शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

करिअर का अडलं? न फिरवल्यामुळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 16:39 IST

आपल्या प्रगतीचा घोडा अडू द्यायचा नसेल, तर निरंतर शिक्षणानं आपल्याला आपला कौशल्य संच अर्थात स्किलसेट फिरवत ठेवावा लागेल! ते कसं जमायचं?

ठळक मुद्दे निरंतर शिक्षणानं ेआपल्याला कौशल्य संच फिरवत राहायला हवा तो यामुळेच!

-डॉ. भूषण केळकर

दहावीच्या विद्याथ्र्याना आणि त्यापेक्षाही त्यांच्या पालकांना (माझी त्यांना पूर्ण सहानुभूती!) आता प्रिलिम्सचे वेध लागले असणार. आजचीच बातमी आहे की, बदललेल्या अभ्यासक्रमानुसार सराव करताना उत्तरं कशी लिहावी याचं मार्गदर्शन राज्य सरकार बालभारतीच्या अधिकृत ‘यूटय़ूब’ वाहिनीवर करणार आहे. तशी माहिती त्या चॅनलवरच अपलोड केली जाणार आहे!अजून एक बातमी म्हणजे बिटकॉइन किंवा इथेरियम् वगैरे आभासी चलनाविषयी आपण ऐकतोच. (त्याविषयी याच सदरात आपण काही महिन्यांपूर्वी बोललोय) तर आता भारत सरकार स्वतर्‍च त्या प्रकारची डिजिटल करन्सी म्हणजे ‘डिजिटल नोटा’ बाजारात आणण्यासाठी पावलं उचलत आहे. अजून एक बातमी. परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलंय. ते म्हणतात, ‘ड्रोन्समुळे शेतीचा चेहरामोहरा बदलेल!’ पीकपद्धती, औषधांची फवारणी आणि विशेषतर्‍ जलसिंचनात आमूलाग्र बदल ड्रोन्स करू शकतील हे तर खरंच!अक्षरशर्‍ गेल्या दोन दिवसातील या तीन बातम्या आहेत. तिन्ही वेगळ्या क्षेत्रातल्या; पण आपल्या नेहमीच्या जीवनाशी संबंधित. तीनही बातम्यांमधला समान धागा म्हणजे ‘इंडस्ट्री 4.0’! तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याच देशात सर्वसामान्य जीवनावरही परिणाम होतोय. त्या बदलांना आपण सामोरं जातोय..लहानपणी ती एक गोष्ट तुम्ही ऐकलीय ना? भाकरी का करपली, घोडा का अडला अन् विडा का रंगला नाही या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच. ते म्हणजे ‘न फिरवल्यामुळे!’ ‘चेंज इज द ओन्ली परमनण्ट थिंग’ ही इंग्रजी म्हण उगीच लोकप्रिय झालेली नाही.आधीच्या एका लेखात मी कोडॅक या कंपनीविषयी लिहिलं होतं. जगातले 85 टक्के फोटोपेपर बनवणारी ही कंपनी दिवाळखोरीत गेली ती काळाची ‘डिजिटल’ पावलं न ओळखल्यानं. अशी कित्येक उदाहरणं आपण देऊ शकतो. मर्फी रेडिओ, नोकिया फोन, अ‍ॅम्बेसिडर गाडी इ.नुसतं हेच नाही तर आजच्या लेखात आपण हे समजावून घेऊ की नुसतं वस्तू वा कमोडिटीच्या बाबतीत हे घडतंय असं नाही, तर बिझिनेस मॉडेलसुद्धा बदलत आहेत. आता तर इंडस्ट्री 4.0 मध्ये तो वेग कितीतरी वाढतो आहे.हेच बघा ना-हर्टज, अवीस इ. अमेरिकन गाडय़ा भाडेतत्त्वावर देणार्‍या कंपन्या. पण या कंपन्या उबर या कंपनीपुढे फिक्या पडल्या आहेत!  हजारो/लाखो गाडय़ा ज्यांच्या मालकीच्या आहेत अशा या हर्टज व अवीस या कंपन्या. त्याउलट  उबरकडे एकही गाडी स्वतर्‍च्या मालकीची नाही! पण बिझिनेस कुणाचा जोरात आहे?दुसरं उदाहरण- शेरटॅन, हिन्टन, मॅरिअट वगैरे आलिशान हॉटेल्स.  ज्यांच्या मालकीच्या अनेक मालमत्ता आहेत त्यांना प्रचंड टक्कर देत आह एअर बस. ज्यांच्याकडे एक दहा बाय दहाची खोलीसुद्धा स्वतर्‍ची नाही!हे घडतं आहे ते इंडस्ट्री 4.0 मधल्या अनेकविध तंत्रज्ञानाच्या उपविभागांमुळे! आणि म्हणून आपल्या सर्वानाच हे कळणं आवश्यक ठरतं!भारतात यायला वेळ असला तरी आता पेट्रोल/डिझेलवर चालणार्‍या गाडय़ांचं प्रमाण प्रगत जगात कमी होतंय हे नक्की. हायब्रिड तंत्रज्ञान (बॅटरी/सौरऊर्जा/पेट्रोल) वापरून चालणार्‍या गाडय़ा आणि विशेषतर्‍ बॅटरीवरच्या गाडय़ा यामुळे गाडय़ांचं डिझाइन बदलतंय, विलक्षण वेगानं!आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला सोलर अलायन्स या जगातील 120 हून अधिक देशांच्या समूहाचं नेतृत्व मिळवून दिलं. या सौरऊज्रेवर जर गाडय़ांमधल्या बॅटर्‍या चार्ज करू लागलो तर नुसतंच प्रदूषण कमी होईल असं नाही, पण भारताचं मध्यपूव्रेवरील असणार इंधनासाठीचं अवलंबित्व आणि तद्नुषंगिक परकीय चलनाचा खर्च संपेल! त्यासाठी जसं सौरऊर्जा व नॅनो तंत्रज्ञान लागेल तसंच त्यासाठी इंडस्ट्री 4.0चे अनेक उपघटकसुद्धा लागतील.वाचकहो, ज्ञानग्रहणाचा विडा रंगायचा असेल, नोकरीची भाकरी करपायची नसेल, प्रगतीचा घोडा अडू द्यायचा नसेल, तर निरंतर शिक्षणानं ेआपल्याला कौशल्य संच फिरवत राहायला हवा तो यामुळेच!( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.).