को-वर्किग? ऑफिसला न जाता, खुर्चीला न चिकटता रेस्टॉरण्ट, कॅफेत बसून काम करण्याचा एक नवा ट्रेण्ड.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:27 PM2020-02-27T18:27:07+5:302020-02-28T13:34:26+5:30

को-वर्किग म्हणजे काय तर हे सगळं पारंपरिक टाळून, ठरलेल्या ऑफिसात, ठरलेल्या खुर्चीर्पयतच न जाता थेट कॅफे, हॉटेलमध्येच बसून, त्यांची मेंबरशिप घेऊन, तिथं बसून आपलं ऑफिसचं काम करणं. अशा को-वर्किंग प्लेसेस रेंट करणारे अनेक स्टार्टअप सध्या मुंबई, पुणे, बंगळुरू अशा शहरांत काम करत आहेत.

co-working, new work culture , but how it works. | को-वर्किग? ऑफिसला न जाता, खुर्चीला न चिकटता रेस्टॉरण्ट, कॅफेत बसून काम करण्याचा एक नवा ट्रेण्ड.

को-वर्किग? ऑफिसला न जाता, खुर्चीला न चिकटता रेस्टॉरण्ट, कॅफेत बसून काम करण्याचा एक नवा ट्रेण्ड.

Next
ठळक मुद्देहे नवं को-वर्किगचं एक कल्चर आता उभं राहतं आहे. कार्यसंस्कृती बदलते आहे.

- स्नेहा मोरे

ऑफिसला जायला बोअर होतंय, अर्धा वेळ ट्रॅफिकमध्येच जातोय, ऑफिस व्हाइब्ज नकोशा वाटणं हे शब्द तरुण नोकरदारांच्या तोंडी नेहमी दिसतात. सतत जॉब हॉपिंग करणारे मिलेनिअल्स त्यात आघाडीवर. त्यांना ऑफिसच्या खुर्चीला बांधलेलं टिपिकल रूटीन बोअर होतं. मग ते बोअरडम घालवायचं म्हणून अनेकजण हटके आयडिया शोधत असतात. ऑफिसमध्ये टीमनं डेकोरेशन करणं, टीमनं पाटर्य़ा करणं, डान्स करणं, सेलिब्रेशन हे सारं तर आता जुनं झालं. काही जुगाडू डोक्यातून बाहेर आलेली को-वर्किगची आयडिया सध्या भलतीच ट्रेण्डमध्ये आहे, मुळात परदेशातलं असलेलं हे को-वर्किगचं कल्चर आता देशात आणि ओघाने मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये रु जताना-वाढताना दिसतंय. 
गेल्या दीड वर्षात को-वर्किगची संकल्पना देशातील मेट्रो शहरांत रु जतेय. अगदी लोकलची गर्दी, ओलाचं वेटिंग, प्रेझेंटेशन्सच्या डेडलाइन्सचा स्ट्रेस टाळण्यासाठी तरु णाई थेट को-वर्किग स्पेसची संकल्पनेत रमतेय. गर्दीतून धडपडत ऑफिसची वेळ गाठायची आणि संध्याकाळपर्यंत काम करीत बसयाचं हे चित्र आता हळूहळू बदलत आहे. ‘फ्लेक्झी टाइम’नुसार यंगस्टर्स कॉफीचा घोट घेत निवांतपणे तासन्तास रेस्टांरटमध्ये बसून काम करताना दिसतात.
पचायला जड आहे हे की, रोज ठरल्यावेळी पंच करण्याच्या शिस्तीत धावणार्‍यांना असे फ्लेक्झी अवर्स आणि कुठंही बसून काम करण्याची परवानगी मिळाली तर किती चंगळ होईल. ही कविकल्पना नाही.
हे वर्ककल्चर आता आपल्याकडेही बर्‍यापैकी रुजताना दिसतं आहे. ‘घरून काम करण्याची’ मुभा काही कंपन्या देऊ लागल्या आहेत. काळानुसार ऑफिसच्या कार्यपद्धतीत आता बदल होत आहे. वीवर्क, प्रायमस वर्क, वी-टुगेदर, वर्क विथकॅफी अशा अनेक कंपन्या आणि अ‍ॅप को-वर्किगमध्ये काम करत आहेत.
म्हणजे नेमकं काय आहे हे प्रकरण.
तर त्याचं असं आहे की,
सकाळी दहाच्या ऑफिसच्या वेळेनंतर कसेबसे ऑफिस गाठायचे. हवापाण्याच्या गप्पांसोबत चहापान झाले की मग टेबलावरच्या फायलींवरची धूळ झटकायची. तेवढय़ात एक वाजता लंच टाइम होतो. जेवण, पाय मोकळे करायला एक चक्कर मारून पुन्हा जागेवर येईपर्यंत दोन-अडीच वाजतात. साडेतीन- चारला पुन्हा चहाची वेळ. सोबतीला गप्पा आणि चर्चा आहेतच. परत फायलींचा ढीग हलवायचा. तेवढय़ात पाचची चाहूल लागते. मग आवराआवरीची लगबग सुरू. पाचच्या ठोक्याला पंचिंग किंवा थम्पिंग करून ऑफिस सोडायचे. हे झालं रूटिन.
आता हे को-वर्किग म्हणजे काय तर हे सगळं पारंपरिक टाळून, ठरलेल्या ऑफिसात, ठरलेल्या खुर्चीर्पयतच न जाता थेट कॅफे, हॉटेलमध्येच बसून, त्यांची मेंबरशिप घेऊन, तिथं बसून आपलं ऑफिसचं काम करणं. अशा को-वर्किंग प्लेसेस रेंट करणारे अनेक स्टार्टअप सध्या मुंबई, पुणे, बंगळुरू अशा शहरांत काम करत आहेत. आणि त्या अ‍ॅपचा उपयोग करून अनेकजण ऑफिस किंवा घरात बसून काम न करता या अशा नव्या जागांवर जाऊन काम करत आहेत.
मात्र ते सोपं नसतं. त्यातही सकाळी 7 ते 10 या वेळेत नऊ तासांची डय़ूटी करा. ठरवून दिल्याप्रमाणे प्रत्येक दिवसाचे काम त्या त्या वेळी पूर्ण करा. कोणतीही गोष्ट पेंडिंग राहता कामा नये. नऊ तास भरले की ऑफिसमधून बाहेर पडा. आणि मग बाहेर पडल्यावर पुन्हा दुसर्‍या दिवशीच्या कामाचे प्लॅनिंग करा. तुमच्या वेळा, कामाची पद्धत आणि गुणवत्ता यावर तुमच्या ह्यूमन रिसोर्स विभागाचे कम्प्युटर आणि कॅमेर्‍यांद्वारे लक्ष असते. कामात कुचराई झाली की त्याचा थेट परिणाम तुमच्या पगारावर. सकाळी लवकरच टेलिकॉन्फरन्स. मग स्काइपवर मीटिंग, हे सगळं आता हेल्दी आणि सकारात्मक वातावरणात स्मूदली होतंय. यामुळे कंपनीचेही काम होते, प्रवासातील वेळ वाचतो आणि घरासाठीही जास्त वेळ देता येतो.
हे नवं को-वर्किगचं एक कल्चर आता उभं राहतं आहे. कार्यसंस्कृती बदलते आहे.

 

(स्नेहा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत वार्ताहर आहे.)
 

Web Title: co-working, new work culture , but how it works.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.