शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

रंग जे बोलके असतात...

By admin | Updated: March 15, 2017 19:24 IST

रंगपंचमी. रंगांची उधळण. एरव्हीही ती आपल्या आयुष्यात होतच असते, फक्त त्या रंगांकडे आपलं लक्ष असतंच असं नाही...

 - मानसी जोशी

रंगपंचमी.रंगांची उधळण.एरव्हीही ती आपल्या आयुष्यातहोतच असते,फक्त त्या रंगांकडे आपलंलक्ष असतंच असं नाही...रंगपंचमी. रंगात न्हाऊन निघायचा दिवस. गुलाल, आॅइलपेण्ट आणि आता नैसर्गिक रंग! पण तोच उत्साह, तोच खट्याळपणा आणि तोच आनंद!खरं तर आपलं सगळं आयुष्यच या रंगांनी रंगीन केलेलं आहे नाही? कृष्णधवल सिनेमांचंसुद्धा रंगीत रुपात पुनरागमन होतंय, निसर्गात तर रंगांची उधळणच आहे होळी आणि रंगपंचमी. अर्थात, हे दोनच नाहीत तर आपल्याकडचे सगळे सण रंगांच्या वर्षावात साजरे होणारे आहेत. दिवाळीला रंगीत आकाशकंदील, अनेकरंगी दिवे, रांगोळ्या आणि फटाके, संक्र ांतीचे रंगीत पतंग, गणपतीच्या उत्सवात केले जाणारे रंगीत देखावे, सगळ्या पूजाअर्चांमधे वापरली जाणारी विविधरंगी पाने आणि फुले सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण करतात नाही? आपल्या रोजच्या बोलीभाषेतसुद्धा मानवी भावनांचे प्रतिनिधित्व करणारे रंग आहेत. आपण रागाने ‘लालबुंद’ होतो, कोणा खास व्यक्तीच्या आठवणीने गालावर ‘लाली’ खुलते, आपल्याला आवडणारी थंडी ‘गुलाबी’ असते, ‘सोनेरी’ पहाट आशेची असते तर चांदनीरात प्रणयाची! एखाद्याचा चेहरा ‘काळवंडणं’ म्हणजे चिंता दाखवते, तर ‘तोंड काळं करणं’ शरमेची गोष्ट असते. इंग्रजी भाषेतसुद्धा उदास वाटण्याला 'feeling blue' तर वाया गेलेल्या व्यक्तीसाठी  'Black sheep of the  family'असा वाक्प्रचार आहे. याशिवाय rosy lips, deep blue eyes.. 

कित्ती मज्जा आहे रंगांत!कार्ल युंगला प्रख्यात पुरातन मानसशास्त्रज्ञाने हे जाणले की माणूस रंगांद्वारे सहज व्यक्त होऊ शकतो, त्याच्या भावना, त्याचं व्यक्तिमत्त्व रंगांद्वारे ओळखले जाऊ शकते. हाच बाबा आत्ता कुठं भारतात नावारूपाला आलेल्या कलर थेरपी किंवा आर्ट थेरपीचा जनक (खरंच बाबा) म्हटलं पाहिजे. निळा, लाल, हिरवा आणि पिवळा अशा चार मुख्य रंगांमध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांचं वर्णन केलं. साधारणपणे वॉर्म आणि कूल असं दोन भागात त्यांनी रंगांचं वर्गीकरण केलं आहे. म्हणजे लाल कुटुंबात येणारे तांबडा, केशरी, पिवळा हे वॉर्म म्हणजे ऊब देणाऱ्या गटातले. आणि निळ्या कुटुंबात मोडणारे म्हणजे निळा, हिरवा, जांभळा हे रंग कूल म्हणजे शीतल गटात मोडतात. कदाचित, म्हणूनच प्रतिष्ठेचं समजलं जाणारं आमंत्रण रेड कार्पेट असतं आणि दवाखान्यातले पडदे बरेचदा हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असतात. लाल रंग सत्तेचा. लाल रंग पाहिला की रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात असं म्हणतात, प्रियकर प्रेयसीच्या नात्यात लाल बदाम हीच धडधड निर्देशित करत असावा! लाल रंग जवळीक, प्रेम आणि लैंगिकतेचं प्रतीक आहे तर गुलाबी रंग नाजूकता, कोमलता दर्शवतो. पांढरा रंग शांतीचा, स्वच्छता आणि निर्मळता दाखवतो, तर काळा रंग सत्ता, खलप्रवृत्ती दाखवतो तसेच हुशारी आणि बुद्धीदेखील. केशरी रंगातून आनंद आणि शौर्य तसेच ऊब, संपत्ती आणि हर्ष प्रकट होतो तर पिवळा रंग आशा, उत्साह आणि रागदेखील व्यक्त करतो. हिरवा रंग समुद्धीचा, सुबत्तेचा आणि सुपीकतेचा ठरतो.हो, पण या रंगांच्या दुनियेत त्या त्या संस्कृतीचा, पद्धतीचा आणि सवयीचासुद्धा मोठा भाग आहे. कोणता रंग कुठे वापरला जातो त्याप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो. डॉक्टरच्या कोटचा रंग पांढरा आणि संगमरवरी ताजमहालचासुद्धा. काही समाजात तो विधवेचा, मृत्यूचा द्योतक तर दुसऱ्या समाजात लग्नाचा पेहराव पांढराच असावा लागतो. लाल रंग प्रेम व्यक्त करण्याचा खरा पण रक्त पाहिलं तर हाच रंग भीतीचा, धोक्याचा, सिग्नलवर असेल तर अडवणुकीचा! हिरवा रंग शेतकऱ्याच्या पिकात समृद्धीचा. काळा रंग काही समाजात प्रतिबंधित तर उच्चवर्णियांच्या पार्टीला याच रंगाचा पेहराव हवा! जसा, जिथे वापर करावा तसा अर्थ बदलला. पाण्याच्या रंगाची वेगळीच मजा. ज्यात मिसळावा तसा रंग घेतो. हा खरा परिवर्तनशीलतेचं आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचं प्रतीक समजला पाहिजे.अर्थात, हे सगळे रंग आपण म्हणतो ते सगळ्यांना दिसणारे..! मग अनेकजण मुद्दाम लोकांना दिसण्यासाठी वेगवेगळे रंग पांघरतात... त्यानं अंतरंग लपतं खरं, पण तात्पुरतंच. त्यापेक्षा जो आतून खळाळून वाहत येईल तो रंग आपला. या रंगपंचमीला आपले खरे रंग उधळूया...