शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

फलक .. तेरा ध्यान किधर है?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 07:25 IST

तरुणांच्या आंदोलनात त्यांनी हातात घेतलेले फलक गाजले. पोस्टरबाजी रंगली. त्यावरून कुणी चिडलं, तर कुणी भडकलं. असं काय असतं त्या चित्रांत की जे काळाला नवी दृश्यमानता देतं?

ठळक मुद्देशब्दचित्रांपलीकडे जात ‘नजर’ जे नोंदवते, ते काय असतं?

- प्रदीप म्हापसेकर

 स्वीडनच्या एका 16 वर्षीय चिमुरडीचा फोटो अलिकडे जगभर गाजला. एका फलकाशेजारी ती बसली होती. ग्रेटा थनबर्ग. या मुलीने जगभरातल्या दिग्ग्ज नेत्यांना आव्हान दिलं आहे. फोटोत ती ज्या फलकाशेजारी बसलेली दिसते. त्या फलकावर स्विडीश भाषेत लिहिलं होतं. SKOLSTREJK FOR KLIMATET    याचा अर्थ shool strike for climate.  ग्रेटाच्या या शब्दांनी जादू केली होती. पर्यावरणासाठी तिनं सुरू केलेलं एकटीचं आंदोलन जगभर गाजलं. जगभरातले मुलं तिच्यासारखेच पर्यावरणासाठी बोलू लागले. अगदी नोबेल पुरस्कारासाठी तिचं नॉमिनेशन झालं. टाइम मासिकाने 2019 चा पर्सन ऑफ द इअर हा किताब तिला बहाल केला. एका साध्या फलकावरच्या एका संदेशानं ती जगभर पोहोचली. हजारो लोक तिच्या आंदोलनात पुढे सहभागी झाले. माझ्या कायम लक्षात राहिला तो SKOISTSTER JK FOR KLIMATET   लिहिलेला फलक.तो एकच फलक आणि त्याच्याशेजारी शांत बसलेली ती मुलगी हे छायाचित्र या काळातल्या सगळ्यात मोठय़ा आंदोलनाचं एक ‘चित्र’ ठरले.अलीकडच्या बर्‍याच आंदोलनांतही असे फलक/ पोस्टर्स लक्ष वेधून घेऊ लागले आहेत. नवी दिल्लीतच नाही, तर मुंबईत आणि देशभर तरुण मुलांनी अलीकडे केलेल्या आंदोलनांत त्यांच्या हातात फलक दिसले. त्या फलकांवर काही घोषणा होत्या. काही जळजळीत शब्द होते. ते फलक हातात घेऊन शांतपणे उभे असलेले तरुण हे ‘दृश्य’ बोलकं होतं. तरुण विद्याथ्र्यानी हातात घेतलेले हे फलक लोकांना प्रभावीपणे मार्गदर्शन करू लागले. असं काय होतं त्या फलकांत?

गेल्या काही आठवडय़ात जेएनयूच्या आंदोलनात अशीच जोरदार फलकबाजी, पोस्टर्सबाजी दिसली. यातले बरेच फलक शब्दांनी हेडलाइन्स यांनी भरून गेले होते. काही  चित्न, कार्टून पाहायला मिळालेत. मात्र शब्दांमध्ये कमालीचा आक्र मकपणा दिसत होता. विद्याथ्र्याची ही आंदोलने देशभर पसरली होती. काही ठिकाणी शांत विद्यर्थी हातात आक्रमक शब्दांचे फलक घेतलेले दिसत होते. मात्र त्या शब्दांत अंगार होता आणि त्या फलकांवर जे लिहिलेलं होतं त्याला दृश्य मूल्यही होतं.हे झालं ज्यांनी ते फलक लिहिले, हातात घेतले त्यांच्या विषयी; मात्र ते फलक पाहताना ‘पाहणार्‍याला’ काय समजतं? त्याच्यार्पयत काय पोहोचतं? कसं पोहोचतं? दृश्य/चित्र पाहून बरंच काही आपल्याही नकळत आपल्या मेंदूत घडामोडी होत असतात. आणि त्या सगळ्याचा पुढे आपल्या निर्णयक्षमतेवर परिणाम होत असतो.असं म्हटलं जातं की मानवी मेंदूचा अर्धा भाग थेट किंवा अप्रत्यक्षपणे व्हिज्युअल माहितीवर प्रक्रि या करण्यासाठी समर्पित असतो. किमान 65} लोक व्हिज्युअल टिपणारे असतात. म्हणूनच मानवामध्ये चित्न लक्षात ठेवण्याची क्षमता जास्त असते. वाचलेलं/ऐकलेलं फार काळ लक्षात राहीलच असं नाही. मात्र, पाहिलेलं माणसाला अधिक आठवतं. लक्षात राहातं. प्रतिमा खूप ताकदवान असतात. त्या आपल्या मेंदूचा चटकन ताबा घेतात. फटाफट माहितीची देवाण-घेवाण करतात. विचारांचं आदान-प्रदान होतं. आणि निर्णयक्षमतेला आवश्यक असं बळ त्या देतात.आज या सगळ्या गोष्टींचा आंदोलनकर्ती तरुण मुलं चांगला वापर करताना दिसतात. वेगवेगळ्या शब्दांनी/ चित्नांनी ही मंडळी आपल्याकडे मीडियाचं, लोकांचं लक्ष वेधून घेताना दिसतात. अलीकडेच माझ्या एका दिल्लीकर मित्नाशी चर्चा करताना दिल्लीतल्या आंदोलनाचा विषय निघाला. मी विचारलं त्याला, तुम्ही युनिव्हर्सिटीतली तरु ण मंडळी सध्या जोरात आहात. मात्र ही फलकबाजी, पोस्टरबाजी करण्यासाठी काही विशेष तयारी करता का? त्यावर तो म्हणाला, तशी काही तयारी नाही करत; पण जे काही सुचतं, चर्चेतून पुढे येतं ते लागलीच कागदावर येतं. फटाफट मुलं कामाला लागतात. या कामात त्यांना उत्साह खूप असतो. मुळात ही मुलं काही चित्नकार/ कलाकार नसतात; पण त्यांना आपल्या हाताने असं काही रंगवायला/ लिहायला खूप आवडतं. हे करण्यासाठी ते रात्न रात्न जागवतात. थट्टा- मस्करी- विनोद यातून कल्पक असं काही घडत जातं. शब्द चित्र बनत जातात.तो बोलत असताना मला माझे जे. जे.तले दिवस आठवले. जे. जे. कला महाविद्यालयात निवडणुका होत असत तेव्हा आम्ही असंच राबायचो. कागदावर रांगत चित्र रंगवायचो. तो आनंद काही और होता. कॉलेजमधली आंदोलनं, निवडणुका या सार्‍यात हे शब्द/चित्र विद्याथ्र्याच्या उत्स्फूतर्तेचं रूप घेऊ येतात. शब्द चर्चा घडवतात. शब्द-चित्न विचार करायला लावतात. हे आपल्याकडे नाही तर जगभर होतं. आजवर होत आलेलं आहे. 

एखाद्या साध्या फलकावरची घोषणा/ हेडलाइन डोक्याचा भुगा करते. आधी म्हटल्याप्रमाणे माणसांची चित्न मेमरी उत्कृष्ट असते. चित्न लक्षात ठेवण्याची क्षमता विलक्षण असते. त्यामुळे आजवर गाजलेल्या आंदोलनांत असे फलकच चित्रस्मृती ठरले आहेत. आंदोलनांचा चेहरा ठरले आहेत.आजचं युग तर डिजिटल आहे. त्यामुळे आंदोलनात भाव खाऊन जाणार्‍या फलकांना, शब्दांना सोशल मीडियातही चांगला वाव मिळतो. लोक भावनेवर जगत असतात. त्यांच्यासाठी हे फलक/पोस्टर मोठा खुराक असतो. चर्चेसाठी मोठं खाद्य असतं. म्हणून ते व्हायरलही मोठय़ा प्रमाणात होतात. एक चित्न वेगानं भाषांतर करून लोकांर्पयत पोहोचतं. डोळ्यांद्वारे गोळा केलेला डेटा मज्जासंस्थेकडे पाठवला जातो. जिथे आपला मेंदू भावनांना उत्तेजन देऊन समोरच्या प्रतिमेवर, फलकावर प्रेक्षकांना कल्पनेत गुंतवून ठेवतो. ही ताकद असते व्हिज्युअलची. हे जग व्हिज्युअलचं आहे आणि म्हणून लोक व्हिज्युअल्सना प्रतिसाद देत आहेत. आंदोलन असो व मोर्चा असो किंवा निदर्शनं, उपोषण असो तिथले फलक, पोस्टर्स, शब्दचित्र पाहणार्‍यांना गुंतवून ठेवतात.  कारण हे जग व्हिज्युअल्सचं आहे.

( लेखक चित्रकार/व्यंगचित्रकार आहेत.)