शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेझ्युमे कॉपी-पेस्ट करताय? मग गेली तुमची नोकरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 15:33 IST

रेझ्युमे म्हणजे तुमचा पहिला इंटरव्ह्यू. तुमची ओळख. रेझ्युमेचा बाण सुटला की सुटला आणि तिथंच ठरतं तुम्हाला नोकरी मिळणार की जाणार!

ठळक मुद्दे रेझ्युमे उत्तम लिहिण्याचे तीन प्रमुख नियम

डॉ. भूषण केळकर

रेझ्युमे/बायोडाटा/सीव्ही हे तीन शब्द आपल्याला फार छळतात. ते फार अवघड काम असं सार्‍यांना वाटतं. मात्र हा सीव्ही किंवा रेझ्युमे हीच तुमची ओळख असते. एखाद्या कंपनीत नोकरी/पदासाठी अर्ज करताना तुम्ही तुमचे सादरीकरण नीट करणे फार महत्त्वाचे, यात शंकाच नाही.इंटरव्ह्यू किंवा मुलाखत एवढेच काय गटचर्चा अशा टप्प्यांर्पयत पोहोचण्याची पहिली पायरी असते ती रेझ्युमेची.मी तर रेझ्युमेला तुमचा पहिला इंटरव्ह्यू असेच म्हटले आहे. त्यात जर तुम्ही सादरीकरण छान केलेत तरच पुढचा म्हणजे प्रत्यक्ष/फेस-टू-फेस इंटरव्ह्यू होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळेच रेझ्युमे उत्तम लिहिणं अनिवार्य आहे.एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की रेझ्युमे लिहिणे हे काय आहे?महत्त्वाचे काम. पहिला इंटरव्ह्यूच. त्यामुळे 15-20 मिनिटांत ‘उरकून एक’ हा अ‍ॅटिटय़ूड धोक्याचा आहे. लक्षात ठेवा की पुढच्या सर्व टप्प्यांसाठी हा तुमचा रेझ्युमे गुरुकिल्लीचं काम करतो. त्याला सन्मानाने वागवा.दुसरा भाग लक्षात घ्या की समजा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये काही चूक केलीत तर निदान तुमच्याकडे सॉरी सर, माझी गडबड झाली, मला असं उत्तर द्यायचं होतं की..’ असं म्हणून योग्य उत्तर देण्याची शक्यता तरी असते. रेझ्युमे एकदा का तुम्ही पाठवून दिलात की बाण सुटला! म्हणजे मला खरं तर तुम्हाला हे सांगायचंय की रेझ्युमे हा पहिल्याच अटेम्पटमध्ये उत्तमच असायला हवा!सामान्यतर्‍ एका जागेसाठी 500-600 रिझ्युमे येत असतात, कधी कधी 1000 पेक्षा जास्तसुद्धा. आणि म्हणूनच त्यातून तुमचा रेझ्युमे उठून दिसणे आत्यंतिक महत्त्वाचे आहे. रेझ्युमे उत्तम लिहिण्याचे तीन प्रमुख नियम मी तुम्हाला सांगतो. ते जर नीट समजावून घेतलेत आणि वापरलेत तर मला खात्री आहे की तुम्हाला योग्य न्याय मिळेल. ते तीन नियम आपण समजावून घेऊ.1) स्वतर्‍ला ओळखा (नो युवरसेल्फ)2) रेझ्युमे कोण वाचणार आहे ते समजावून घ्या. (ऑडिअन्स)3) संयुक्तिक शब्दांचा वापर (रिलेव्हन्स).पहिला भाग आपण ‘करिअर क्लॉक’मध्ये उत्तम तर्‍हेने तपासला आहे. त्यामुळे त्यावर मी अधिक भाष्य करत नाही.दुसरा मुद्दा बव्हंशी वेळा आपण रेझ्युमे लिहिताना विसरतो. जरी तुम्ही तेच असतात तरी वाचणारी व्यक्ती वेगळी असल्याने आपण भर कशावर द्यायचा हे त्या त्या कंपनीला अर्ज करताना आणि लक्षात ठेवून त्यावर अधिक भर देणं महत्त्वाचं. त्यामुळे नोकरी कुठलीही असो एकच टिपिकल सीव्ही सगळीकडे पाठवून चालत नाही. उदाहरणार्थ तुम्ही जर्मन भाषा अगदी प्राथमिक पातळीला शिकला असाल तर बँकेमध्ये अर्ज करताना प्रामुख्याने उल्लेख केला नाही तरी चालेल; परंतु जर एखाद्या जर्मन कंपनीत नोकरीसाठी अर्ज केलात तर जर्मन भाषेचे ज्ञान प्राथमिक पातळीवरचे असूनही उल्लेख करणं फायदेशीर ठरेल.तिसरा मुद्दा आहे तो संयुक्तिक (रिलेव्हन्ट) शब्दांचा वापर. काही करून माहितीची पुनरुक्ती टाळणं आणि जे शब्द तुम्ही रेझ्युमेमध्ये लिहाल त्यानं काही तरी नवी माहिती वाचकाला मिळणं. ती त्या जॉबसाठी आवश्यक असणं हे पण महत्त्वाचं आहे.मात्र ते नेमकं मांडायचं कसं याविषयी पुढच्या अंकात.