कॅनडात लॉकडाउनकाळात मिळेल तो  जॉब  करत भन्नाट आयुष्य जगणाऱ्या साहिरला  भेटा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 03:21 PM2020-05-21T15:21:52+5:302020-05-21T15:22:03+5:30

वयाच्या 17व्या वर्षी मी देश सोडला होता. आता विसाव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर मला पालकांकडून पैसे घेऊन शिक्षण पूर्ण करणं अयोग्य वाटतं.

corona : lockdown : Meet Sahir, a student from Canada who works part time to live his dream | कॅनडात लॉकडाउनकाळात मिळेल तो  जॉब  करत भन्नाट आयुष्य जगणाऱ्या साहिरला  भेटा 

कॅनडात लॉकडाउनकाळात मिळेल तो  जॉब  करत भन्नाट आयुष्य जगणाऱ्या साहिरला  भेटा 

Next
ठळक मुद्देमला खात्नी आहे की हा कठीण काळही संपेल. 

- साहिर पांढरे

मी ऑटवा, कॅनडा येथे सध्या राहतो आहे. मी ऑलगॉनकीअन कॉलेजचा विद्यार्थी आहे. 
मी तीन वर्षापूर्वी नाशिकहून कॅनडाच्या राजधानीत शिकण्यासाठी आलो. इ मार्केटिंगचा एक वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला आणि दोन वर्षाचा कालावधी असणाऱ्या  अॅडव्हान्स डिप्लोमा इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची फायनल ऑनलाइन परीक्षा नुकतीच दिली आहे. साधारण आठ दिवसांमध्ये माझा रिझल्टही लागेल. त्यानंतर मला एक वर्षामध्ये डिग्री मिळू शकेल; पण मी एवढय़ात डिग्रीसाठी अॅडमिशन घेणार नाही. याचं कारण कॅनडामध्ये इंटरनॅशनल विद्याथ्र्यासाठी लाखो रु पये फी आहे. मात्न तुमच्याकडे त्या देशाचं नागरिकत्व असेल तर अत्यल्प फी आहे. आता मला तीन वर्षासाठी वर्क परमिट मिळतं आहे. तीन वर्ष काम केल्यानंतर मला इथलं नागरिकत्वही मिळेल. मग अत्यंत कमी फीमध्ये मला डिग्री मिळू शकेल. ही तीन र्वष नोकरी करून मला पैसे साठवायचे आहेत. त्यातून डिग्रीचं शिक्षण मी स्वखर्चानं करू शकेल.
वयाच्या 17व्या वर्षी मी देश सोडला होता. आता  विसाव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर मला पालकांकडून पैसे घेऊन शिक्षण पूर्ण करणं अयोग्य वाटतं. इथं कोणीच असं करत नाही. माङो सर्व मित्न आणि मैत्रिणी नोकरी करूनच शिकत आहेत. येथे आल्यानंतर मी छोटय़ा-मोठय़ा नोक:या केल्या अगदी बेकरीमध्ये पाव भाजण्यापासून ते पहाटे मायनस फोर्टी, सिक्सटी टेम्परेचरमध्ये ट्रकमध्ये सामान चढवणं, घरांना रंग लावण्याची कंत्नाटं घेणं, गावोगाव फिरून कारला पाऊस व बर्फापासून प्रोटेक्शनसाठी म्हणून लागणारी वॅक्स विकण्यार्पयत बरीच कामं केली.
मागच्या मेमध्ये आम्हाला हेलिकॉप्टरने जंगलात सोडलं होतं तिथं रोपं लावण्याची कामं होती. आम्ही टेन्टमध्ये राहात होतो. सगळ्या जगाशी संपर्क तुटलेला होता. रोजचे 25 डॉलर्स मला मिळत होते. तो माङया आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ होता.
मार्च महिन्याच्या साधारण बारा-तेरा तारखेच्या सुमारास कॅनडा सरकारने लॉकडाउन जाहीर केलं. शाळा, महाविद्यालयं बंद करायला सुरुवात केली. मी ज्या कॉलेजात शिकतो त्या कॉलेजनेही विद्याथ्र्याना होस्टेल्स रिकामी करण्यासाठी सांगितले. सुदैवाने मी बाहेर एका बंगल्यात खोली घेऊन राहत असल्यानं माङयावर हे संकट कोसळलं नाही. हळूहळू हे लॉकडाउन अधिकाधिक कडक  होत गेलं.  मार्चमध्येच इंटरनॅशनल बॉर्डर सील झाल्या.  तीन वर्षानंतर मी घरी भारतात येणार होतो, ते ही जमलं नाही. मग मी रिटर्न तिकीट कॅन्सल करून रिफंड घेतला. 
माझी ऑनलाइन परीक्षा झाल्यानंतर एप्रिलच्या मध्यावर मी तातडीने नोक:या शोधायला लागलो. सारी दुकानं, कंपन्या, फॅक्टरी, उद्योग बंद झाले होते. आता  नोकरीत असणारेच हजारोजण बेरोजगार झालेले होते. असं असताना मला नोकरी कोण देणार हा प्रश्न होताच. एका वेअर हाउसमध्ये मला नोकरी मिळाली; पण दोन दिवसातच ते वेअर हाउसपण बंद करण्याचे आदेश आले. शेवटी नाइलाजाने मी हॉस्पिटल र्निजतुकीकरण करण्याचं काम स्वीकारलं.  घरून प्रखर विरोध होता कारण पुढील एक वर्ष पुरेल इतके पैसे मला घरातून देण्यात आले होते. पण माङो सर्व मित्न-मैत्रिणी घराबाहेर पडून जमेल ती कामं करत असताना मला नुसतं घरात बसून राहणं असह्य झालेलं होतं. तरी मी एका युनिव्हर्सिटीच्या ऑनलाइन कोर्सला अॅडमिशन घेतलेली असून, त्याची लेक्चर्स आणि अभ्यास घरी बसून करतो आहे. माझी फ्रेंच भाषा अधिक सुधारण्यासाठीपण प्रयत्नशील आहे. अनेक डॉक्टर्स, नर्सेस जर हॉस्पिटलमध्ये जाऊन काम करतात तर आपण का घाबरावं, असा मला प्रश्न पडला होता. एक-दोन दिवस कोरोना काळात हॉस्पिटलची बिल्डिंग र्निजतुकीकरणाचं काम केलं. तेव्हाच मला एका लंबर होम डेपोमध्ये फ्लोअर असोसिएट म्हणून नोकरी मिळाली. या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये डेक आणि फेन्ससाठी लागणारं प्लायवूड वगैरे गोष्टी विकल्या जातात. येथे अकाउण्ट संभाळणं आणि येणा:या ऑर्डर घेणं ही कामं माङयाकडे आहेत; पण तरीही बरेचदा मला दोन तास या डेपोच्या गेटवर येणा:या लोकांना थांबवण्याचं कामही करावं लागतं. पण माझी या गोष्टीला काही हरकत नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी तरु ण आहे. मला कोरोना झाला तरीही मी बरा होऊ शकतो. 
ज्या विद्याथ्र्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे त्यांना कॅनडा सरकार दर महिन्याला काही पैसे देत आहे; पण मला ही फॅसिलिटी नाही कारण मी भारताचा नागरिक आहे. मात्न आमच्या कॉलेजच्या सर्व विद्याथ्र्याना कॉलेजमधून किराणा सामान फुकट देण्यात येत आहे. मी दर दोन-तीन दिवसांनी कॉलेजमध्ये जाऊन मला लागणारं किराणा सामान घेऊन येतो. आम्हाला कोणीही तुम्ही किती किराणा नेता यावरती बंधन घालत नाही; पण तरीसुद्धा कॅनडामध्ये इतक्या उच्च दर्जाची नैतिकता आहे की कुठलाही विद्यार्थी आपल्या गरजेपेक्षा जास्त किराणा सामान घरी नेत नाही.
अर्थात लॉकडाउनमुळे अनेक शेतक:यांना आपल्या शेतात आलेली पिकं नष्ट करावी लागलेली आहेत. अनेकजण बेरोजगार झालेले आहेत. आनंदाची गोष्ट अशी की आता या आठवडय़ामध्ये सरकार लॉकडाउन हळूहळू उठवतं आहे. काही रस्ते आता वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहेत. दुकाने आणि काही पार्क उघडले जाणार आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचे सारे नियम पाळून लोक बाहेर पडू शकतील. आता शहरांमध्ये टय़ूलिप फुलांचा मोसम आहे. दरवर्षी येथे टय़ूलिप फुलांचा महोत्सव भरतो, सारेजण या फुलांचा आनंद घेण्यासाठी येतात. या वर्षी हे शक्य नाही. हा उमललेला टय़ूलिप फुलांचा बहर मला फार आश्वासक वाटतो आहे. मला खात्नी आहे की हा कठीण काळही संपेल. 
माझं स्वप्न माझ्या आईला जगप्रवास घडवण्याचं आहे. तिने आयुष्यभर ब्रिटिश लिटरेचर शिकवलं आहे. त्या ब्रिटनमध्ये - तिच्या कल्चरल मदरलॅडमध्ये - मला तिला घेऊन जायचं आहे. 
सध्या मला नाशिकच्या शाळेत शिकलेली शेलीची कविता आठवते आहे. 

If winter comes, can spring be far behind...


(साहिर सध्या कॅनडात शिकतो आहे, पार्टटाइम नोकरीही करतोय.)

Web Title: corona : lockdown : Meet Sahir, a student from Canada who works part time to live his dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.