शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

चारचौघात ऑनलाइन अपमान

By admin | Updated: February 4, 2016 19:31 IST

टकल्या मित्रला ‘चौदहवीका चॉँद’ म्हणून हिणवणं, स्थूल मैत्रिणीला ‘तू वाढतेस किलो किलोने’ असले फिशपॉण्ड टाकणं, सावळ्या रंगाच्या मुलीला ‘अंधेरी रात’ असलं टोपणनाव देणं किंवा साडी नेसून कुणी फोटो अपलोड केला की साडी में काडी म्हणणं हे सारं काय आहे?सोशल मीडियाच्या जगात याला म्हणतात बॉडी शेमिंग.

सोशल मीडियावरच्या कमेण्टमुळे तरुण मुलामुलींना जमीनदोस्त करणारा एक अपमानास्पद ट्रेण्ड.
 
 
‘चौदहवीका चॉँद दिसतोहेस तू!’, ‘अगं तुझ्या कपडय़ांवर जरा दया कर’, ‘तू मागच्या जन्मी काय बेडूक होतीस का? नाही डोळ्यांवरून म्हणतोय तुझ्या’, ‘ए पोपटनाकी!’ - असल्या किंवा याहीपेक्षा भयानक कमेण्ट तुम्ही ऑनलाइन ऐकल्या आहेत का? तुमच्या दिसण्यावरून कुणी तुमची खिल्ली उडवली आहे का? खरंतर हे प्रश्न विचारण्याचीही गरज नाही. हे प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधी घडलेलं असतंच हल्ली. याचाच दुसरा अर्थ असा की, आपण सगळेच या ना त्या प्रकारे ‘बॉडी शेमिंगला’ बळी पडलेलो आहोत.
‘बॉडी शेमिंग’ या शब्दाचा साधा सोपा अर्थ म्हणजे दिसण्यावरून, बाह्यरूपावरून खिल्ली उडवणं, प्रसंगी अपमानित करणं. हा मुद्दा आता एकदम चर्चेला येण्याचं कारण म्हणजे श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरच्या बाबतीत नुकतीच घडलेली घटना. खुशीने आपले काही फोटो सोशल नेटवर्किगवर पोस्ट केले आणि तिला तिच्या वजनावरून, सुटलेल्या पोटावरून ब:याच अपमानकारक कमेण्टला तोंड द्यावं लागलं. 
सेलिब्रिटीजपासून  सर्व-सामान्यांर्पयत कुणीही ह्या बॉडी शेमिंगच्या कचाटय़ातून सुटलं नाहीये. क्षम्य जरी नसलं तरी सेलिब्रिटीजच्या विशेषत: अॅक्टर्स आणि मॉडेल्सच्या बाबतीत थोडय़ाफार प्रमाणातलं बॉडी शेमिंग चालून जातं. ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सतत सुंदर दिसण्याच्या व्यवसायामधेच असतात ते. त्यांचं दिसणं हे त्यांच्या व्यवसायाचं मोठं भांडवल असतं. दुसरं म्हणजे आपल्या दिसण्यावर प्रचंड पैसा आणि वेळ खर्च करणं त्यांना शक्य असतं. त्यामुळे अशा बॉडी शेमिंगच्या घटनांकडे ब:याचदा सेलिब्रिटीज ‘फिडबॅक’ म्हणून बघतात व त्यानुसार पाऊल उचलतात. 
मात्र अशा प्रकारच्या घटना जर सर्वसामान्यांच्या बाबतीत घडल्या तर त्याचे परिणाम मात्र वाईट असू शकतात. मित्रमैत्रिणींच्या सततच्या टोमण्यांनी बरीच तरुण मंडळी डिप्रेशनमधे गेल्याची उदाहरणं आहेत.
टकल्या मित्रला ‘चौदहवीका चॉँद’ म्हणून हिणवणं, स्थूल मैत्रिणीला ‘तू वाढतेस किलो किलोने’ असले फिशपॉण्ड टाकणं किंवा सावळ्या रंगाच्या मुलीला ‘अंधेरी रात’ असलं टोपणनाव देणं ही सगळी बॉडी शेमिंगचीच उदाहरणं. आपल्या आसपास सतत घडणारी.
एखाद्या व्यक्तीच्या बाह्यरूपाला अवास्तव महत्त्व देणो, फिल्मी सौंदर्याच्या कल्पनांना कंटाळून त्यात न बसणा:या व्यक्तींना सतत हिणवणो ह्याचे फार घातक परिणाम असू शकतात. बॉडी शेमिंगमुळे तरुणांचा आत्मविश्वास डळमळीत होतो, चार-चौघात अपमान झाल्यामुळे ही मंडळी कटू आणि असमाधानी बनतात. दुर्दैवाने हीच असमाधानी मंडळी आपल्या अपमानाचा बदला दुस:यांचा अपमान करून घेतात आणि बॉडी शेमिंगचं लोण पसरत जातं. सततच्या बॉडी शेमिंगमुळे तरुणाई अभ्यासात मागे पडते, करिअरमधे मागे पडते असं तज्ज्ञांचं मत आहे. गंमत म्हणजे, एखाद्याच्या ‘रूपाला नाही गुणाला महत्त्व द्यावे’ अशी शिकवण देणा:या आपल्या समाजात ह्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. 
इंटरनेट किंवा सोशल नेटवर्किग साइट्समुळे एखाद्याचा अपमान हा खासगी न राहता सार्वजनिक होतोय, किंबहुना हा अपमान सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरच केला जातोय. उदाहरणार्थ पूर्वी चार मैत्रिणींपैकी एखादीला ‘धुणं वाळत घालायची काठी’ असं कोणी चिडवलं तरी ती गोष्ट त्या चार मैत्रिणींमधेच राहायची. आजमात्र एखादीच्या फोटोवर कुणी अशी कमेंट केली तर ती तिच्या फ्रेण्डलिस्टमधल्या दोनशे जणांना अशी एकूण हजारो लोकांना दिसते. बरं ह्या हजारो लोकांपैकी कमीत कमी पन्नास टक्के लोकांना ती संबंधित व्यक्ती ओळखतदेखील नसते. दुसरं म्हणजे चारचौघात बोललेली गोष्ट नंतर विरून जाते. पण सोशल नेटवर्किवर पोस्ट केलेली कमेंट डिलीट केली तरी कायमस्वरूपी कधीच डिलीट होत नाही. त्यामुळे झालेल्या अपमानाची तीव्रता कित्येक पटीने वाढते.
म्हणूनच आपल्या बाह्यरूपावरून चारचौघात (पक्षी : सोशल नेटवर्किग साइट्सवर) आपल्याला कमी लेखण्याचा अधिकार कुणालाच नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. अशी माणसं आपल्या आसपास असतील तर त्यांना वेळवारी आपल्या (सोशल) लाइफमधून वजा करणं आणि कायमचा ‘जय महाराष्ट्र’ करणंच उत्तम. नाहीतर असे अपमान सहन करत राहण्यात काय हशिल आहे?
 
 
श्रीदेवीच्या खुशीची बॉडी शेमिंगला चपराक 
 बॉडी शेमिंगचा मुद्दा आपल्याकडे इतक्या जोरोशोरोसे चर्चिला जाण्याचं कारणच खुशी कपूरच्या फोटोवर कुणीतरी केलेली कमेंट आहे; मात्र ह्या कमेंटवर खुशीने दिलेली रोखठोक प्रतिक्रिया वाखणण्याजोगी आहे. तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर ‘मी माङो फोटो पोस्ट करते कारण ते मला आवडतात म्हणून. त्यावरून मी चांगली दिसते की वाईट हे ठरविण्याचा अधिकार मी कुणालाही दिलेला नाही. ज्यांना दुस:याची किंमत फक्त त्यांच्या दिसण्यावरून करावीशी वाटते त्यांनी एकदा आत्मपरीक्षण जरूर करावं. तुम्हाला राग नक्की कशाचा आहे, दुस:यांचा की स्वत:च्या फ्रस्ट्रेटेड आयुष्याचा? मी कशी दिसतेय किंवा माझं पोट सुटलंय का ह्यानं मला नाही फरक पडत. पण दिसण्याला महत्त्व देऊन जर तुम्ही कुणाचा अपमान करत असाल, तर तुम्ही त्यांना जाणीवपूर्वक दुखवत आहात. प्रत्येकाचं एक स्वतंत्र अस्तित्व असतं आणि ते अस्तित्व सुंदरच असतं हे समजून घ्या. एकमेकांच्या वेगळेपणाचा आदर करा आणि त्या वेगळेपणावर प्रेम करा.’
 
 
बॉडी पॉझिटिव्हिटी मुव्हमेंट 
गेलं वर्ष हे बॉडी पॉझिटिव्हिटीचं वर्ष म्हणून गाजलं. इतकं की हा शब्द अर्बन डिक्शनरीमधेसुद्धा समाविष्ट केला गेला. बॉडी शेमिंगच्या विरोधात उभारली गेलेली मोठी चळवळ म्हणजे बॉडी पॉझिटिव्हिटी. तुम्ही कोणत्याही आकाराच्या, रंगाच्या असा, स्वत:ला स्वीकारा आणि त्याबद्दल सकारात्मक राहा असा ह्या चळवळीचा सरळसोट अर्थ! स्त्रीवादी चळवळीमधे, विशेषत: फॅट फेमिनिझममधे (जाड असलो तरी माणूस म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहोत असं सांगणारा स्त्रीवाद) ह्या चळवळीचे विशेष महत्त्व आहे. बॉडी पॉङिाटिव्हिटीला स्त्रीवादी चळवळ म्हटलं गेलं, कारण आजही बॉडी शेमिंगच्या सर्वाधिक बळी ह्या स्त्रियाच आहेत. दुर्दैवाने आजही समाजात स्त्रियांच्या दिसण्यावरून त्यांची किंमत ठरवली जाते. बाईचं रूप बघावं आणि पुरुषाचं कर्तृत्व असं ठासून सांगणा:या संस्कृतीत तर हे अधिकच प्रकर्षाने जाणवतं. अशावेळेस बॉडी पॉङिाटिव्हिटीचं महत्त्व अधिकच अधोरेखित होतं. गंमत म्हणजे ज्या सोशल नेटवर्किगने बॉडी शेमिंगला खतपाणी घातलं, त्याच सोशल नेटवर्किग साइट्सने बॉडी पॉङिाटिव्हिटीच्या प्रसारास मदत केली आहे.
 
 
पुढच्या पिढीचं काय?
बॉडी शेमिंगने सर्व वयोगटातल्या सगळ्या थरातल्या स्त्री-पुरुषांना छळलेलं आहे. पण ह्या भुताने सर्वाधिक घेरलं आहे ते नव्या पिढीला. सात ते पंधराच्या वयोगटातल्या मुलांच्या विशेषत: मुलींच्या बाबतीत ही आकडेवारी सुन्न करणारी आहे. अमेरिकेतल्या एका नामांकित संशोधन संस्थेच्या अहवालानुसार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणा:या आणि वयात येणा:या जवळपास पन्नास टक्के मुलींना सर्वाधिक भीती वाटते ते आपलं वजन वाढण्याची. ते वाढू नये आणि आपल्या फोटोवर कुणी काही चुकीची कमेंट टाकू नये म्हणून त्या वाट्टेल ते करायला तयार असतात. ह्याच वयोगटातल्या 2/3 मुलींनी आणि 1/3 मुलांनी आपलं वजन कमी करण्यासाठी कधी ना कधी नक्कीच प्रयत्न केले असतात. सात ते पंधराच्या वयोगटातील मुला-मुलींचे डायटिंगचे प्रयोग ही आईवडिलांसमोरची वाढती डोकेदुखी आहे.
 
- अनघा पाठक