-भूषण केळकर
आपण गेल्या आठवडय़ात ‘करिअर क्लॉक’ बघितलं. त्यानुसार 12 उपविभागांमध्ये तुम्ही 1-10 या स्केलवर कुठे आहात ते कागदावर नीट मांडा. तुम्ही अंदाज मांडलात तरी चालेल. उदा. समजा तुम्ही नाटय़ व खेळ या विषयात कॉलेजला, राज्याला रिप्रेझेन्ट केलं असेल तर तुम्ही स्वतर्ला 10 पैकी 7 मार्क देऊ शकता. जर बाकी काहीच नाही (नाटय़, क्रीडा इ.) परंतु इंटरमिजिएट/एलिमेंटरी परीक्षेत (ड्राइंगच्या) बी ग्रेड मिळाली असेल तर 10 पैकी 4 देऊ शकता.असं सर्वच 12 च्या 12 उपविभागात तुम्ही स्वतर्ला स्कोअर देऊ शकता. अजून एक उदाहरण देतो जर्मन/फ्रेंच भाषा मॅक्सम्युलर वगैरे मधून शिकून बी1/बी2 पातळीर्पयत असाल तर 10 पैकी 8 मार्क देऊ शकाल. जर कोर्सेरावर ऑनलाइन कोर्स पूर्ण केला असेल तर 10 पैकी साडेचार देऊ शकाल आणि जर डय़ूलिंगोवर अनौपचारिकपणे जुजबी शिकला असाल तर 10 पैकी 2-3 मार्क गुण देऊ शकाल.आता या सगळ्या गुणांचा फायदा असा होऊ शकतो की तुम्ही या 12 भागात जर ते नीट मांडलंत आणि त्याची एक आकृती (सोबत फोटोत दाखवल्याप्रमाणे) तयार केलीत तर तुम्हाला रेझ्युमे किंवा सीव्ही अथवा बायोडाटासाठी लागणारी माहिती, तुमच्या मुलाखतीसाठी लागणारी माहिती, एसओपी म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पजसाठी लागणारी माहिती, इंट्रोडय़ूस युवरसेल्फ या अत्यंत सर्वमान्य प्रश्नाच्या उत्तराची माहिती, ‘आम्ही तुम्हाला का निवडू’ या प्रश्नाचं उत्तर, एवढेच काय तर तुमची बलस्थाने व कमतरता सांगा (स्ट्रेंथ अॅन्ड विकनेस) याही प्रश्नाची तयारी या एका आकृतीमुळे होईल.