शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या नावे बोगस अकाउण्टपासून सावधान

By admin | Updated: July 12, 2016 15:46 IST

आपल्याला फेसबुकवर एखाद्या अनोळखी मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर तुम्ही काय करता?

-नम्रता फडणीस
आपल्याला फेसबुकवर एखाद्या अनोळखी मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर तुम्ही काय करता?
तिच्या प्रोफाईल मध्ये कुणीतरी म्युच्युअल फ्रेंड दिसताहेत म्हणून लगेच ती रिक्वेस्ट ओके करायला जाल तर फसण्याचीच शक्यता जास्त. तरुण मुलांनाच नाही तर तरूणींनाही सहजपणे जाळ्यात ओढण्यासाठी एका तरूणीच्याच नावाने दुसऱ्या तरूणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मुलगीच आहे म्हणून मुली ती क्षणात स्वीकारतातही. आणि मग ती थेट चँटींगला सुरूवात करत. आणि मग नंतर   अश्लिल मेसेज पाठवले जातात. काही वेळानंतर ती व्यक्ती ‘ती’ नव्हे तर  ‘तो’ असल्याचं कळतं. 
अशाप्रकारे महिलांच्या नावाने बनावट अकाऊण्ट सुरू करून तरूणींची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. याविरूद्ध तक्रार करण्यास तरूणी पुढे येत नसल्याने असे प्रकार सर्रास करणाऱ्या नेटिझन्सच्या हातात आयते कोलीतच मिळाले आहे. आजचे युग हे टेक्नोसॅव्ही असल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत. या मोबाईलची तरूणाई इतकी अँडिक्ट झाली आहे की चोवीस तास त्यांचं विश्व या उपकरणाशी बांधलं गेलं आहे. सायबर कॅफे मध्ये न जाताही आता हातातल्या मोबाईलवर फेसबुक, ट्विटर हाईक यांसारखी अँप्लिकेशन्स डाऊनलोड करून चँटिंगचे प्रमाण दिवसागणिक वाढत चाललं आहे. त्यातून मग अशा उपद्रवी व्यक्तींच्या जाळ्यातही तरूणी नकळतपणे ओढल्या जाऊ शकतात आणि त्यांची फसवणूक होऊ शकते, अशाच प्रकारच्या दोन तक्रारी ’ लोकमत’कडेच आल्या आहेत, त्यामुळे अशा फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर तरूणींनी त्याचा स्वीकार करण्याआधी अकाऊंटची खात्री करून घ्यावी आणि असा कुठला अनुभव आला तर तात्काळ सायबर सेलशी संपर्क साधावा.
 
होतं काय?
 
तरूणींच्या नावाने बोगस फेसबुक अकाऊण्ट ओपन करण्याचं प्रमाण वाढतं आहे. तरूणीच्याच नावानं अकाऊण्ट तयार करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते, त्या अकाऊंटची शहानिशा केल्यास त्या अकाऊंटवर सर्व फोटो तरूणीचेच दिसत असल्यानं तात्काळ विश्वास ठेवून संबंधित तरूणीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते. आणि मग फेसबुक मेसेंजरवर त्या व्यक्तीला चँटिंगचे रान खुलं होतं. सुरूवातीला आपण मुलगा आहोत असं सांगितलं जात नाही. पण काही मेसेज वाचल्यानंतर एक मुलगी असे अश्लिल मेसेजे कसे करू शकते, याची शंका येते आणि समोरच्याककडून माहिती काढून घेणारा एखादा जरी मेसेज टाकला तर ती व्यक्ती तुम्हाला  ‘ब्लॉक’ करून टाकते.
त्यात अनेकदा एखाद्या गाजलेल्या कलाकाराची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर हुरळून जाऊन तरूणींकडून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते. पण सावधान,  बहुतांशी ते फेक अकाऊंटच असण्याची दाट शक्यता असते.
 
काय कराल?
 
* शक्यतो अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.
* जर स्वीकार केलाच तर तिची चँटिंग पद्धत आणि उद्देश समजून घ्या.
* एखादा अश्लिल मेसेज आला तर लगेच माहिती काढण्याचा प्रयत्न करू नका.
* चँटिंगमधून थोडेसे खोलात जायचा प्रयत्न करा आणि काय चालले आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा.
* जास्त प्रश्न विचारलेत तर पुढची व्यक्ती तुम्हाला ब्लॉक करू शकते.
* तिच्याशी संपर्कात रहाताना सायबर सेलला देखील तक्र ार नोंदवा. ज्यायोगे त्या व्यक्तीचा ठाविठकाणा काढणं सोपं जाईल. 
* पोलिसात तक्रार करायला घाबरू नका.