शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
6
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
7
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
8
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
9
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
10
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
11
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
12
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
13
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
14
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
15
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
16
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
17
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
18
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
19
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
20
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
Daily Top 2Weekly Top 5

निर्माण : उत्तरं शोधणारा प्रवास

By admin | Updated: March 23, 2017 09:06 IST

उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे.

समाजासाठी काम म्हणजे नेमकं काय करायचं?

 

निर्माण आणि आॅक्सिजनउत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं. गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७००हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल.. त्यातला हा तिसरा प्रश्न : समाजासाठी काम म्हणजे नेमकं काय करायचं?

प्रश्नोत्तरांचं हे प्रकरण फार कठीण नाहीये.  ‘निर्माण’ आणि‘आॅक्सिजन’ यांच्यातला पूल असेल आकाश भोर.आकाश स्वत: निर्माणच्या पाचव्या बॅचमध्ये होता आणि सध्या तो गडचिरोलीलाच सर्चमध्ये काम करतो आहे. तुमचे प्रश्न आकाशला थेट कळवा.त्यासाठी ईमेल :nirman.oxygen@gmail.com

यातल्या निवडक प्रश्नांच्या निमित्ताने होणारा संवादआॅक्सिजनच्या अंकात वाचायला मिळेल.आणि उरलेल्या गप्पांचा आॅनलाइन कट्टा असेल www.lokmat.com/oxygen इथे!!! 

परवा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका मित्राला भेटले. तिथे तो माझी ओळख करून देताना म्हणाला, ही चारुता, ही सध्या ‘पब्लिक हेल्थ’मध्ये पीएचडी करत आहे. हिने डॉ. अभय बंगांबरोबर काम केलं आहे. मित्राची बहीण लगेच म्हणाली, ‘अरे वा, तुझी आणि माझ्या आईची ओळख करून दिली पाहिजे, तिलाही सोशल वर्कची आवड आहे!’ मी विचार करता करता अडखळले. डॉ. बंग करतात ते सोशल वर्क आणि चारुता बंगांकडे काम करायची म्हणजे तीपण सोशल वर्क करते? चारुता पब्लिक हेल्थ शिकते म्हणजे पब्लिक हेल्थ हेही समाजकार्य झालं का? सामाजिक काम म्हणजे काय? त्याची व्याप्ती काय आणि कोणतं काम असामाजिक असू शकतं? माझ्यासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले. रूढार्थाने सामाजिक काम म्हणजे लोकांच्या थेट आयुष्याशी संबंधित आणि नाममात्र किंवा कोणताही आर्थिक मोबदला न घेता केलेलं काम. मग ते अंध व्यक्तीला रायटर म्हणून सोबत करणं असो, नियमित रक्तदान करणं असो, गरजू लोकांना आरोग्यसेवा देणं असो, गरीब वस्तीतील मुलांसाठी अभ्यासाचे वर्ग घेणं असो किंवा बिल गेट्स फाउंडेशन करत असलेले एचआयव्ही जनजागृतीचं काम असो, ही सर्व कामे समाजिक कामातच मोडतात. बँकेत काम करणारा कॅशिअर, भाजी विकणारी व्यक्ती हेदेखील खरं तर समाजोपयोगी काम करत असतात. अगदी विप्रो कंपनीतील इंजिनिअरसुद्धा उपयोगी कामच करत असतो. पण त्याचा लाभार्थी त्याला थेट दिसत नाही आणि त्याचा तो भरघोस मोबदला घेतो या निकषांवर तो सामाजिक काम करत नाही असं ठरवलं जातं. याविषयीचे माझं मत अजून पक्कं नाही. सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारी व्यक्ती ही विप्रोमधील व्यक्तीपेक्षा किंचित अधिक श्रेष्ठ आहे का? माझ्या मते नाही, पण ही समाजधारणा मात्र आहे. अत्यंत प्रामाणिकपणे लिहायचं तर या लोकांच्या मतांचा सध्या माझ्यावर इतका पगडा आहे मी सामाजिक कार्याची व्याख्या करू शकत नाही. पण हेही तितकंच खरं आहे की हा प्रश्न जरी मला पडला असला तरी उत्तराची मला फारशी भूक नाही किंवा घाई नाही. कारण जोपर्यंत मी विध्वसंक काम करत नाही. तोपर्यंत मी समाजिक काम करते आहे असंच समजेन. चारुता गोखले, निर्माण १

खरे पाहिलं तर आपण करतो ती सगळी कामं सामाजिकच असतात, तरीपण यापैकी काहीच कामांना लोक रूढ अर्थाने ‘सामाजिक काम’ असं म्हणतात. म्हणून ‘सोशल वर्क’ या रूढ शब्दापेक्षा मला ‘सोशल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’ असा शब्दप्रयोग करणं अधिक उचित वाटेल.आपल्या समाजात सध्या खूप साऱ्या समस्या आहेत. गरिबी आहे, व्यसनांचं प्रमाण, शेतकरी आत्महत्या, नद्यांचं प्रदूषण, भूजल पातळी खालावणं, असं बरंच काही. या समस्या सोडविण्यासाठी काम करणं म्हणजे सामाजिक काम होय. आपल्या समाजात समस्या खूप प्रकारच्या आहेत, त्यामुळे सामाजिक काम करण्याचे प्रकारदेखील खूप आहेत. समस्या फक्त गरिबांच्या नाहीत, फक्त ग्रामीण भागातल्या लोकांच्या नाहीत तर त्या सगळ्यांच्याच आहेत. फक्त आर्थिकच नाहीत, आरोग्याच्या, पर्यावरणाच्या, शिक्षणाच्या, वाहतुकीच्याही आहेत. त्यामुळे सामाजिक काम करण्याच्या संधीदेखील प्रत्येक क्षेत्रात आहेत. शहरातील एखाद्या सोसायटीमध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन करणं आणि शेतमालाला भाव मिळावा म्हणून प्रयत्न करणं ही दोन्ही सामाजिकच कामं आहेत.निवड आपली, इच्छा आपली!- आकाश भोर, निर्माण ५

 

तुम्ही एनजीओमध्ये करता ते काम ‘सामाजिक’ आणि मग मी बँकेत करतो ते काम ‘असामाजिक’ का रे? माझ्या मित्राच्या वडिलांनी विचारलेला हा मार्मिक प्रश्न मला विचारात पाडून गेला. खरंच भ्रष्टाचार, आतंकवाद, अशी अगदी टोकाची समाजविघातक (असामाजिक) कृत्यं सोडली तर इतर सर्वच कामे सामाजिकच आहेत, कारण त्यांचा प्रत्यक्ष समाजावर काही न काही परिणाम होत असतोच. मग ते बँकेत काम करणारे माझ्या मित्राचे वडील असोत की एका सामाजिक संस्थेत काम करणारा माझा मित्र! या युक्तिवादात एक मेख मात्र नक्की आहे. ती म्हणजे ‘मी जे काम करतो, त्याचा समाजावर काय परिणाम होतो? मी आयुष्यातील सर्वात महत्वाची वर्षे (२० ते ६० ), आणि त्यातही दिवसातील सर्वात महत्वाचे तास (९ ते ५) ज्या कामासाठी देतोय त्याचा नक्की कोणाच्या आयुष्यावर आणि काय परिणाम होतो? हा प्रश्न आपल्या सर्वांनाच आपलं काम आणि त्याचं महत्व अधिक समजावून घ्यायला मदत करेल. आता हेच पहा ना, शहरात राहून दवाखाना चालवणारा एक डॉक्टर पेशंट्स मिळवण्यासाठी काय काय करतो आणि तोच डॉक्टर छोट्या गावातील दवाखान्यात किती रु ग्णांचा एकमेव आधार बनतो. अर्थात यात शहरात काम करणारे ‘वाईट’ आणि गावात काम करणारे तेवढे ‘चांगले’ असा भेद करणं योग्य नाही. पण आपल्या कामाबद्दलचा हा फरक समजावून घेणं अतिशय महत्वाचं आहे. जेणेकरून मी करतो तेच लय भारी! असा भ्रम दोघांनाही होणार नाही... दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे, माझं काम समाजाला अधिक न्याय्य, संवेदनशील, प्रगल्भ बनवतं आहं का? त्या कामामागे मूल्याधार काय आहे? आणि तो मी जपतो आहे का? शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसमोर माझी दैनंदिन जीवनशैली, माझे विचार अनुकरणीय आहेत का? कारण जसे ‘थेंबा थेंबातूनच समुद्र बनत असतो’ तसेच आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जगण्यातील मुल्यांतूनच समाजाची मुल्यव्यवस्था घडत असते. म्हणूनच मी करत असलेलं कोणतंही काम मी जितक्या खरेपणानं आणि तळमळीनं करेन ते तितके अधिक ‘सामाजिक’ असेल असं मी छातीठोकपणे म्हणू शकेन.. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे माझं काम मला स्वत:ला (व्यक्तीश:) अधिक चांगला माणूस बनण्यास मदत करत आहे का? कारण सरते शेवटी, माझं काम जर मला आंतरिक समाधान देत नसेल तर आपण ते किती चांगलं करू शकू ? .. समाजाशी थेट नातं असणारं, समाजाची मूल्यव्यवस्था जपणारं किंबहुना ती वृधिंगत करणारं, असोबतच मलादेखील आनंद देणारं काम हे सामाजिक काम; नाही का? - केदार आडकर, निर्माण ५ (केदारने ‘मानवी संसाधनांचं व्यवस्थापन’ या विषयात पद्व्युतर शिक्षण घेतलं असून, त्याच्या शिक्षणाच्या मदतीनं तो सामाजिक संस्थांना त्यांच्या कामामध्ये मदत करतो.)