माणसांनी माणसांशी माणसासारखं वागणं इतकं सोपं असताना काही माणसं का क्रूर होतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 06:08 PM2020-06-11T18:08:07+5:302020-06-11T18:09:35+5:30

कृष्णवर्णीय माणसं भेटत गेली, मैत्री झाली आणि त्यांचं जगणं उलगडत गेलं. उस्मान सोसारख्या कृष्णवर्णीय शिल्पकाराच्या शिल्पांनी तर माङयासारख्या तरु ण चित्रकार मुलीचं आयुष्य बदलून टाकलं.

black lives matters- human way of life. | माणसांनी माणसांशी माणसासारखं वागणं इतकं सोपं असताना काही माणसं का क्रूर होतात?

माणसांनी माणसांशी माणसासारखं वागणं इतकं सोपं असताना काही माणसं का क्रूर होतात?

Next
ठळक मुद्देही अतिशय अमानवी हिंसा आहे. ती कुठेही होता कामा नये.

- आभा भागवत

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीला श्वेतवर्णीय पोलिसानं मारणं आणि  अरबेरीला जॉगिंग करताना गो:या पोलिसांनी पाठलाग करून ठार मारणं, या दोन्ही घटनांनी सगळं जग हादरलंय. सोशल मीडियावरही वर्णसंघर्षाचे प्रतिसाद उमटले. सगळी अस्वस्थता मनात जमा होत असताना मला  मात्र परदेशातल्या दीर्घकालीन वास्तव्यात भेटलेले कृष्णवर्णीय मित्न-मैत्रिणी आठवतात. त्यांचे चेहरे लख्ख लक्षात आहेतच आणि त्यांचं प्रेमळ वागणं त्याहून जास्त लक्षात आहे. स्पीलबर्गच्या आमिस्ताद सिनेमामधून भेटलेली कृष्णवंशीय माणसं आणि डेन्ङोल वॉशिंग्टन, एडी मर्फी, मॉर्गन फ्रीमन या हॉलिवूडमधल्या दिग्गज, लाडक्या अभिनेत्यांमुळे आणि अर्थात सुसंस्कृत ओबामा दांपत्य बघितलेलं असल्यामुळे कृष्णवर्णीय माणसं कधी दूरची, परकी वाटलीच नाहीत.
मैत्नी केव्हा रंगाच्या पलीकडे जाते कळतच नाही.  पहिला आफ्रिकन माणूस जो मी जवळून बघितला तो सेनेगाली गायक नुरू कान्न. एका फ्रेंच मैत्रिणीचा नवरा. आपली मिक्स्ड मुलं समतावादी वातावरणात वाढवीत म्हणून मुद्दाम पॅरीसच्या आउटस्कर्ट्सवर घर घेऊन राहाणारे दोघं. सहा फुटाहून उंच, सडपातळ, सुंदर काळा वर्ण, केसांच्या जटा, त्यावर एक रंगीत कापड बांधलेलं, जाड ओठ, मोठं नाक, खरखरीत पण मोकळा आवाज आणि वागणं त्याहून मोकळं. आफ्रिकन वंशाचा माणूस तसा रांगडा; पण आतून किती मऊ आहे हे समजतं. पण वरून दिसणारा रांगडेपणा घाबरवत नाही.
 नुरू आता युरोपातला मोठा गायक आहे. त्यांच्या घरात भोपळा, इतर काही पोकळ भाज्या, लाकडं, भांडी यांना तारा लावून घरीच तयार केलेली तंतुवाद्य होती, त्यातली काही त्यानं वाजवून दाखवली. मी थक्क! सेनेगाली संगीत ऐकवलं, कॅसेट्स कॉपी करून दिल्या, त्या मी खूप ऐकल्या. एक गेट टुगेदर होतं त्यात त्यानं जेंबे वाजवला, त्यावर मी भारतीय नाच केला. सेनेगालमधल्या गोष्टी ऐकवल्या, आफ्रिकन चिकन आणि भात करून खायला घातला, माङया हातचेही काही भारतीय पदार्थ चाखले, भारतात यायचं आहे अशी इच्छा बोलून दाखवली, त्याला आता 18 वर्ष होऊन गेली. स्वत: दोन तास घालवून माङया लांब केसांच्या वेण्या घालून दिल्या, कुठलंसं घाण वासाचं तेल त्यावर चोपलं, म्हणजे वेण्या सुटत नाहीत. दोनच दिवसांत त्या 2क्-25 छोटय़ा वेण्यांनी इतकं डोकं दुखायला लागलं की मी वेण्या सोडून टाकल्या. पॅरीसला हौसेनी केलेली भरपूर खरेदी बॅगेत मावेना, म्हणून मी बॅगेवर बसून लॉक लावत होते तर म्हणाला, आम्ही असंच करतो सेनेगालला. भारतीय आणि आफ्रिकन्स किती सारखे आहेत! नुरूचा गोडवा आणि त्याची अफलातून संगीतकला विसरूच शकत नाही.
उस्मान सो नावाचा शिल्पकार जरी प्रत्यक्ष भेटला नसला तरी त्याने केलेली अफलातून शिल्पं पॅरीसच्या सेन नदीच्या पुलावर पाहिली. ते 1999 चं ऐतिहासिक प्रदर्शन बघायला मीही हजर होते, हे माझं नशीब. आफ्रिकन आणि रेड इंडियन लोकांचे श्वेतवर्णीयांनी केलेले हाल याच विषयावर केलेली शिल्पं माणसाच्या आकाराच्या दीड-दोनपट भव्य. गोणपाट, माती, शेण असे मातकट रंगाचे पदार्थ वापरून केलेली खडबडीत, ओबडधोबड; पण प्रमाणबद्ध आणि कमालीची बोलकी शिल्पं. ही शिल्पं बघून कृष्णवर्णीय लोकांबद्दल जास्त कुतूहल वाटलं आणि आवर्जून त्यांचा इतिहास समजून घेतला. उस्मान सोने माङयासारख्या तरु ण भारतीय चित्रकार मुलीचं आयुष्य बदलून टाकलं. उच्च मध्यमवर्गीय घरातला डेव्हिड सॅन फ्रॅन्सिस्कोला शिकत असताना वर्गात होता. अमेरिकेत कोणीच एकमेकांच्या पायात पाय करत नाही. मैत्नी आहे म्हणून जेवण, चहा एकत्न घेतलंय असं फारच क्वचित. त्यामुळे मुख्य भेट होते ती वर्गात. गो:या अमेरिकन मित्न -मैत्रिणींपेक्षा डेव्हिड जास्त मोकळा होता.


मध्यम उंची, सावळा वर्ण, कुरळे केस आणि चित्नकलेचा विद्यार्थी असल्याने कायम तंद्रीत. क्वचित एखाद्या वेळी सॅन्डविच किंवा कॉफी एकत्न घेतली आम्ही. आफ्रो-अमेरिकन, आफ्रो-युरोपियन आणि आफ्रिकन यांच्यात बराच फरक आहे हेही कळलं. रात्नी उशिरार्पयत थिसीसचं काम करून सॅन फ्रॅन्सिस्कोला एकटी घरी जायचे. शेवटच्या बसची वाट बघत उभी होते रस्त्यावर. फार कमी माणसं होती; पण अमेरिकेत रस्त्यांवर भरपूर दिवे चालू असतात. चांगला उजेड होता. बराच वेळ बसची वाट बघायला लागल्यामुळे कुठलंसं गाणं ऐकण्यात मी इतकी मग्न झाले होते की आपोआप ठेक्यावर किंचित नाचत होते. एका गाडीतून दोन कृष्णवर्णी तरु ण जात होते, त्यांना इतका आनंद झाला मला संगीतात एवढं बुडलेलं बघून की माङया ठेक्यावर तेही थोडे हातवारे करून मला प्रोत्साहन देऊन गेले. आफ्रिकन माणसांच्या अंगातच संगीत भिनलेलं असतं. ठेका, सूर यांची त्यांना जन्मजात आवड आणि समज असते.
सॅन फ्रॅन्सिस्कोचा डाउन टाउनमधला काही भाग थोडा असुरक्षित आहे. एका संध्याकाळी ओळखीच्यांकडे जाताना, ट्रेन स्टेशनच्या भुयारातून रस्त्यावर आल्यावर आजूबाजूला खूप काळे तरु ण होते. गोष्टी खूप ऐकल्या होत्या की ते त्नास देऊ शकतात, त्यामुळे इयर प्लग्ज घट्ट करून, अजिबात त्यांच्याकडे न बघता आपल्या मार्गी लागले. धिप्पाड, अजागळ, मोकळे-ढाकळे, बिनधास्त 25-2क् तरुण एकत्न बघून उगाचच घाबरले. प्रत्यक्षात त्यांनी माङयाकडे बघितलंसुद्धा नाही. ते तिथे ड्रग्जची खरेदी -विक्र ी करतात हे नंतर कळलं मला. पण आपल्या कामाशी मतलब राखणारे आफ्रो अमेरिकन गरीब तरु ण उगाचच कोणालाही त्नास देत नाहीत हेही खरं.
मिनियापोलीसला आमच्या समोरच्या घरात या-एल नावाची एक ब्लॅक मुलगी राहायची. उंच, सावळी, अतिशय डौलदार आणि नीटस. चांगला जॉब करायची. आमच्या आठ महिन्यांच्या बाळाशी नेहमी खेळायला यायची. आम्ही एकत्न जेवायचो. आई-बाबा काही दिवसांकरिता आमच्याकडे आलेले असताना त्यांना म्हणायची ‘तुम्ही मला माझी फॅमिलीच वाटता.’ त्यांच्याकडे महिनोन्महिने सख्खे नातेवाईक एकमेकांना भेटतही नाहीत. निघताना आई डोळ्यात पाणी आणून तिला म्हणाली, ‘आता आपण भेटणार नाही.’ तर तिच्यासाठी कोणीतरी रडतंय याचं तिला नवल वाटलं.
एअर पोर्टवर आई-बाबांना सोडायला जाताना आम्ही मायलेकी दोघी रडतोय हे पाहून कृष्णवर्णीय टॅक्सी ड्रायव्हर आश्चर्य वाटून विचारात होता, आम्ही नेमकं का रडतोय?  मायलेकीचं हे भारतीय प्रेम त्याला नवं असावं. आफ्रिकन माणसं खूप संवेदनशील असतात. रूक्षपणा त्यांच्या वागण्यात वातावरणामुळे आलेला असला तरी मनात प्रेम असतं हे दरवेळी जाणवलं. वर्णद्वेशामुळे काळ्या माणसांवर होणारे अत्याचार ही अतिशय अमानवी हिंसा आहे. ती कुठेही होता कामा नये. माणसांनी माणसांशी माणसासारखं वागणं इतकं सोपं असताना काही माणसं का क्रूर होतात हे काही कळत नाही.

(लेखिका चित्रकार आहेत.)

Web Title: black lives matters- human way of life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.