकारशक्ती वाढेल.
जगात दूषित हवेचे दरवर्षी 70 लाख बळी जातात. जिथं दूषित हवा आहे तिथं या रोगांचा प्रादुर्भाव तीव्र आहे. त्यामुळे तुम्हाला विकासाचाच आता पुनर्विचार करावा लागेल. कारण ही विकासाची किंमत आपण मोजत असतो. 

   
( मुलाखत आणि शब्दांकन - शर्मिष्ठा भोसले) 

Web Title: coronavirus : Ecological intelligence must know this concept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.