शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

सतत थकवा? झोप येतेय? उदास वाटतंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 06:00 IST

हे काही बरं नव्हे, जरा तब्येतीचं म्हणणं ऐका.

ठळक मुद्देबदलत्या ऋतूचे आजार

- नितांत महाजन

ऋतूबदल होतोय. दरवर्षी या काळात आळस येतो. काहीजणांना एकदम डिप्रेस्ट वाटून रडू येऊ शकतं. झोप येते असं वाटतं, पण शांत झोप लागत नाही. ही सगळी वातावरणाची कृपा आहे असं मानलं तरी, काही गोष्टी आपणच केल्या तर हे ऋतूसंक्रमण आपण निभावून नेवू शकतो. 

1) व्हिटॅमिन डीआपल्याकडे उदंड सूर्यप्रकाश असूनही अनेक स्त्रीपुरुषांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते. स्त्रियांमध्ये तर जास्तच. त्यावर उपाय काय? खरंतर रोज सकाळी 10 मिनिटं तरी किमान कोवळा सूर्यप्रकाश आपल्याला मिळायला हवा. उन्हात जायला हवं. त्यामुळे सूर्योदयानंतर लगेच काही काळ उन्हात फिरुन या, खुर्ची टाकून बसा. त्यानं डी जीवनसत्व तर मिळेलच. फ्रेश वाटेल. हे जीवनसत्व फारच कमी असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्यानं औषध घ्या.

2) प्रो बायोटिकफार मोठा वाटतो हा शब्द. त्या साठीची औषधंही बाजारात ढिगानं मिळतात. म्हणजे काय तर आपल्या पोटात पचनाला मदत करणार्‍या हेल्दी बॅक्टेरियांची आतडय़ांना मदत होणं. ते आतडय़ात असणं. त्यासाठीची औषधं घेण्यापेक्षा आहारात दह्याताकाचा वापर करावा. शक्यतो दही सकाळच्या जेवणात, नाश्त्यात घ्यावं. त्यानं पचनशक्ती चांगली राहते.

3) झिंकझिंक सप्लीमेण्ट प्रतिकार शक्ती वाढवायला मदत करते. घरचा गुळाचा शिरा, साधा शिरा, पौष्टिक सुकामेवा, मनूका यातून हे मिळू शकतं. पण इन्फेक्शन सतत होत असतील तर डॉक्टरच्या सल्यानं झिंक सप्लीमेण्टची औषधं घेवू शकतात.

4) आयर्नलोह. रक्तवाढीसाठी आवश्यक. नाचणीचं पिठ, गुळाचा शिरा, बीट, राजगीरा लाडू असं खरंतर या काळात खायला हवं. आणि शक्यतोवर लोखंडी कढईतच भाज्या करायला हव्या. त्यातून लोह पोटात जातं. आपलं हिमोग्लोबिन तपासून घ्यावं. ते फारच कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम.

5) नाश्ताहा सगळ्यात सोपा उपाय. गरमागरम, घरचं, पोळीभाजी, पोहेसांजा, असं खाल्लेलं उत्तम. सकाळी पोटभर नाश्ता केला तर त्यानं आपली एनर्जी लेव्हल चांगली राहते, मूडही चांगला राहतो दिवसभर.