सावधान! सायबर जगात सोज्वळ दिसणारेही तुमच्यासाठी ट्रॅप लावून बसलेले असू शकतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 07:15 AM2020-03-12T07:15:00+5:302020-03-12T07:15:02+5:30

सायबर साक्षर होणं ही काळाची गरज आहे, नुस्ता डेटा पॅक जाळण्यापेक्षा ते शिूकन घ्या!

be careful, you might be in a cyber trap! | सावधान! सायबर जगात सोज्वळ दिसणारेही तुमच्यासाठी ट्रॅप लावून बसलेले असू शकतात!

सावधान! सायबर जगात सोज्वळ दिसणारेही तुमच्यासाठी ट्रॅप लावून बसलेले असू शकतात!

Next
ठळक मुद्दे. सायबर साक्षर व्हावं. हे माध्यम चांगलं असलं तरी तिथं कुणावरही अवाजवी विश्वास टाकू नये.

   - आवेज काझी

सायबरविश्वात आताशा तरुण मुलींना अनेक सायबर समस्यांना सामोरं जावं लागतं. अर्थात ते माध्यम स्री-पुरुष असा भेद करत नाही, मात्र तरीही सायबर जगात स्रियांना होणारा त्रास, गुन्हेगारी वृत्तीचे लोक, फसवणूक हे सगळं जास्त आहे.  हातात असलेला स्मार्टफोन आणि त्यावरचा दीड जीबी डेटा यापायी कुणी कुठंही बसून गुन्हेगारी उद्योग आणि इतरांना उपद्रव करू लागला आहे. बेरोजगारीमुळेही ‘ई’ गुन्हेगारी/सायबर क्र ाइम यात वाढ होते आहे. 
राज्यात तसेच देशात वाढत जाणारे महिलांच्या संदर्भातले सायबर क्राइम पाहिले तर खबरदारी घेणं हा एक उत्तम उपाय आहे. आज राज्यात दर दोन तासांमध्ये महिलांच्या संदर्भात अपराध घडत आहेत. बलात्कार, विनयभंग, चाइल्ड पोर्नोग्राफी, सायबरबुलिंग, सायबर स्टॅकिंग यासारखे गंभीर गुन्हे सर्रास घडतात/ दिसतात. आधुनिक तंत्नज्ञानाची साधनं वापरून केले जाणारे हे गुन्हे ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर याद्वारे घडतात. आणि ते वापरणारे हात बहुतांश वेळा तरुण असतात.
पेपरलेस कॉन्ट्रॅक्ट, डिजिटल स्वाक्षर्‍या आणि ऑनलाइन व्यवहार आणि सायबर गुन्ह्यांनी कायदेशीर जगाला चकीत केलं आहे. सायबर-स्टॅकिंग, सायबर बदनामी, सायबर सेक्स, अश्लील सामग्रीचा प्रसार आणि एखाद्याच्या खासगी आयुष्यात नाक खुपसणं, प्रायव्हसी ब्रिच करणं हे हल्ली सर्रास होतं. हे गुन्हे नेमके कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्यासाठी शिक्षा काय व खबरदारी काय घ्यायला हवी हे तपासून पहायला हवं.

सायबर स्टॅकिंग

सायबर स्टॅकिंग या शब्दाची एकच एक व्याख्या नाही. मात्र आभासी जगात मुलींचं शोषण, ऑनलाइन धमक्या, त्यांच्या चॅट-रूम्समध्ये, मॅसेंजरमध्ये अनाधिकृत प्रवेश करून मेसेज करत राहाणे, ई-मेल गोळीबार, सायबर बुलिंग करणं, शिवीगाळ करणं हे सारं या सायबर स्टॅकिंगच्या टप्प्यात येतं. ऑनलाइन उपलब्ध असलेल्या डेटाचा वापर करून मुलींना धमकावणं, त्यांच्या माहितीचा, फोटोचा गैरवापर करणं,  चुकीची माहिती बदनाम करण्यासाठी वापरणं हे सारं गंभीर गुन्ह्याच्या भाग आहे. फौजदारी कायदा 
(दुरुस्ती) अधिनियम 2013 मध्ये भारतीय दंड संहिता कलम 354 डी जोडली गेली आहे. या गुन्ह्यासाठी तीन वर्षार्पयत कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. एकच गुन्हा दोनदा केल्यास पाच र्वष शिक्षा व दंड ठोठावला जाऊ शकतो.

सायबर बदनामी अर्थात सायबर डेफिमिशन

इंटरनेट आणि सोशल मीडिया वापर विधायक कामासाठी होऊच शकतो, मात्र तो तसा न करता एखाद्याची बदनामी करण्यासाठी हे माध्यम वापरणं हा गुन्हा आहे. एखाद्याची प्रतिष्ठा मलीन करणं, चुकीची माहिती पसरवणं, त्यापायी त्या व्यक्तीनं आत्महत्या करणं हे सारं गंभीर गुन्ह्यात नोंदवलं जातं. इंटरनेटच्या मदतीने सायबर बदनामी वार्‍याच्या वेगानं पसरते. त्यात अफवा पसरवणं, खोटीनाटी माहिती देणं हे सारं तुरुंगवास होण्यासाठी पुरेसं आहे.


ई-मेलद्वारे छळ अर्थात ई-मेल बॉबिंग

मेलद्वारे त्नास देणं, ब्लॅकमेलिंग, धमकी देणे आणि निनावी सतत प्रेमपत्नं पाठवणं किंवा ईल मेल पाठवणं हा गुन्हा आहे.


ईल साहित्य पाठवणं

अश्लील साहित्य पाहणं, डाउनलोड करणं, इन्स्टंट मेसेजिंग, ई-मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमाद्वारे पाठवणं, प्रकाशित करणं, प्रसार करणं गुन्हा आहे. बाल पोर्नोग्राफी हा गुन्हा आहेच.  त्यासाठीही शिक्षा होऊ शकते.
त्यामुळे कळत-नकळत होणारे हे गुन्हे टाळावेत.

*****

आपलं सायबर शोषण होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल?

1. अनोळखी व्यक्तींसोबत ऑनलाइन मैत्नी करू नये.
2. सेफ लॉग इन सेफ लॉग आउट हा मंत्र लक्षात ठेवावा. शक्यतो अनोळखी ठिकाणी लॉग इन करू नये.
3. अनोळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीद्वारे सायबर स्टॅकिंग, सायबर बुलिंग होत असेल तर त्याविषयी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.
4. सायबर बदनामी, ब्लॅकमेलिंग, मॉर्फिग ई-खंडणी हे सारं सहन करू नये. त्यानं गुन्हेगारांची भीड चेपते.
5. सायबर साक्षर व्हावं. हे माध्यम चांगलं असलं तरी तिथं कुणावरही अवाजवी विश्वास टाकू नये.
                                  

( लेखक पोलीस उपनिरीक्षक असून, सायबर क्राइम अभ्यासक आहेत.)

Web Title: be careful, you might be in a cyber trap!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.