- गौरी पटवर्धन
गेल्या काही दिवसात दोन वाक्यांची जगभरात चर्चा होती. सगळा सोशल मीडिया त्या दोन वाक्यांनी भरून गेला होता. त्यातलं पहिलं वाक्य होतं, ‘‘आय कान्ट ब्रीद’’ आणि दुसरं वाक्य होतं, ‘‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’’. या दोन्हीचं सोशल मीडियाच्या पद्धतीप्रमाणो हॅशटॅगमध्ये रूपांतर झालं. त्यातला ब्लॅक लाइव्हज मॅटर हा हॅशटॅग खूप काळ ट्रेण्डिंग राहिला. व्यवस्थेतील वर्णवर्चस्ववादी गो:या अधिका:याने केलेल्या काळ्या कातडीच्या माणसाच्या खुनाविरुद्ध सगळं जग एकवटलं. कोविड-19च्या भीतीच्या सावटाखाली असतानाही जगात ठिकठिकाणी माणसं निदर्शनं करण्यासाठी एकत्न आली. आणि त्या निमित्ताने त्वचेचा रंग या हा जुनाच मुद्दा पुन्हा चर्चेत आला.विचार करणा:या कुणाही व्यक्तीला त्वचेचा रंग हा विषय कितीही फालतू आणि उथळ वाटत असला, तरी आज दुर्दैवाने जगातल्या अनेक हिंसाचाराच्या मुळाशी त्वचेचा रंग आणि तशीच कारणं असतात हे सत्य आहे. त्यातले काही हिंसाचार शारीरिक असतात. ते सगळ्यांना दिसतात, त्याविरुद्ध आवाज उठवला जातो, चळवळी उभ्या केल्या जातात, दाद मागितली जाते. या सगळ्या प्रयत्नांना काही वेळा यश येतं, काही वेळा येत नाही; पण निदान या शारीरिक हिंसाचाराची दखल तरी घेतली जाते. पण जगातल्या सगळ्या माणसांना विळखा घालून बसलेला अजून एक हिंसाचाराचा प्रकार आहे, आणि तो म्हणजे मानसिक आणि भावनिक हिंसाचार ! हा प्रकार जितका इतर जगात आहे त्यापेक्षा कणभर जास्तच भारतात आहे.भारतातील लख्ख गोरी माणसं सोडली, तर प्रत्येक भारतीय व्यक्ती या मानसिक हिंसाचाराला तोंड देत असते. ज्यांच्या त्वचेचा रंग गहूवर्णी आहे त्यांना त्याचा त्नास थोडा कमी होतो. पण त्यानंतरच्या सर्व त्वचेच्या रंगांना आपल्याकडे मानसिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो. जिचा रंग सावळा ते काळा या रंगछटेत मोडतो अशी कोणतीही व्यक्ती डोळ्यासमोर आणा. तिने कधी ना कधी त्वचेच्या रंगावरून टोमणो ऐकलेले असतात, अपमान सहन केलेला असतो.‘‘हा रंग काळ्या लोकांना सूट होत नाही.’’‘‘रंग पक्का आहे. कसं लग्न जमणार आहे कोणास ठाऊक?’’इथपासून ते त्यांची त्वचा सावळी किंवा काळी असल्यामुळे त्यांच्या कौशल्याबद्दल, शिक्षणाबद्दल, क्षमतेबद्दल शंका उपस्थित केली जाते.या सगळ्याला सतत खतपाणी घालत असतात ते दोन घटक म्हणजे समाज आणि बाजारपेठ!समाजात वावरताना, विशेषत: लग्न जुळवताना मुलाच्या, आणि त्याहूनही मुलीच्या त्वचेचा रंग हा सगळ्यात महत्त्वाचा घटक होऊन बसतो. सगळ्या मुलांना ‘‘गोरी आणि सुंदर’’ मुलगी लग्नासाठी पाहिजे असते. गो:या मुलींचं लग्न लवकर जमतं. सावळ्या मुलींना लग्न जुळवताना जास्त तडजोडी कराव्या लागतात. काळ्या मुलींना तर जे स्थळ सांगून येईल ते स्वीकारावं लागतं. कधी कधी तर त्यांना स्थळ सांगून येतच नाही.
(गौरी मुक्त पत्रकार आहे.)