शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कॅफे- गप्पांचा, आठवणींचा एक कट्टा

By admin | Updated: June 22, 2017 09:55 IST

जिना चढून वर आल्यावर थेट समोरच्या कोपऱ्यातला हा टेबल. एका बाजूला भिंत आणि एका बाजूला खिडकी

- प्रसाद सांडभोर

जिना चढून वर आल्यावर थेट समोरच्या कोपऱ्यातला हा टेबल. एका बाजूला भिंत आणि एका बाजूला खिडकी. खिडकीवर पातळ लाकडी पट्ट्यांचा पडदा. दिवसा वेळेनुसार खिडकीशी वेगवेगळे कोन करून आत येणारं ऊन आणि त्यासोबत टेबलभर पडणारी पट्टेरी सावल्यांची नक्षी. एकदम मस्त जागा. या कॅफेत पहिल्यांदा आलो तेव्हा इथे बसलो होतो. तेव्हापासून नंतर जेव्हाही आलोय तेव्हा दरवेळी इथेच बसलोय. कधी मित्रांसोबत गप्पा मारत, कधी एखादं पुस्तक किंवा मासिक चाळत, तर कधी आजच्यासारखं एकटंच बसून कॉफी पीत.आजूबाजूचं जग न्याहाळत.बराच जुना आहे म्हणे हा कॅफे.हे भिंतींवरचे फोटो केवढे जुने आहेत. सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीचे! किती व कोण कोण येऊन गेले असतील आजवर इथे? किती बरं जणांनी आजवर याच खुर्चीवर बसून याच कपातून त्यांच्या आवडीची कॉफी प्यायली असेल?काहींचं रोजचं भेटण्याचं ठिकाण असेल हे. काहींची वेटरबुवांशी ओळख असेल; आॅर्डर ठरलेली असेल. कॅफेतल्या ठरावीक जागा ठरलेल्या असतील. इथे येणाऱ्या सगळ्यांच्या मिळून केवढ्या साऱ्या आठवणी असतील या कॅफेच्या! प्रत्येकाच्या आपल्या आपल्या स्वतंत्र. पण मग हा कॅफे जुना कसा बरं? हा तर दरवेळी दरक्षणी नवा आहे. ही टेबलं, खुर्च्या, कप, चमचे, पंखे असतील जुने. पण या गोष्टी म्हणजे काही हा कॅफे नव्हे! हा कॅफे बनतो इथे येणाऱ्या माणसांमुळे आणि त्यांच्या गप्पा-विचार-आठवणी-गोष्टींमुळे. माणसं गेली की कॅफे मोडतो.पुन्हा नव्या माणसांसोबत नवा बनायला. कसलं भारी!इथे असं नुसतं बसलं ना की असलं काहीबाही सुचणं ठरलेलंच. म्हणून ही जागा मला अजून जास्त आवडते.कॉफी संपत आली..अजून काय बरं आॅर्डर करूयात?