शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

ढगासाठी क्लाउड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 10:03 AM

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए.आय. शेतीत वापरली जाईल असं कुणी सांगितलं तर ते तुम्हाला खरं वाटेल का?

डॉ. भूषण केळकरही लेखमाला सुरू करतानाच्या पहिल्या १-२ लेखातच मी असं म्हटलं होतं की, इंडस्ट्री ४.० चा वेग एवढा आहे, की २०१८ संपतानाचा लेख हा मी लिहिलेला असेल की प्रिंटिंग करणारे छपाईयंत्र लिहील कोण जाणे? ते वाक्य मी अतिशयोक्ती म्हणून लिहिले होते, परंतु मला सकारण भीती वाटू लागली आहे! मागील लेखात मी एक कोर्स ‘इंडस्ट्री ४.० हाऊ टू रिव्होल्यूशनराइझ यूवर बिझनेस’ ( edx.org वरचा) असे लिहिलं होत, मात्र ते (नजरचुकीनं) ‘हाऊ टू रिव्होल्यूशनराइझ यूवर ब्रेन’ असा छापलं गेलं! त्यामुळे मला बऱ्याच ई-मेल्स आल्या की ‘ब्रेन’वाला कोर्स काही edx.org वर सापडत नाही!असो. विनोदाचा भाग सोडा; पण बिझनेसवाला कोर्स नक्की करा, उपयोग होईल.मागील आठवड्यात बातमी होती ती सुरेश प्रभूंनी केलेल्या प्रमुख विधानाची. कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री मंत्री या नात्यानं सुरेश प्रभूंनी विशेष उल्लेख केला होता तो ए.आय. रोबोटिक्सचा आणि यापुढील काळातील त्या तंत्रज्ञानाच्या महतीचा. नव्या भारताला या औद्योगिक क्रांतीवर स्वार व्हावेच लागेल असं ते म्हणाले.नुसत एवढंच नाही तर नीती आयोगामध्ये सुद्धा याबद्दल बरीच तपशिलानं चर्चा झाली आहे. खरं तर आयआयटी मद्रासचे प्राध्यापक कामकोटी यांच्या नेतृत्वाखाली एका टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे आणि त्या टास्क फोर्सनी ‘एनएआयएम’ (नॅशनल आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स मिशन) ची घोषणा व सुरुवातपण केली आहे. त्याचा मुख्य उद्देश हा ए.आय.मधील मूलभूत काम आणि त्याचे भारतीय जनमानसावर होणारे परिणाम यावर उपाययोजना हे आहे. गेल्या महिन्यात वाध्वानी बंधूंनी मुंबईमध्ये भारतातील पहिली ए.आय. लॅब ( आर्टिफिशियल इन्टलिजन्स लॅब अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा) उभी केली. ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. २०० कोटी रुपये एवढ्या आर्थिक पाठबळावर रोमेश व सुनील वाध्वानी या अमेरिकास्थित लक्ष्मीपुत्रांनी ही प्रयोगशाळा सुरू केली आहे. वाध्वानी ए.आय. लॅब ही अमेरिकेतल्या एमआयटीतल्या ए.आय. लॅब सारखीच काम करेल अशी कल्पना आहे.या राष्ट्रीय पातळीवरच्या प्रयत्नांचा उद्देश आहे तो बँक, अर्थक्षेत्र, व्यापार-उद्योग, पर्यावरण अशा अनेक भागांमध्ये ए.आय.चा वापर करून ते अधिक सक्षम करणं. भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शेतीक्षेत्र. आपण ए.आय.चा वापर आणि कृषिक्षेत्र याबद्दल थोडं विस्तारानं पाहू.गुगल या प्रख्यात कंपनीने एक गोपनीय अशी प्रयोगशाळा बनवली आहे. त्याचं नाव ‘लॅब एक्स’ असं आहे. त्याचं मुख्य काम हे ए.आय.चा वापर करून सिंचन आणि पेरणी याबाबत प्रगत तंत्रज्ञान निर्माण करणं असं आहे. अ‍ॅस्ट्रो टेलर हा या ‘लॅब एक्स’चा संचालक आहे. आणि तो म्हणतो की जगात शेती खूप महत्त्वाची असून, २० ते ४० टक्के धान्य वाया जातं ते केवळ तंत्रज्ञानाच्या अभावाने! तिथं आता या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू होईल.इंडस्ट्री ४.० मधील अत्यंत महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग. त्याविषयी विस्तारानं आपण पुढील भागात जाणून घेऊ. परंतु, भारतामध्येपण या क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित शेती सुधारण्याचे यशस्वी प्रयोग झालेत. वेळी-अवेळी पडणारा पाऊस, कीड व किटक यांच्यामुळे होणारे नुकसान, लहरी हवामान, अवर्षण-अतिवर्षण या चक्रात अडकलेला, आत्महत्येपर्यंत पोहोचलेला शेतकरी हे सारं दुर्दैवी वास्तव आपण पाहातो.आंध्र प्रदेशातील कउफकरअळ नावाच्या संस्थेने मायक्रोसॉफ्ट बरोबर काम करून क्लाउड टेक्नॉलॉग वर आधारित पे्रडिक्टिव्ह अ‍ॅनॅलिसिस वापरलं. १७५ शेतकºयांनी एसएमएस आल्यावरच पेरणी व योग्य सिंचन केलं. या क्लाउड तंत्रज्ञानात जमिनीचा दर्जा, खतांचं नियोजन, कीटकनाशक फवारणी, ७ दिवसांचा पर्जन्यमानाचा अंदाज व अन्य अनेक गोष्टींचा विचार अंतर्भूत होता. या १७५ शेतकºयांचं उत्पादन आणि उत्पन्न २०-४० टक्के वाढलं! आता ७ खेड्यांतील २००० शेतकरी या प्रकल्पात सामील होत आहेत अशी बातमी आहे!काय गंमत आहे ना! ‘क्लाउड’ तंत्रज्ञानाला ते नाव मिळताना कल्पना तरी असेल का, की ‘क्लाउड’चा वापर खरंच ‘ढगासाठी’ होईल म्हणून...( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत. bhooshankelkar@hotmail.com )