कोरोना काळात भांडणं  होण्याची 10 कारणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 04:42 PM2020-04-16T16:42:00+5:302020-04-16T16:43:38+5:30

लॉँग डिस्टन्स रिलेशनशिप कोरोना कोंडीत टिकेल का?

coronavirus : 10 reseons of fights in long distance love stories in corona time. | कोरोना काळात भांडणं  होण्याची 10 कारणं

कोरोना काळात भांडणं  होण्याची 10 कारणं

Next
ठळक मुद्देनंतर बोलू असं सांगून कॉल न करणं.

भेटता येत नाही तर मोबाइलवर बोलू, व्हिडीओ कॉल करूहे तर पर्याय आहेतच. पण रोज रोज काय बोलणार?
सुरुवातीला हावरटासारखं खूप काही सांगायचं असतंच. पण रोज रोज काय बोलायचं? रोमान्सचा भर ओसरला की, मग मात्र भांडणं सुरू होतात, सतत होतात, रोजच्या रोज होतात, दिवसातून कितीदाही होतात! 
बोलण्याचा एकूण कालावधी तेवढाच असतो मात्र बोलण्यात प्रेम कमी आणि प्रश्न-खुलासे-आरोप-रुसवे आणि सॉरी हेच चक्र फिरतं!
मात्र का होतं असं?
निदान याकाळात भांडणं कशामुळे होतात, त्याची ही एक यादी.

1) ‘तो’ सतत तासन्तास ऑनलाइन असतो, व्हॉट्सअॅपवर ‘ऑनलाइन’च, फेसबुकावर दिसतो, सतत गेम खेळतो; पण स्वत:हून फोन करत नाही. 
2) तो किंवा ती, कुणीतरी एक फोनच लवकर उचलत नाही. विचारलं तर काहीतरीच कारणं सांगतात, फोन बॅगेत होता, पॅण्टच्या खिशात सायलेण्टवर होता, कपाटात ठेवला, विसरून गेलो. असं काहीही. परिणाम भांडण.
3) मला रेंजच नव्हती, घरात रेंजच येत नाही, बॅटरीच डाउन झाली, अशी कारणं म्हणजे हमखास भांडण.
4) ऑनलाइन असून रिप्लाय न करणं? - भांडण.
5) आपल्या रोमॅण्टिक एसएमएसला कोरडे रिप्लाय देणं, किंवा काय चाललाय बावळटपणा असं म्हणणं.
6) खूप वेळ कॉल वेटिंगवर असणं. विचारलं तर उडवाउडवीची उत्तरं. परिणाम भांडणं. अविश्वास, चिडचिड भांडण.
7) व्हॉट्सअॅपवरचा निळ्या खुणा दिसणं, तरीही माझा फोन बंद पडला होता हे ऐकावं लागणं.
8) नंतर बोलू असं सांगून कॉल न करणं.
9) कुणाच्या पोस्टवर फेसबुक, इन्स्टावर कोणता इमोजी दिला?- भांडण.
10) इतक्यांदा फोन करणं की, दुस:याला त्रस होणं. आणि सतत संशय- परिणाम भांडण.

Web Title: coronavirus : 10 reseons of fights in long distance love stories in corona time.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.