शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
5
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
6
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
7
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
8
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
9
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
10
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
11
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
12
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
13
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
14
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
15
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
16
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
17
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
18
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
19
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
20
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

वेबकॅम बंद करा!

By admin | Updated: September 18, 2014 19:39 IST

आपल्याला मारे वाटतं की, आपण ऑनलाइन फार प्रायव्हसी जपतो. आपण जे करतो, ते प्रायव्हेट, कुणाला काही कळत नाही.

 

 
आपल्याला मारे वाटतं की, आपण ऑनलाइन फार प्रायव्हसी जपतो. आपण जे करतो, ते प्रायव्हेट, कुणाला काही कळत नाही. पण असं काही नाही तुमच्यावर अनेकांचा ऑनलाइन ‘वॉच’ असतो. 
तुमचे लोकेशन तर जवळपास सगळ्याच वेबसाइटवाल्यांकडे असते. विविध स्पायवेअर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काय काम करता यावर हॅकर्स लक्ष ठेवून असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे काही हजारो किलोमीटर अंतरावर बसून  हॅकर्स तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वेबकॅमही चालू करू शकतात.
काय असतो नक्की हा वेबकॅम हॅकिंगचा प्रकार?
वेबकॅम हॅकर्स म्हणजे काय?
वेबकॅम हॅकर्स सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहेत. हे लोक हजारो किलोमीटर अंतरावरुन तुमच्या लॅपटॉप  किंवा डेस्कटॉपचा वेबकॅम चालू-बंद करू शकतात. एवढेच नव्हे तर त्या वेबकॅमच्या हद्दीतील सगळी रेकॉर्डिंगही करू शकता. म्हणजे तुमचा लॅपटॉप तुमच्या बेडरूममध्ये टेबलावर पडलेला असेल आणि तो जर ओपन असेल आणि सुरु असेल तर तुमच्या बेडरूममधील सर्व हालचालीवर हे वेबकॅम हॅकर्स हजारो किलोमीटरवरून लक्ष ठेवू शकतात. असे काही भयंकर प्रकार डेस्कटॉप कॉम्प्युटरच्या वेबकॅमच्या बाबतीतही लक्षात आले आहेत.
हे वेबकॅम हॅकिंग करतात कसं?
वेबकॅम हॅकर्स हे नक्की करतात कसं? आपल्यापैकी अनेकांनी फ्री सॉफ्टवेअर्स गाणी, गेम्स असं काहीबाही डाउनलोड करायची भारी हौस असते. मात्र हे फ्री मिळणारे सॉफ्टवेअर्स आणि गाण्यांसोबत हे हॅकर्स मालवेअर प्रोग्राम्स देखील जोडून ठेवतात. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं फ्री सॉफ्टवेअर किंवा गाणं डाउनलोड करता तेव्हा हे मालवेअर प्रोग्राम्सदेखील त्या सोबत तुमच्या कॉम्प्युटर/लॅपटॉपवर डाउनलोड होऊन कार्यरत होतात. मालवेअर प्रोग्राम्स हा असा सॉफ्टवेअर प्रोग्राम असतो जो तुमच्या कॉम्प्युटर/लॅपटॉप विषयीची सगळी माहिती जसे की आयपी अँड्रेस, हार्डवेअर डिटेल्स, ऑपरेटिंग सिस्टीम डिटेल्स आदिंबद्दल सर्व माहिती आपल्या मालकाकडे (हॅकर्सकडे) पाठविण्याचे काम इमानेइतबारे करत असतो. याच माहितीच्या आधारे वेबकॅम हॅकर्स तुमच्या वेबकॅम हॅक करू शकतात.
- अनिल भापकर
anil.bhapkar@lokmat.com