खरंतर आपल्याला वाटतं खूप की, आपण आपल्या स्कीनकडे, दिसण्याकडे जरा जास्त लक्ष द्यायला हवं. फार नाही रोज दहा मिनिटं दिली तरी पुरतील.
पण ती दहा मिनिटंसुद्धा आपण स्वत:साठी देत नाही. वेळ नाही, धावपळ, लक्षातच राहत नाही अशी कारणं सांगत अनेकदा स्वत:कडे दुर्लक्षच होतं. आणि मग कधीतरी वाटतं की, बाकीच्या जणी किती टापटीप राहतात, किती सुंदर दिसतात. आपणच का अशा बावळट दिसतो.
अनेकदा तर आपला ड्राय चेहरा, डोळ्याखालची वर्तुळं पाहून रागही येतो स्वत:चा! आणि मग वाटतं, रोज फक्त अशा काही गोष्टी नाही का करता येणार की, त्यातल्या त्यात आपण प्रेझेण्टेबल दिसू!
तर या काही रोज करता येण्यासारख्या साध्या सोप्या गोष्टी.
१) मेकअप करणं सगळ्यांना आवडतंच असं नाही; पण त्यांनी निदान कॉम्पॅक्ट तरी रोज वापरायलाच हवं.
२) एक लिपस्टीक अथवा लीपग्लॉस लावला तरी लूक खूप छान दिसतो. आपल्या ड्रेसला मॅचिंग अथवा लाईट लिपस्टिक लावा.
३) रामॉसी, आईथी, मॅट आणि मिनरल बेस पॉवडर, फाउंडेशनचा वापर तुम्ही करू शकता.
४) काजळ लावा. ते वापरताना केक बेस लायनरचा वापर करू शकता. काजळाच्या अथवा लायनरच्या वापराने डोळ्यांचा आकार छान दिसतो. कमी पापण्या असल्यास काजळ वापरल्यानं पापण्यांची जाडीही जास्त असल्याचा भास आपण निर्माण करू शकतो.
५) त्वचेच्या रंगाप्रमाणे फाउंडेशन, लिपस्टिक, काजळ इतपत गोष्टींचा रोज उत्तम वापर केल्यास तुम्ही प्रेझेण्टेबल नक्की दिसू शकाल!
- लीना खांडेकर