शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गाडीला किक मारुन बुंगाट सुटता, पण ती बंद पडते तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 06:45 IST

गाडी ‘उडवण्या’आधी ती बंद पडली तर सुरू करायची कशी हे समजण्याची गरज 

ठळक मुद्दे. गाडी रस्त्यात अचानक बंद पडली, तर तेव्हाचं तेव्हा बघू, असा आपला खाक्या असतो एकूण !

प्राची  पाठक

शाळेत असल्यापासून आपल्याला बाइकचं अ‍ॅट्रॅक्शन. शाळा संपून कॉलेजला जात नाही तर आपल्या हाताशी एखादी बाइक असावी, असं वाटायला लागतं. त्या बाइकवर आपल्याला सुसाट फिरायचं असतं. त्या स्टायलिश बाइकच्या आजूबाजूने सेल्फी काढून घ्यायचे असतात. ते तितकेच सुसाट कुठे कुठे फॉरवर्ड करायचे असतात. ‘शाळेत अमुक मार्क्स मिळवून तमुक नंबर आण, मग तुला सायकल देऊ’ ही अनेकांची लहानपणीची स्टोरी असते. भारीतली बाइक आपल्या हातात आली की त्या स्टोरीवर कळसच चढायचा बाकी राहतो. आपल्याला लय भारी वाटत असतं. कोणी वजनाने हलकी अशी टू व्हीलर निवडतात. कोणी इलेक्ट्रिक बाइक घेतात. कोणी सायकलमध्येच अ‍ॅडव्हान्स मॉडेल वापरून बघतात. या तमाम दुचाकी गाडय़ांचा मेन्टेनन्स आपण करतो का? किमान आपल्या दुचाकीचे स्टाइलपलीकडे काय वैशिष्टय़ं आहे, ते तरी माहीत करून घेतो का? आपल्या गाडीचं वजन किती आहे, तिचे इंजिन किती सीसीचे आहे, हे प्रश्नच आपल्याला पडत नाहीत. आपल्याला फक्त गाडी ‘उडवायची’ असते. तिला ऑइल टाकावं लागतं की नाही, इंजिन ऑइल कधी बदलावं लागतं, ब्रेक सिस्टीम कशी चालते, असा विचार करून डोक्याचा भुगा कोण करेल? गाडी चालतेय ना, मग दामटत सुटायची. किक मारली, बटन स्टार्ट केलं की सुसाट वेगात फिरायचं, एवढंच आपल्याला माहीत. गाडी रस्त्यात अचानक बंद पडली, तर तेव्हाचं तेव्हा बघू, असा आपला खाक्या असतो एकूण !

काय करता येईल?

गाडी चालवताना गाडीचा मेंटेनन्स आणि आपली सुरक्षा या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यासोबत ट्रॅफिक रुल्स आपल्याला माहीत असणं आणि रोड मॅनर्स फॉलो करणं अत्यंत आवश्यक असतं. केवळ लर्निग लायसेन्स काढायचं वय झालं आणि पर्मनंट लायसेन्स हाती आलं म्हणजे आपण ऑटोमॅटिक गाडी शिकत नाही. गाडी अचानक बंद पडली तर कुठे संपर्क करायचा आपल्याला माहीत हवं. छोटय़ा-मोठय़ा दुरु स्त्या आपल्या आपण करायला शिकलं पाहिजे. गाडीच्या टायरची काळजी कशी घ्यायची, तिच्यात किती हवा भरायची हे समजून घेऊ. आपल्या गाडीचं मायलेज किती आहे, याचं गणित करून बघू. पेट्रोल संपलं की टाक पेट्रोल, इतकंच आपण करतो. गाडीच्या सव्र्हिसिंगचं शेडय़ुल आपण तपासत नाही. त्यातले बारकावे समजून घेत नाही. आपल्या गाडीच्या मॉडेलची वैशिष्टय़े स्टाइलपलीकडे समजून घ्या. काहीजण गाडीला वरच्यावर फडकंसुद्धा मारत नाहीत. गाडीचं सीट झटकलं की प्रवास सुरू. त्यापेक्षा आपली गाडी वेळोवेळी नीटनेटकी ठेवायची सवय लावून घ्या. गाडीचे आरसे आणि त्यांचं सेटिंग नीट आहे का, ते बघा. गाडीचे सर्व दिवे नीट लागतात का, हॉर्न नीट चालतो का, गाडीच्या चाकांमध्ये हवेचं प्रेशर पुरेसं आहे का, महिन्यातून किती वेळा आपण चाकात हवा भरतो त्याचा आढावा घ्या. गाडीचं इंजिन ऑइल किती कालावधीनंतर बदललं पाहिजे, विचारा मेकॅनिकला. गाडी किती अ‍ॅव्हरेज देते, किती वजन पेलू शकते, रात्नी गाडी कशी चालवायची या सगळ्याबद्दल मित्नमैत्रिणींशी गप्पा मारून बघा. गाडी सव्र्हिसिंगला नेतो तेव्हा तिथे थांबून तिथल्या लोकांशी गाडीच्या मेंटेनन्सबद्दल चर्चा करा. त्यांच्याकडूनदेखील अनेक टिप्स मिळू शकतात. गाडीचा मेंटेनन्स शिकवणारे कोर्सेस कुठे करता आले, तर ते करा. वरचेवर गाडी पुसण्यासोबतच गाडीचं ऑइलिंग -ग्रीसिंग वेळच्या वेळी होईल असं बघा. गाडी अप-टू-डेट ठेवण्याबरोबरच गाडी चालवताना हेल्मेट घालायची सवय करून घ्या. जवळ जाण्यासाठी कशाला पाहिजे हेल्मेट, असा विचार न करता आपल्या सुरक्षेसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या कसोशीनं पाळा.     त्याने काय होईल?  1- आपल्या गाडीचं मॉडेल केवळ स्टाइल म्हणून मिरवण्यापेक्षा त्यातले फीचर्स आपल्याला नेमके कळतील. 2- गाडीचा जुजबी मेंटेनन्स आपण करू शकू. 3- जे आपल्या आवाक्यात नाही ते नेमकं कुठून दुरु स्त करून घ्यावं, चांगले गॅरेजेस/ सव्र्हिस सेंटर्स कोणते ते लक्षात येतील. 4- गाडीवर होणार्‍या खर्चाची कल्पना येईल. 5- गाडीचं आयुष्य वाढेल आणि सुरक्षित राइडचा आनंद जास्त काळ घेता येईल.