शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बॉण्डगिरी! - सगळ्याच डॉक्टरांनी करायला हवी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:42 IST

एमबीबीएस झालो, बॉण्ड पूर्ण करायचा म्हणून ग्रामीण भागात सेवेत दाखलही झालो. त्यात आला कोरोना आणि सरकारी यंत्रणोत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव या काळानं शिकवला.

ठळक मुद्दे प्रत्येक मेडिकलच्या विद्याथ्र्यानी आयुष्यात एकदा तरी ही ‘बॉण्डगिरी’ करायलाच हवी, असं मला वाटतं.

- डॉ. अविनाश मोरे, निर्माण 6

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस केलं.  इंटर्नशिप झाल्यावर ग्रामीण भागात बंधपत्रित सेवा पूर्ण करायची, हे डोक्यात होतं. त्यामुळं तिथं लागणारी आवश्यक ती कौशल्यं आणि ज्ञान आपल्याकडे हवे म्हणून इंटर्नशिप करताना जास्तीत जास्त वेळ दवाखान्यात घालवला. जेवढं काही शिकता येईल, ते शिकायचा प्रामाणिक प्रयत्न केला. मी वैद्यकीय महाविद्यालयात काम केलं होतं. येथे मनुष्यबळ कमी आणि त्याप्रमाणात इथे येणारी रु ग्णसंख्या ही खूप जास्त आहे. हे लोक इथे येतात ते यांना पीएचसीवर न मिळणा:या उपचारांमुळे किंवा गरज नसताना विनाकारण केलेल्या संदर्भसेवेमुळे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी म्हणून रु जू होताना डोक्यात एकच गोष्ट होती की, विनाकारण मी कोणत्याही रु ग्णाला पुढच्या स्तरावर संदर्भित करणार नाही. या काळात मला नांदेड जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र माळाकोळी, बरबडा आणि अर्धापूर अशा तीन ठिकाणी सेवा देण्याची संधी मिळाली. वैद्यकीय महाविद्यालयात काम करताना तिथे आपल्या मागे सीनिअर आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असते; पण प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र जे काही असता, ते केवळ आणि केवळ तुम्हीच!त्यामुळे इथे आल्यावर ब:याच वेळेला मला एकटय़ाला निर्णय घ्यायला जड गेलं. पहिल्या ठिकाणी रुजू झाल्याच्या 4-5 दिवसातच एकेदिवशी सकाळी सकाळी एका रु ग्णाला घेऊन नातेवाइकांचा घोळका आला. काय झालं असं विचारलं तर, रात्री झोपताना ठीक होते. आता सकाळी रोजची उठायची वेळ होऊन गेली, म्हणून उठवायला गेलो, तर काहीच हालचाल करत नाहीहेत, असं एका दमात त्या मुलाने सांगून टाकलं. काहीतरी लवकर करा म्हणून ते 7-8 नातेवाईक माङया तोंडाकडे पाहत बसले. रु ग्ण दगावला आहे असं कळतं होतं; पण या आधी कधी मृत्यू झाला आहे असं मी सांगितलं नव्हतं. इतरांना काम करताना पाहिलं होतं. त्यामुळे हाताची, गळ्याची, पायाची कुठलीतरी नाडी लागते का ते परत परत पाहील. कुठेच काहीच नव्हतं. तरीही परत एकदा एका सीनिअरला कॉल करून अजून काही पहायचं का, हे विचारल. आणि मग नातेवाइकांना मृत्यू झाल्याच कळवलं. त्यानंतरही तो पूर्ण दिवस मनाला अनाहूत भीती लागून राहिली होती की, मी योग्य तो निर्णय दिलाय ना? त्या दिवशी मला कळलं की, इथे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जरी मिळत असलं, तरी त्यासोबतच भली मोठी जबाबदारीही आपल्यावर आहे.असंसर्गजन्य रोग आणि त्याचे परिणाम यांचं प्रमाण गरजेपेक्षा खूप अधिक असल्याचं या एक वर्षात जाणवलं. उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांची औषधं वर्षानुवर्षे घ्यावी लागतात; पण याबाबतीत लोकांचं आरोग्य शिक्षण करण्यात आपण कुठेतरी कमी पडतो असं जाणवलं. या गोळ्या चालू असताना रुग्णाला गोळ्यांच्या प्रभावामुळे त्रस जाणवत नाही. कालांतराने मला काहीच त्रस होत नाही, तर मग गोळ्या का खायच्या, अशी मानसिकता तयार होते. मग ते मनानेच गोळ्या घ्यायचं बंद करतात. काही वेळा हे ही जाणवलं की महिन्याला तीन-चारशे रु पये खर्च औषधांवर करणं लोकांना परवडत नाही. त्यामुळेही गोळ्या बंद होतात. हळूहळू रक्तदाब वाढू लागतो आणि मग एखाद्या दिवशी अर्धागवायू (पॅरालिसिस) झटका बसतो. यासाठी मग येणा:या अशा प्रत्येक रुग्णाला, तुम्हाला काही त्रस नसला तरीही हे औषध चालू ठेवणं का गरजेचं आहे, हे समजावून सांगायला सुरुवात केली. माङया या काळात हे ही जाणवलं की स्रियांमध्ये रक्तक्षयाचं प्रमाण अधिक आहे. अशा गरोदर मातांना कमी वजनाची मुलं जन्मतात, मग ते वारंवार आजारी पडतात.या सर्व प्रसंगातून मला हे कळलं की, डॉक्टर म्हणून माझं काम हे फक्त यांना गोळ्या देऊन संपत नाही! तर त्याच्याही पलीकडे जाऊन रु ग्ण गोळ्या घेतात का, घेत असतील तर योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतात का, घेत नसतील तर का घेत नाहीत, त्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी मी काय करू शकतोल इथर्पयत हा प्रवास सुरू असायला हवा. डॉक्टर म्हणून माझी ही भूमिका मी या काळात नव्यान शिकलो.

अलीकडचाच एक अनुभव. तालुक्याच्या ठिकाणी बदली झाली. इथे रु जू होऊन काही दिवस होतात न होतात तोच कोरोना सुरू झाला. रोज काहीतरी नवीन काम, नवीन नियम, पुन्हा पुन्हा होणा:या बैठका आणि मनात अनामिक भीती यामुळं आला दिवस कधी जायचा हेच कळणं बंद झालं! स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर होता. त्यांच्यासाठी काही करता येईल का, अस वाटायचं. नंतर महाराष्ट्र सरकारने या मजुरांना राज्याच्या सीमेर्पयत महामंडळाच्या बसमधून सोडायचा निर्णय घेतला. मात्र हे करताना वेगवेगळ्या विभागाच्या परवानग्या लागणार होत्या. ही सगळी किचकट प्रक्रिया होती; पण आमच्या तालुका प्रशासनाने हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. सहा तासांच्या आत आरोग्य, पोलीस, महसूल आणि परिवहन विभागाच्या परवानग्या देऊन, सर्व प्रक्रिया योग्यरीतीने पार पाडून या मजुरांना बसमध्ये रवाना करण्यात आलं. एरव्ही तसूभरही दाद न देणारी ही व्यवस्था, अशा रीतीनेही काम करू शकते हे पाहून आणि त्या व्यवस्थेचा भाग होता आलं म्हणून, त्यावेळी केलेल्या कामातून वेगळंच समाधान मिळालं! याच काळात पोलीस कर्मचा:यांनाही कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता होती. म्हणून मग त्यांच्या सोबत गप्पांचं एक सेशन ठेवलं. कामावरून घरी गेल्यानंतर बेल/दार वाजवण्यापासून ते रात्री झोपण्यार्पयत आणि सकाळी उठल्यापासून ते परत कामावर येईर्पयत, काय काय काळजी घेतली पाहिजे, याची कार्यशाळा त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आम्ही घेतली. त्यांच्या इतर शंकाही दूर केल्या. त्यानंतरही आम्ही आमच्या कार्यक्षेत्रतील पोलीस कर्मचा:यांची नियमित तपासणी करत राहिलोत. आजतागायत आमचे सर्व पोलीस कर्मचारी कोरोनाला चकवा देण्यात यशस्वी ठरले आहेत.एक वर्षात खूप काही शिकायला मिळालं. अधिकारी म्हणून खूप मानही मिळाला. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा योग्य मोबदला (पगार) ही मिळाला. त्यामुळे हाताशी पैसेही जमले. त्यामुळे प्रत्येक मेडिकलच्या विद्याथ्र्यानी आयुष्यात एकदा तरी ही ‘बॉण्डगिरी’ करायलाच हवी, असं मला वाटतं. डॉक्टर म्हणून माझी जबाबदारी आणि भूमिका या किती व्यापक आहेत हे मला आता कळलंय. संकुचित कोशातून मी बाहेर पडलोय. 

***

निर्माणमध्ये सहभागी व्हायचं आहे?

तरुणांना अर्थपूर्ण जगण्याचा शोध घ्यायला मदत करणा:या निर्माण या उपक्रमाच्या अकराव्या बॅचसाठीची निवड प्रक्रि या सुरू झाली आहे.त्यात सहभागी व्हायची इच्छा असेल तरhttp://nirman.mkcl.orgया संकेतस्थळावर उपलब्ध असलेला अर्ज भरता येईल.अधिक माहितीही याच संकेतस्थळावर मिळू शकेल.