शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

काम करायची एनर्जी वाढवणारी कॉफी आणि बरंच काही!

By admin | Updated: June 16, 2016 13:03 IST

‘प्रोडक्टिव्हिटी’ या शब्दाची आजकाल फार चर्चा. फार आग्रह. उद्योग जगात तर या शब्दाचं महत्व प्रचंड वाढलंय.

- कॉफीटिव्हिटी
- मयूर देवकर
 
‘प्रोडक्टिव्हिटी’ या शब्दाची आजकाल फार चर्चा. फार आग्रह. 
कार्पोरेट जगात तर या शब्दाचं महत्व प्रचंड वाढलंय.
आता फक्त काम पूर्ण करणं नव्हे  तर त्याला काही तरी ‘क्रिएटिव्ह टच-अप’ देण्याची अपेक्षा केली जाते. ‘हार्डवर्क’ऐवजी ‘स्मार्टवर्क’ला प्राधान्य दिलं जातं आणि प्रॉडक्टिव्हिीटी वाढवण्याचं प्रेशरही असतंच.
आता ही प्रोडक्टिव्हिटी वाढवायची कशी?
प्रोडक्टिव्हिटी वाढविणाºया अनेक वेबसाईट, अ‍ॅप्स, ब्लॉग्ज तुम्हाला आॅनलाईन मिळतील. पण या सगळ्यांमध्ये मला वेगळी वाटली ती ‘कॉफीटिव्हिटी’ ही वेबसाईट.
एखाद्या कामात अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्यापैकी बºयाच जणांना गाणं ऐकण्याची सवय असते. आवडीचं गाणं हेडफोनमध्ये ऐकत काम करताना इकडेतिकडे लक्ष विचलित होत नाही. पण या वेबसाईटची तºहा जरा वेगळी.
‘कॉफीटिव्हिटी’ (coffitivity) या वेबसाईटवर ‘मूड फ्रेशनर’ गाणी नाहीत, ना शांत करणारी पियानो इन्स्ट्रूमेंटल्स. इथे  केवळ कॉफी शॉपमधील गोंगाट-गोंधळ ऐकण्यास मिळतो. आत या गोंधळाचा आणि प्रोडक्टिव्हिटिचा संबंध काय?
माणसाचा मेंदू एवढा जटिल आणि ‘विक्षिप्त’ आहे की, त्याचं ‘मेकॅनिझम’ अर्थातच कार्यपद्धतीचे जेव्हा विविध पैलू समोर येतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आता हेच बघा ना, कॅफेमधील गोंगाटामध्ये आपली क्रिएटिव्हिटी सर्वाधिक सक्रीय होते, असे शिकागो विद्यापीठाने केलेल्या एका रिसर्चचं म्हणणं आहे.
रिसर्चमध्ये तीनशेपेक्षा जास्त लोकांचा अभ्यास करण्यात आला. बौद्धिक क्षमतेचा कस लागेल असे काही टास्क त्यांना देण्यात आले. एका गटाला कॉफी शॉपमध्ये बसवले तर दुसºया गटाला एका शांत ठिकाणी. विश्लेषणाअंती असं दिसलं की, कॉफी शॉपमध्ये असणाºया लोकांनी सर्व टास्कमध्ये दुसºया गटातील लोकांपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली.
सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कॉफी शॉपमधील गोंधळात आपल्या डोक्याची चकं्र अधिक गतीने फिरू लागतात. एकदम शांत जागीच कामावर लक्ष लागतं असा समज असणाºयांना हे तर खूपच शॉकिंग वाटेल.
पण एक गोष्ट आहे की, सकाळी आंघोळ करताना, ब्रश करताना आणि एवढंच काय तर गाडी चालवतानासुद्धा एकदम अचानक भन्नाट ‘आयडिया’ सुचतात. म्हणजे काय तर करत असलेल्या कामात अतिजास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करण्याऐवजी जर थोडंसं ‘डिस्ट्रॅक्ट’ असणं सृजनशीलतेला चालना मिळण्यासाठी खूप गरजेचं असतं.
मग याच रिसर्चचा आधार घेऊन अमेरिकेतील रिचमंड, व्हर्जिनिया येथील काही हुरहुन्नरी पोरांनी ‘कॉफीटिव्हिटी’ ही वेबसाईट (आणि अँड्राईड व आय-ओएस अ‍ॅप) सुरू केलं. घरी बसल्या बसल्या किंवा कुठेही असताना ‘कॉफीटिव्हिटी’ कॉफी शॉपचं वातावरण निर्माण करते. वेबसाईटवरील कॉफी शॉपचे रेकॉर्डिंग ऐकताना असं वाटतं की, आपण कॅफेमध्येच बसलो आहोत. लोकांचा गोंधळ, कप-ट्रेचा आवाज यासह वातावरण निर्मिती केली जाते.
तुमच्या मुडनुसार तुम्ही कॉफी शॉपचे वातावरण निवडू शकता. म्हणजे सकाळचा बिझी कॅफे, लंच टाईमचा शांत कॅफे किंवा मग कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा किलबिलाट असणारा कॅफे यांसारखे आॅप्शन येथे उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर पॅरीस, ब्राझील आणि टेक्सासमधील कॅफेचा अनुभवदेखील तुम्ही घेऊ शकता. थोडक्यात काय तर कॅफेमधील केवळ कॉफी नाही तर तिथला गोंधळही आपल्या मेंदूला तरतरी आणतो.
याला म्हणतात ‘कॉफी आणि बरंच काही’. किती साध्या गोष्टीवरून अशी ‘कामाची’ वेबसाईट बनवली. आपणही थोडं हटके विचार केला तर अशी एखादी भन्नाट कल्पना आपल्यालाही सुचेल. मुद्दा काय प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे!
 
 
आॅडिबल नेचर!
ज्यांना नुसता कॅफेचा गोंगाट ऐकायचा नसेल ते ‘साउंड्रॉऊन’ (soundrown) या बेबसाईटला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला कॅफे बरोबरच पावसासह ढगांचा कडकडाट, समुद्राच्या लाटा, रात्रीची शेकोटी (आग), रात्रीचा किरकिराट, पक्ष्यांची किलबिल, रेल्वेडब्याचा खडखडाट, कारंज्याची खळखळ आणि बागेत लहान मुलांचा कल्ला असे विविध आवाज ऐकायला मिळतात.